मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग।
सोशल मीडियावर आपल्या रिल्सने लाखो मनांवर राज्य करणाऱ्या ब्रह्मपुरीच्या रिल स्टार रोहिणी पाराध्ये हिच्या मृत्यूला अखेर २३ दिवसांनंतर वाचा फुटली आहे! जिने नेहमी पडद्यावर हसू विकलं, तिच्या वाट्याला प्रत्यक्ष आयुष्यात मात्र पतीकडून मिळालेला छळ आणि क्रूरता आली.
पतीच्या सततच्या शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून रोहिणीने मृत्यूला कवटाळल्याचे आता उघड झाले असून, मंगळवेढा पोलिसांनी पती निलेश विलास पाराध्ये याच्याविरुद्ध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

सोशल मीडियावरील लाखो फॉलोअर्स आणि कुटुंबियांच्या तीव्र संतापानंतर अखेर पोलिसांना या प्रकरणाची दखल घ्यावी लागली असून, रोहिणीला हाच खरा न्याय असल्याची भावना व्यक्त होत आहे.

जबरदस्तीने हॉटेलमध्ये काम आणि रोजचा छळ!
मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, २६ मे रोजी दुपारी ३.३० च्या सुमारास ब्रह्मपुरी हद्दीतील ग्रामपंचायत हॉटेलमध्ये २५ वर्षीय रोहिणीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सुरुवातीला या आत्महत्येभोवती गूढ निर्माण झाले होते. मात्र, पडदा उघडला तो एका छळवणुकीच्या कहाणीवरून

मयत रोहिणी हिची अजिबात इच्छा नसतानाही, तिचा पती निलेश पाराध्ये हा गेल्या एक वर्षापासून तिला हॉटेलमध्ये जबरदस्तीने काम करण्यास भाग पाडत होता. केवळ एवढ्यावरच न थांबता, घरगुती कारणावरून रोज वाद घालणे, भांडणे करणे आणि अधूनमधून तिला अमानुषपणे हाताने मारहाण करणे असा तिचा छळ सुरू होता.

त्या ‘काळ्या दिवसाचा‘ थरार…
पतीकडून मिळणाऱ्या रोजच्याच शारीरिक आणि मानसिक त्रासाची सीमा संपली. या छळाला पूर्णपणे कंटाळून अखेर रोहिणीने टोकाचे पाऊल उचलले. तिने हॉटेलमधील राहत्या खोलीचा दरवाजा आतून बंद केला आणि खोलीतील पत्र्याच्या लोखंडी अँगलला ओढणीने गळफास लावून आपले जीवन संपवले. सोशल मीडियावर लाखो जणांना खिळवून ठेवणाऱ्या एका चेहऱ्याचा असा वेदनादायक अंत झाला.

पोलिसांचा चक्रव्यूह आणि पित्याची फिर्याद
आत्महत्येनंतर सोशल मीडियावरून ‘रोहिणीने आत्महत्या का केली?’ असा प्रश्नांचा भडिमार सुरू होता. पोलिसांनी तपासासाठी सी.डी.आर. (CDR) काढला, पण त्यातून ठोस काही हाती येत नव्हते. अखेर, पोटच्या मुलीचा छळ उघड्या डोळ्यांनी पाहणाऱ्या हताश पित्याने पुढे येत पोलिसात धाव घेतली.
मयत रोहिणीचे वडील बाळू गिरजाप्पा शिवशरण (रा. अर्धनारी) यांनी दिलेल्या अत्यंत करुण आणि आक्रमक फिर्यादीवरून मंगळवेढा पोलिसांनी आरोपी पती निलेश पाराध्ये याच्याविरुद्ध BNS १०८, ११५(२), ३५२, ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
तपासाची चक्रे फिरली!
“२३ दिवस उलटले तरी न्याय का मिळत नाही?” असा संतप्त सवाल विचारला जात असतानाच, आता गुन्हा दाखल झाल्याने ब्रह्मपुरी आणि सोशल मीडिया विश्वातून समाधान व्यक्त होत आहे.
‘हीच रोहिणीला खरी भावपूर्ण श्रद्धांजली’ अशा प्रतिक्रिया उमटत आहेत. या प्रकरणाचा पुढील धडक तपास पोलीस उपनिरीक्षक नागेश बनकर हे करत असून, आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











