mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

बँकेचे पैसे बुडवणे भोवले! धनश्री मल्टीस्टेटची आक्रमक वसुली; कारखान्याच्या माजी संचालकाची थेट तुरुंगात रवानगी; न्यायालयाचा मोठा दणका

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
July 10, 2026
in मंगळवेढा, सोलापूर
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

टीम ​मंगळवेढा टाईम्स ।

कर्ज घेऊन बुडवणाऱ्या आणि वारंवार नोटीस देऊनही दाद न देणाऱ्या थकबाकीदारांना पंढरपूर येथील वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाने मोठा झटका दिला आहे.

धनश्री मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या कर्जवसुली प्रकरणात न्यायालयाने एका ऋणकोला थेट न्यायालयीन कोठडीत (तुरुंगात) ठेवण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या या कडक भूमिकेमुळे थकबाकीदार वर्गात मोठी खळबळ उडाली आहे.

​नेमके प्रकरण काय?

​’धनश्री मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी’ने कर्जदार राजेंद्र लक्ष्मण यमगर यांना नियमानुसार कर्ज पुरवठा केला होता. मात्र, प्रदीर्घ काळ उलटूनही या कर्जाची परतफेड न झाल्याने संस्थेने पंढरपूर येथील वरिष्ठ स्तर मे. दिवाणी न्यायालयात लवाद दरखास्त क्र. ८४३/२०२२ दाखल केली होती.

या खटल्यादरम्यान संबंधित ऋणको यांना न्यायालयामार्फत कायदेशीर नोटिसा देखील बजावण्यात आल्या होत्या, मात्र तरीही कर्जाची फेड करण्यात आली नाही.

​माजी संचालकाविरुद्ध ‘तुरुंग वॉरंट‘ अन् अटक!

​धनश्री मल्टीस्टेटच्या वतीने ॲड. एस. एम. हावनाळे आणि ॲड. संगम सुकदेव मोरे यांनी न्यायालयात प्रभावी युक्तिवाद केला. हा युक्तिवाद ग्राह्य धरत मा. न्यायालयाने संबंधित ऋणकोंविरुद्ध थेट तुरुंग वॉरंट (Jail Warrant) जारी केले होते.

​त्यानुसार, या प्रकरणातील ऋणको क्रमांक ८ तथा माणगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक रघुनाथ सीताराम चौथे यांना ९ जुलै २०२६ रोजी पोलिसांमार्फत न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने गुन्हा गांभीर्याने घेत रघुनाथ चौथे यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे कडक आदेश दिले.

​न्यायालयात ‘धनश्री’च्या वतीने यांनी पाहिले कामकाज:

​या महत्त्वपूर्ण कायदेशीर लढाईत धनश्री मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या वतीने:
​विद्वान वकील: ॲड. एस. एम. हावनाळे, ॲड. संगम सुकदेव मोरे

​माहितगार प्रतिनिधी: श्रीकांत जाधव, सागर जाधव यांनी बाजू मांडत आवश्यक ते कामकाज पाहिले.
​बँकिंग क्षेत्रात चर्चा; संस्थाचालकांना बळ!
अनेकदा कर्ज थकवून कायदेशीर प्रक्रियेला बगल देणाऱ्या प्रवृत्तींना न्यायालयाच्या या निर्णयामुळे योग्य तो संदेश गेला आहे.

धनश्री मल्टीस्टेटने थकबाकीदारांविरोधात घेतलेल्या या आक्रमक पवित्र्यामुळे प्रामाणिक ठेवीदारांच्या हिताचे रक्षण झाले असून, कायदेशीर मार्गाने वसुली कशा पद्धतीने केली जाऊ शकते, याचा एक वस्तुपाठच समोर आला आहे.

धनश्री महिला पतसंस्थेच्या कर्जदारास चेक बाऊन्स केसमध्ये शिक्षा कायम, आरोपीची तुरुंगात रवानगी

पतसंस्थेच्या कर्जदारास चेक बाऊन्स केसमध्ये शिक्षा कायम करण्यात आली असून  आरोपीची तुरुंगात रवानगी केली आहे.

यात हकीकत अशी की, सदरचे प्रकरणातील सामनेवाले ही धनश्री महिला ग्रामीण बिगरशेती पतसंस्था असून कर्जदारांना कर्ज पुरवठा करणे हा त्यांचा प्रमुख व्यवसाय असून त्यांनी यातील कर्जदार धोंडीबा शिवाप्पा कुटे यास नियमित कर्ज पुरवठा केला होता.

परंतु सदर कर्जदारांनी नियमित कर्जाची परतफेड केली नाही. सदर कर्ज थकीत गेल्यानंतर सदर कर्जाचेपोटी परतफेडीसाठी म्हणून सदर पतसंस्थेस आरोपीने त्याचे बँक खातेचा धनादेश दिलेला होता, सदर धनादेश न वटता बँकेने परत केलेमुळे त्याचेविरुध्द धनश्री पतसंस्थेने मंगळवेढा येथील मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांचे कोर्टात N.I.Act  कलम 138 अन्वये संक्षिप्त फौजदारी खटला. 192/2014 ही केस दाखल केलेली होती.

त्यामध्ये सदर कर्जदाराविरुध्द मंगळवेढा येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी आरोपीस सदर गुन्ह्याकरीता 1 महिना सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली होती व फिर्यादी संस्थेस 1,10,000/- (रक्कम – एक लाख दहा हजार रुपये) नुकसानभरपाई देणेबाबत आरोपीस आदेशित केले होते, जर आरोपीने 2 महिन्याचे आतमध्ये सदर नुकसानभरपाईची रक्कम देणेस कसूर केलेस आरोपीस अतिरिक्त 1 महिना सश्रम कारावास ठोठावला होता.

त्यानिकालाचे विरोधात सदर कर्जदाराने पतसंस्थेविरोधात पंढरपूर येथील मे जिल्हा न्यायालयात फौजदारी अपिल क्र.33/2018 हे दाखल केलेले होते. सदर अपिलामध्ये सामनेवाले बँकेचेवतीने ॲड. एस.एम. हावनाळे यांनी काम पाहिले. पंढरपूर येथील मे जिल्हा न्यायालयाने सदरचे अपिल दि.17/1/26 रोजी नामंजूर केले व सदर ॲपेलंट आरोपी धोंडीबा कुटे याचेविरोधात काॅन्विक्शन  वाॅरंट जारी केले होते.

सदर न्यायालयीन आदेशानुसार मंगळवेढा येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांचे न्यायालयासमोर आरोपीस हजर केले असता, सदर आरोपीची तुरुंगात रवानगी करण्यात आली. यात धनश्री महिला ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेच्या  वतीने माहितगार इसम विश्वनाथ नागणे, सतिश कोंडुभैरी तसेच संस्थेतर्फे ॲड. एस.एम.हावनाळे, ॲड.संगम सुकदेव मोरे यांनी काम पाहिले.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

संबंधित बातम्या

Transfer! मंगळवेढा पोलिस ठाण्याकडील ‘या’ पोलिस कर्मचार्‍यांच्या अन्यत्र बदल्या; नवीन ‘हे’ आले

मंगळवेढ्यात बुलेट राजांना दणका! पोलिसांची धडक कारवाई; मॉडिफाईड सायलेन्सर अन् विना नंबर प्लेटच्या ‘या’ वाहनांवर ‘ॲक्शन’

July 10, 2026
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

पुनर्वसनाच्या जमिनीवर डोळा! जमीन तुमची, आधार कार्ड खोटे अन् अंगठा दुसऱ्याचाच; मंगळवेढ्यात उजनी जमीन घोटाळ्याचा थरार, वाचून थक्क व्हाल; एजंट मालामाल

July 10, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

आ.समाधान आवताडेंचा धडाका! मंगळवेढ्याला म्हैसाळचे, तर पंढरपूरला कॅनॉलद्वारे मिळणार पाणी; वीज पुरवठाही ८ तास होणार

July 10, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

पालकांनो सावधान! ‘अनधिकृत’ इंग्लिश शाळेचा सुळसुळाट; मुलांचे भविष्य अंधारात, स्कूल बसची सुरक्षाही रामभरोसे

July 9, 2026
महिलांनो! बसने प्रवास करताय तर सावधान, मंगळवेढा बसस्थानकावरून महिला प्रवाशाचे १० लाख किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात पळविले; स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल

आगामी आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर बसस्थानक परिसरात पोलिसांचे ‘मॉकड्रिल’

July 8, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

हट्टापायी पोटचा मुलगा गेला…; सांगोल्यातील ‘या’ घटनेने पालकांचे डोळे उघडले, नक्की वाचा काय घडलं?

July 8, 2026
शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

मंगळवेढ्यातील १ लाख ९९ हजार मतदारांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! २००२ च्या यादीत नाव नसेल तर ‘या’ कागदपत्रांशिवाय पर्याय नाही

July 7, 2026
मोठी बातमी! सोलापूरचे नवे SP अतुल कुलकर्णी; शिरीष सरदेशपांडे यांची ‘या’ ठिकाणी झाली बदली

गुन्हेगारांनो सावधान! सुधारा, नाहीतर थेट कारवाई..; पोलिसांची सिंघम स्टाईल ॲक्शन; पोलीस अधीक्षकांनी गुंडांना बोलावून भर चौकात दिला सज्जड दम; लिहून घेतले हमीपत्र

July 7, 2026
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

सोलापूर जिल्ह्याची चिंता मिटली! हवामान खात्याच्या ‘या’ अंदाजाने उजनी धरणाच्या पाणीपातळीत होणार मोठा चमत्कार?

July 7, 2026

ताज्या बातम्या

खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

बँकेचे पैसे बुडवणे भोवले! धनश्री मल्टीस्टेटची आक्रमक वसुली; कारखान्याच्या माजी संचालकाची थेट तुरुंगात रवानगी; न्यायालयाचा मोठा दणका

July 10, 2026
Transfer! मंगळवेढा पोलिस ठाण्याकडील ‘या’ पोलिस कर्मचार्‍यांच्या अन्यत्र बदल्या; नवीन ‘हे’ आले

मंगळवेढ्यात बुलेट राजांना दणका! पोलिसांची धडक कारवाई; मॉडिफाईड सायलेन्सर अन् विना नंबर प्लेटच्या ‘या’ वाहनांवर ‘ॲक्शन’

July 10, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांसाठी गूडन्यूज! कर्जमाफीच्या दोन अटी केल्या रद्द, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; कुणाला मिळणार फायदा?

July 10, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

लाडकी बहीण’ योजनेचे पैसे वाढणार? मोदींच्या सल्लागार परिषदेचा मोठा अहवाल; पण ‘या’ महिलांसाठी चिंतेची बातमी

July 10, 2026
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

पुनर्वसनाच्या जमिनीवर डोळा! जमीन तुमची, आधार कार्ड खोटे अन् अंगठा दुसऱ्याचाच; मंगळवेढ्यात उजनी जमीन घोटाळ्याचा थरार, वाचून थक्क व्हाल; एजंट मालामाल

July 10, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

आ.समाधान आवताडेंचा धडाका! मंगळवेढ्याला म्हैसाळचे, तर पंढरपूरला कॅनॉलद्वारे मिळणार पाणी; वीज पुरवठाही ८ तास होणार

July 10, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा