mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढ्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची महत्त्वाची बैठक; पक्षबांधणीवर भर, तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष पदांच्या ‘या’ नावांची जोरदार चर्चा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 26, 2026
in मंगळवेढा, राजकारण
मंगळवेढ्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची महत्त्वाची बैठक; पक्षबांधणीवर भर, तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष पदांच्या ‘या’ नावांची जोरदार चर्चा

टीम ​मंगळवेढा टाईम्स।

मंगळवेढा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची एक महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच उत्साहात पार पडली. पक्षाचे जिल्हाध्यक्ष वसंतनाना देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली व निरीक्षक प्रा.महादेव तळेकर ही बैठक संपन्न झाली.

गेल्या काही काळापासून तालुक्यातील पक्ष संघटनेत आलेली शिथिलता दूर करून, आगामी काळात मजबूत पक्षबांधणी करण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला.​​या बैठकीला पक्षातील दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती यामध्ये माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, जिल्हाध्यक्ष वसंतनाना देशमुख, ​ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अरुण तोडकर, ​महिला जिल्हाध्यक्ष पल्लवी पाटील, ​अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेख, ​उद्योजक राहुल ताड, शिवशंकर कवचाळे, सुरेश कट्टे, दादा पवार,

विष्णु शिंदे, सुभाष दोडके, आण्णा सिरसट, मुझमिल काझी, संतोष गोवे, महादेव मुदगुल, पांडुरंग निराळे, पांडुरंग माळी, ज्ञानेश्वर गरंडे, नाना करपे, जैनुद्दीन पटेल, चंद्रकांत पाटील, चौगुले गुरुजी, माणिक गुंगे, सैफन शेख, अजिंक्य बेदरे यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होते.

​पदाधिकारी निवडीसाठी मुलाखती; ‘या’ नावांवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता!

​बैठकीचे मुख्य आकर्षण म्हणजे आगामी काळातील पदाधिकारी निवडी संदर्भात घेण्यात आलेल्या मुलाखती.

अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडलेल्या या प्रक्रियेनंतर मंगळवेढ्यातील पक्ष नेतृत्वाची धुरा कोणाकडे जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

​सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार: ​तालुकाध्यक्ष पदासाठी: सिध्देश्वर रणे

​शहराध्यक्ष पदासाठी: राहुल ताड आणि माऊली कोंडूभैरी ​यांच्या नावांवर लवकरच पक्षाकडून अधिकृत शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

​विस्कळीतपणा दूर करून ‘मिशन पक्षबांधणी’

​मंगळवेढा तालुक्यात गेल्या काही दिवसांत पक्षांतर्गत आलेली मरगळ आणि विस्कळीतपणा दूर करणे हा या बैठकीचा मुख्य अजेंडा होता. उपस्थित नेत्यांनी कार्यकर्त्यांना नवऊर्जा देत, येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्याचे आणि पक्षाचे नेटवर्क मजबूत करण्याचे आवाहन केले.

या महत्त्वपूर्ण बैठकीचे नेटके सूत्रसंचालन मंगळवेढा पंढरपूर मतदार संघ अध्यक्ष पांडुरंग जावळे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार माऊली कोंडूभैरी यांनी मानले.

या बैठकीमुळे मंगळवेढ्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह पाहायला मिळत आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार

संबंधित बातम्या

महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका होण्याची परिस्थिती,भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याचा दावा

उजनी पुनर्वसन जमीन घोटाळा! डमी खरेदीचे मोठे रॅकेट; एजंट झाले ‘मालामाल’, संपूर्ण रॅकेटची उच्चस्तरीय सखोल चौकशीची जनतेतून तीव्र मागणी

July 11, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

बँकेचे पैसे बुडवणे भोवले! धनश्री मल्टीस्टेटची आक्रमक वसुली; कारखान्याच्या माजी संचालकाची थेट तुरुंगात रवानगी; न्यायालयाचा मोठा दणका

July 10, 2026
Transfer! मंगळवेढा पोलिस ठाण्याकडील ‘या’ पोलिस कर्मचार्‍यांच्या अन्यत्र बदल्या; नवीन ‘हे’ आले

मंगळवेढ्यात बुलेट राजांना दणका! पोलिसांची धडक कारवाई; मॉडिफाईड सायलेन्सर अन् विना नंबर प्लेटच्या ‘या’ वाहनांवर ‘ॲक्शन’

July 10, 2026
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

पुनर्वसनाच्या जमिनीवर डोळा! जमीन तुमची, आधार कार्ड खोटे अन् अंगठा दुसऱ्याचाच; मंगळवेढ्यात उजनी जमीन घोटाळ्याचा थरार, वाचून थक्क व्हाल; एजंट मालामाल

July 10, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

आ.समाधान आवताडेंचा धडाका! मंगळवेढ्याला म्हैसाळचे, तर पंढरपूरला कॅनॉलद्वारे मिळणार पाणी; वीज पुरवठाही ८ तास होणार

July 10, 2026
एका बाजूला यांची मोदींची गॅरंटी आणि दुसऱ्या बाजूला दर दिवसाला शेतकरी आत्महत्या करतोय; ही स्थिती किती दिवस चालू द्यायची; शरद पवारांनी साधला निशाणा

विलिनीकरण की भाजपसोबत जायचं? शरद पवार यांच्यासोबतच्या बैठकीत काय ठरलं? थेट बड्या नेत्यानेच सांगितली आतली खबर

July 9, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

पालकांनो सावधान! ‘अनधिकृत’ इंग्लिश शाळेचा सुळसुळाट; मुलांचे भविष्य अंधारात, स्कूल बसची सुरक्षाही रामभरोसे

July 9, 2026
महिलांनो! बसने प्रवास करताय तर सावधान, मंगळवेढा बसस्थानकावरून महिला प्रवाशाचे १० लाख किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात पळविले; स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल

आगामी आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर बसस्थानक परिसरात पोलिसांचे ‘मॉकड्रिल’

July 8, 2026
शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

मंगळवेढ्यातील १ लाख ९९ हजार मतदारांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! २००२ च्या यादीत नाव नसेल तर ‘या’ कागदपत्रांशिवाय पर्याय नाही

July 7, 2026
Next Post
माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते देवेंद्र फडणवीसांचा सत्कार; मालकांनी ठरल्याप्रमाणे केलं… आता संधी मिळणार का? परिचारक समर्थकांचा सवाल

सोलापूर विधानपरिषद निवडणूक: उमेदवारीबाबत सस्पेन्स कायम; कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली; मुंबईत लॉबिंग सुरू; परीचारकांचे नाव आघाडीवर पण...

ताज्या बातम्या

विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

कर्नाटकात ८ तास, महाराष्ट्रात फक्त २ तास वीज? भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांचा आक्रोश; शेती धोक्यात; आम्हाला कर्नाटकात जाऊ द्या; शेतकऱ्यांचा सरकारला थेट इशारा

July 12, 2026
जिल्हा दूध संघ अध्यक्ष निवडीची बैठक ‘या’ महिन्यात; आज सर्वच संचालक गैरहजर

तुकाराम मुंडे पॅटर्नचा सांगोल्यात थरकाप! ग्राहकांच्या जिवाशी खेळणारे रॅकेट रडारवर; १५ लाखांचे ३७ हजार लिटर भेसळयुक्त दूध ओतले गटारात

July 12, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

कागदपत्रे बनावट, विद्यार्थीही खोटे! सोलापुरात केंद्र सरकारच्या योजनेत मोठा गैरव्यवहार; बनावट विद्यार्थी दाखवून केंद्राची शिष्यवृत्ती लाटली

July 11, 2026
महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका होण्याची परिस्थिती,भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याचा दावा

उजनी पुनर्वसन जमीन घोटाळा! डमी खरेदीचे मोठे रॅकेट; एजंट झाले ‘मालामाल’, संपूर्ण रॅकेटची उच्चस्तरीय सखोल चौकशीची जनतेतून तीव्र मागणी

July 11, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

बँकेचे पैसे बुडवणे भोवले! धनश्री मल्टीस्टेटची आक्रमक वसुली; कारखान्याच्या माजी संचालकाची थेट तुरुंगात रवानगी; न्यायालयाचा मोठा दणका

July 10, 2026
Transfer! मंगळवेढा पोलिस ठाण्याकडील ‘या’ पोलिस कर्मचार्‍यांच्या अन्यत्र बदल्या; नवीन ‘हे’ आले

मंगळवेढ्यात बुलेट राजांना दणका! पोलिसांची धडक कारवाई; मॉडिफाईड सायलेन्सर अन् विना नंबर प्लेटच्या ‘या’ वाहनांवर ‘ॲक्शन’

July 10, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा