मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग।
मंगळवेढा येथील मंगळवेढा नगरपरिषदेच्या आरोग्य विभागातील कामकाज कमालीचे संशयास्पद बनले असून, जंतुनाशक पावडरसह इतर साहित्यांच्या खरेदी आणि साठ्यामध्ये मोठी तफावत असल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत आरोग्य विभागाकडील डेडस्टॉक, स्टॉक बुक तसेच चल-अचल रजिस्टरची तत्काळ तपासणी करण्यात यावी, अशी मागणी करणाऱ्या लेखी निवेदनाद्वारे नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे.

दरम्यान याबाबत कार्यालयीन अधीक्षक तृप्ती रसाळ यांनी सदर खोल्या सील केलेल्या आहेत
मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रानुसार, मंगळवेढा नगरपरिषदेच्या आरोग्य विभागामार्फत शहरातील स्वच्छतेसाठी आणि आरोग्यासाठी खरेदी करण्यात येणाऱ्या जंतुनाशक पावडर व इतर साहित्यांच्या प्रत्यक्ष साठ्यात आणि कागदोपत्री नोंदींमध्ये प्रचंड विसंगती आढळून येत आहे.

या विभागातील एकूणच कामकाजाची पद्धत संशयास्पद असून शासकीय निधीचा गैरवापर होत असल्याचा संशय लोकप्रतिनिधींमधून व्यक्त केला जात आहे.डेडस्टॉक स्टॉक बुक चल आणि अचल संपत्ती रजिस्टर या सर्व महत्त्वाच्या दस्तऐवजांची वरिष्ठ पातळीवरून तातडीने कसून तपासणी करण्यात यावी, जेणेकरून यामधील दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

नगरपरिषदेच्या कारभारातील या गंभीर त्रुटींवर बोट ठेवत शहरातील नगरसेवक अरुण बाळासाहेब किल्लेदार,सोमनाथ महादे माळी,अश्विनी धोत्रे, नागर गोवे आणि प्रिती सूर्यवंशी यांनी स्वाक्षरीनिशी हे निवेदन प्रशासनाला सादर केले आहे.

यावेळी नगराध्यक्षा सुनंदा आवताडे आरोग्य सभापती प्रवीण खवतोडे सामाजिक कार्यकर्ते प्रवीण गोवे गणेश धोत्रे उपस्थित होते नगरसेवकांनीच लेखी तक्रार दाखल केल्यामुळे आता मंगळवेढा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी या संशयास्पद प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नेमणार का आणि दोषींवर काय कारवाई होणार, याकडे संपूर्ण मंगळवेढेकरांचे लक्ष लागले आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज














