mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

हृदयद्रावक! सात महिन्यांचं बाळ पोटातच गेलं, पती-पत्नीचाही जागीच अंत; एकाच चितेवर पेटली नवदांपत्याची चिता; सांगोल्यातील ‘त्या’ अपघाताने डोळ्यात येईल पाणी…

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
June 29, 2026
in सोलापूर
मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

मंगळवेढा टाईम्स : (सांगोला/बाळासाहेब झिंजुरटे):

नियतीचे खेळ किती क्रूर असू शकतात, याचाच एक थरारक आणि डोळ्यात पाणी आणणारा प्रत्यय सांगोला-जत महामार्गावर आला. सुखाचा संसार फुलवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या एका नवदांपत्याचा आणि त्यांच्या जन्मालाही न आलेल्या सात महिन्यांच्या बाळाचा भीषण रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला.

कपाळावरचा कुंकू आणि हातातील चुडा कायम ठेवत, अखेर या पती-पत्नीला एकाच चितेवर अखेरचा निरोप देण्यात आला. या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या घटनेने संपूर्ण सांगोला तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

​आंतरजातीय विवाह ठरला ‘औटघटकेचा‘

​वाकी शिवणे येथील सागर जाधव हा तरुण जेसीबी ऑपरेटर म्हणून काम करत होता. काही महिन्यांपूर्वीच त्याने सुजाता हिच्यासोबत आंतरजातीय विवाह केला होता. समाजाच्या चौकटी ओलांडून एकत्र आलेल्या या जोडप्याने सोनंद येथे आपला नवा संसार थाटला होता.

सुजाता सात महिन्यांची गरोदर असल्याने दोघेही आपल्या घरामध्ये येणाऱ्या नव्या पाहुण्याच्या (बाळाच्या) आगमनाची आतुरतेने वाट पाहत होते. मात्र, त्यांचे हे सुख नियतीला मान्य नव्हते.

​तपासणीसाठी जाताना काळाने गाठले…

​शनिवारी दुपारी सुजाताच्या वैद्यकीय तपासणीसाठी सागर तिला दुचाकीवरून सांगोल्याकडे घेऊन निघाला होता. दुपारी २:४० च्या सुमारास कडलास येथील गायकवाड वस्ती परिसरात त्यांच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या एका भरधाव कंटेनरने जोरदार धडक दिली.

ही धडक इतकी भीषण होती की, सागर आणि सुजाता या दोघांचाही जागीच मृत्यू झाला. या अपघातात त्यांच्या सात महिन्यांच्या बाळाचाही गर्भातच अंत झाला. एका क्षणात एका हसत्याखेळत्या कुटुंबाचा आणि त्यांच्या अपूर्ण स्वप्नांचा चक्काचूर झाला.

​उपस्थितांचे डोळे पाणावले; एकाच चितेवर अंत्यसंस्कार

​पोस्टमार्टम झाल्यानंतर रविवारी दोघांचेही शव गावात आणण्यात आले. नवविवाहित जोडपे आणि त्यांच्या न जन्मलेल्या बाळाचा असा करुण अंत पाहून गावातील प्रत्येकाचे काळीज हेलावले.

‘मरणेही तुजसवे…’ याची प्रचिती देत या मृत दांपत्यावर एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. जेव्हा चितेला अग्नी देण्यात आला, तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या शेकडो नागरिकांच्या अश्रूंचा बांध फुटला.

​”ज्यांच्या संसाराची सुरुवात पाहताना आनंद झाला होता, त्यांचा असा शेवट पाहण्याची वेळ येईल, असा विचारही कोणी केला नव्हता,” अशी आर्त भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

​या अपघातामुळे सांगोला-जत महामार्गावरील वाढत्या वाहतुकीचा आणि भरधाव वाहनांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

संबंधित बातम्या

तगडा बंदोबस्त! सोलापूर व माढा लोकसभेसाठी आजपासून अर्ज दाखल होणार, अनामत रक्कम रोखच भरावी लागणार; उमेदवाराबरोबर ‘एवढ्या’ लोकांनाच प्रवेश

दुष्काळात दांडी मारणाऱ्या अधिकाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल होणार; सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांचा कडक इशारा; ​मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई

September 30, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

अस्मानी-सुलतानी संकटांपुढे १८ वर्षांचा पोराचा धीर सुटला; संकटांच्या मालिकेने सोलापूर जिल्ह्यातील तरुण शेतकऱ्याचा घेतला बळी; रुग्णालयात नातेवाइकांची गर्दी

September 30, 2026
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

गुगलवरून नंबर शोधणं पडलं महागात! पाच रुपये ऑनलाइन पाठवायला सांगून पाच लाख खात्यातून लुटले; हॉस्पिटल अपॉइंटमेंटच्या नावाखाली सायबर दरोडा

September 30, 2026
शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

शेतकऱ्यांनो आणि व्यापाऱ्यांनो सावधान! जिल्ह्याची वेस ओलांडण्यापूर्वी ‘हा’ नियम नाही वाचला तर थेट पोलीस कारवाई; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचा मोठा निर्णय

September 30, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

दारूचे व्यसन ठरले काळ! पत्नीच्या विरोधाने खवळलेल्या पतीने कोयत्याने वार करून केली हत्या

September 28, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

ज्येष्ठ नागरिकांचा मोठा विजय! सुनेची याचिका फेटाळली; घराचा ताबा वृद्ध सासू-सासऱ्यांकडेच राहणार

September 30, 2026
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

​मोठी खळबळ! पोलिसांनाच गाडीखाली चिरडण्याचा प्रयत्न; पंढरपुरात आरोपींची बेधडक कृती, पाठलाग करून मुसक्या आवळल्या

September 27, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मोठी बातमी! दुष्काळाच्या झळा; दोन शेतकऱ्यांनी गमावला जीव, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

September 27, 2026

राज्यात दोन टप्प्यात दुष्काळ जाहीर होणार? पहिल्या 139 तालुक्यांची यादी आली समोर; सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यांचा समावेश

September 26, 2026
Next Post
मंगळवेढ्यातील श्री सायकल कंपनीमध्ये बॅटरी ऑपरेटर कार वरती 20 टक्के पर्यंत डिस्काउंट; नागरिकांना कार खरेदीसाठी मोठी संधी

मंगळवेढेकरांसाठी खुशखबर! 'श्री सायकल कंपनी'मध्ये लहान मुलांच्या बॅटरी कार आणि जीपवर धमाकेदार ऑफर; सोबतीला नोकरीची सुवर्णसंधी

ताज्या बातम्या

तगडा बंदोबस्त! सोलापूर व माढा लोकसभेसाठी आजपासून अर्ज दाखल होणार, अनामत रक्कम रोखच भरावी लागणार; उमेदवाराबरोबर ‘एवढ्या’ लोकांनाच प्रवेश

दुष्काळात दांडी मारणाऱ्या अधिकाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल होणार; सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांचा कडक इशारा; ​मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई

September 30, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

अस्मानी-सुलतानी संकटांपुढे १८ वर्षांचा पोराचा धीर सुटला; संकटांच्या मालिकेने सोलापूर जिल्ह्यातील तरुण शेतकऱ्याचा घेतला बळी; रुग्णालयात नातेवाइकांची गर्दी

September 30, 2026
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

गुगलवरून नंबर शोधणं पडलं महागात! पाच रुपये ऑनलाइन पाठवायला सांगून पाच लाख खात्यातून लुटले; हॉस्पिटल अपॉइंटमेंटच्या नावाखाली सायबर दरोडा

September 30, 2026
शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

शेतकऱ्यांनो आणि व्यापाऱ्यांनो सावधान! जिल्ह्याची वेस ओलांडण्यापूर्वी ‘हा’ नियम नाही वाचला तर थेट पोलीस कारवाई; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचा मोठा निर्णय

September 30, 2026
स्व.जनाबाई आवताडे यांचे आज व्दितीय पुण्यस्मरण; भजन, पुष्पवृष्टीचे आयोजन

स्व.जनाबाई आवताडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज मंगळवेढ्यात कीर्तन सोहळा; हिंदूभूषण सुनिताताई आंधळे यांची उपस्थिती

September 29, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

दारूचे व्यसन ठरले काळ! पत्नीच्या विरोधाने खवळलेल्या पतीने कोयत्याने वार करून केली हत्या

September 28, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..