टीम मंगळवेढा टाईम्स । अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सहसचिव सतीश सुपे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. दोन दिवसांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विभागाचे मंत्री छगन भुजबळ यांना अंधारात ठेऊन सचिवांनी स्वत : प्रस्ताव मांडला होता , त्यामुळे ही बदली करण्यात आल्याचे समजते.(mumbai Food and Civil Supplies Department chagan bhujbal)
मंत्रिमंडळ बैठकीत वरिष्ठ मंत्र्यांनी प्रशासनाच्या कामकाजाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
याची दखल घेत कर्तव्य पार पडतांना शासकीय कामकाजात होणाऱ्या विलंबास जबाबदार धरून सहसचिव सतीश सुपे यांची वित्त विभागात बदली करण्यात आली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज