mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

विधानपरिषदेचा धुराळा! सोलापूर महायुतीकडे, पण भाजपच्या कोट्यातून कोणाची लागणार लॉटरी? ‘या’ नावांची चर्चा; भाजपच्या गोटात हालचालींना वेग

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 17, 2026
in राजकारण, राज्य, सोलापूर
पदवीधरसाठी रणधुमाळी शिगेला; देशमुख, ढमाले, पाटील व लाड यांच्यात काटे की टक्कर

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत. त्यामुळे राज्यभरात जवळपास स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सदस्यातून निवडून द्यावयाच्या विधान परिषदेच्या जवळपास 17 जागा रिक्त आहेत.

पहिल्या टप्यात पार पडलेल्या 12 जिल्हा परिषद निवडणुका पार पडताच आता राज्यातील 17 जागा पैकी जवळपास पाच ठिकाणच्या निवडणुका होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

तर उर्वरित जागाही 75 टक्के मतदार उपलब्ध असल्यास होऊ शकतात, असे निवडणूक आयोगातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

त्यामुळे निवडणुकीची घोषणा होणार असल्याने हालचालींना वेग आला आहे.

त्यातच सोलापूरच्या स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लवकरच होणार असून त्यामुळे आता इच्छुकांत जोरदार रस्सीखेच पाहवयास मिळत आहे.

या रिक्त जागेवर भाजपचे संख्याबळ मोठे असल्याने याठिकाणी त्यांच्या कोट्यातून येत्या काळात कोणाला संधी मिळणार याची उत्सुकता लागली आहे.

सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेवर गेल्या निवडणुकीचा अपवाद वगळता आतापर्यंत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. त्यानंतरच्या राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणानुसार भाजपने येथे विजय मिळवत वर्चस्व ठेवले आहे. त्यामुळे येत्या काळात उमेदवार कोण असणार यावरून उत्सुकता लागली आहे.

सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या मतदार संघातून २००४-२०१० च्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून दिलीपराव माने विजयी झाले होते. त्यानंतर २०१०-२०१६ या कालावधीत दीपक साळुंखे यांचे वर्चस्व होते.

निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे दीपक साळुंखे-पाटील यांनी या जागेवर बाजी मारली. त्यानंतर २०१६ च्या निवडणुकीत मात्र सोलापूरचे राजकीय समीकरण बदलले. भाजपचे प्रशांत परिचारक यांनी राष्ट्रवादीच्या दीपक साळुंखे यांचा पराभव करत हा गड भाजपकडे खेचून आणला.

त्यामुळे आता आगामी काळात भाजपकडून कोणाला संधी दिली जाणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. भाजपकडे इच्छुकांची संख्या मोठी आहे. या जागेसाठी माजी आमदार प्रशांत पारिचारक पुन्हा इच्छुक आहेत.

तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागलेले माजी आमदार राजेंद्र राऊत, राम सातपुते नव्याने भाजपमध्ये आलेले राजन पाटील, दिलीप माने यांच्या नावाची चर्चा जोरात सुरु आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदेंची शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अनेक जण इच्छुक असल्याचे समजते.

नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यावर भाजपचे एकहाती वर्चस्व ठेवण्यात पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली आहे. त्यांनी स्थानिकच्या निवडणुकीपूर्वीच स्वपक्षातील नेनेटमंडळीचा विरोध पत्करून विरोधी पक्षातील आमदारांना भाजपमध्ये संधी देत निवडणुकीपूर्वीच साखर पेरणी केली होती.

माजी आमदार राजन पाटील, दिलीप माने, बबनदादा शिंदे यांचे चिरंजीवाना प्रवेश देत डाव टाकला होता. त्यामुळे स्थानिकाच्या निवडणुकीवर भाजपचे एकहाती वर्चस्व पाहवयास मिळाले. त्यामुळे भाजपचा विधान परिषदेचा उमेदवार ठरवताना पालकमंत्री गोरे यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक येत्या काळात लवकरच होण्याची शक्यता आहे. त्यासाठी इच्छुकांची धावपळ सुरु झाली असून या निवडणुकीसाठी एकूण ५०१ सदस्य मतदान करणार आहेत. त्यामध्ये महायुतीमधील भाजप २६२, एकनाथ शिंदे यांची शिवसेना ७१, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष ४७ असे महायुतीचे एकूण ३८० सदस्य आहेत

तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरेंची शिवसेना २७, काँग्रेस १९, शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस ३४ असे एकूण ७० संख्याबळ आहे. त्याशिवाय अपक्ष ४ तर स्थानिक आघाडीचे ४७ सदस्य आहेत. त्यामुळे या जागेवर महायुतीचा उमेदवार विजयी होणार आहे.

विशेषतः भाजपचे संख्याबळ मोठे असल्याने भाजप इतर पक्षांना जागा सोडण्याची संधी कमी आहे. त्यामुळे उमेदवार काळ असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सोलापूर जिल्हा परिषद महायुतीच्या ताब्यात

सोलापूर जिल्हा परिषदेत ६८ सदस्य असून या ठिकाणी भाजपला बहुमत आहे. भाजप 38, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष ११, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष 5, शिवसेना एकनाथ शिंदे 8, शेकाप 3, करमाळा स्थानिक आघाडी 2, तीर्थक्षेत्र विकास आघाडी 1 असे पक्षीय बलाबल आहे. तर पंचायत समितीच्या ११ सभापतींना या निवडणुकीत मतदानाचा हक्क असणार आहे. त्यामुळे ११ पैकी १० सभापती हे भाजपचे आहेत तर एक सभापती राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे.

सोलापूर महापालिकेवर भाजपचे वर्चस्व

सोलापूर महापालिकेत एकूण १०२ सदस्य असून त्यापैकी भाजपचे ८७, एमआयएम ८, एकनाथ शिंदे शिवसेना ४, काँग्रेस २, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचा एक सदस्य निवडून आला आहे. त्यामुळे याठिकाणी देखील भाजपचे प्राबल्य आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: विधानपरिषद निवडणूक

संबंधित बातम्या

विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

दुहेरी संकट! दुष्काळात ‘करंट’चा झटका; अंगाची लाही अन् विजेचा खोडसाळपणा; भीषण दुष्काळात सोलापूर जिल्ह्यात भारनियमनाचा घाव

October 10, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासा: पंचनामे पूर्ण; केंद्रीय पथक पाहणीसाठी दाखल; आज मंगळवेढ्यात; मदत कधी आणि किती मिळणार?

October 10, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

मृतांच्या टाळूवरचं लोणी! कोरोनातील २२ मृतांवर कागदोपत्री ‘उपचार’ दाखवून लाटले २ कोटी; मृत्यूनंतर ६ वर्षांनी ‘उपचार’?

October 9, 2026
सोन्याच्या पावलांनी गौराई आली…; गौरी पूजनासाठी लागणारे साहित्य कोणते? ‘अशी’ करा पूजेची मांडणी

नवरात्र नऊ नाही, यंदा तब्बल १० दिवसांचे! सप्तमी तिथी वाढली; असा आहे घटस्थापनेचा मुहूर्त

October 10, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

मागणी करा, चारा डेपो लगेच सुरू होणार; सोलापूरच्या शेतकऱ्यांना पालकमंत्र्यांचा मोठा दिलासा; रब्बी पेरणीपूर्वी ‘हे’ तपासण्याचे आवाहन

October 8, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

नागरिकांनो! ग्रामपंचायतीला किती निधी आला, कुठे खर्च झाला? आता मोबाईलवरच पाहता येणार सगळा हिशेब

October 6, 2026
दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी उपसरपंच बालाजी गरड यांची आक्रमक भूमिका; सर्व शेतकऱ्यांना विनाविलंब आर्थिक मदत व दुष्काळ निधी देण्याची मागणी

October 6, 2026
मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

October 5, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

सावकारांनो सावधान! शेतकऱ्यांना अडचणीत आणाल तर थेट…. मंत्री बावनकुळेंचा इशारा, पोलिसांना सूचना, बँकांनांही दिली ताकीद

October 5, 2026
Next Post
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

बँकेची दिशाभूल करण्यासाठी एक थक्क करणारा देखावा; रचला स्वतःच्या मृत्यूचा कट, दारू पाजून मित्रालाच संपवलं; 8 महिन्यानंतर थरारक घटनेचा उलगडा

ताज्या बातम्या

विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

दुहेरी संकट! दुष्काळात ‘करंट’चा झटका; अंगाची लाही अन् विजेचा खोडसाळपणा; भीषण दुष्काळात सोलापूर जिल्ह्यात भारनियमनाचा घाव

October 10, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासा: पंचनामे पूर्ण; केंद्रीय पथक पाहणीसाठी दाखल; आज मंगळवेढ्यात; मदत कधी आणि किती मिळणार?

October 10, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

मृतांच्या टाळूवरचं लोणी! कोरोनातील २२ मृतांवर कागदोपत्री ‘उपचार’ दाखवून लाटले २ कोटी; मृत्यूनंतर ६ वर्षांनी ‘उपचार’?

October 9, 2026
सोन्याच्या पावलांनी गौराई आली…; गौरी पूजनासाठी लागणारे साहित्य कोणते? ‘अशी’ करा पूजेची मांडणी

नवरात्र नऊ नाही, यंदा तब्बल १० दिवसांचे! सप्तमी तिथी वाढली; असा आहे घटस्थापनेचा मुहूर्त

October 10, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

मागणी करा, चारा डेपो लगेच सुरू होणार; सोलापूरच्या शेतकऱ्यांना पालकमंत्र्यांचा मोठा दिलासा; रब्बी पेरणीपूर्वी ‘हे’ तपासण्याचे आवाहन

October 8, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

पाणीटंचाई आणि चाऱ्याचे संकट! सर्व ८ मंडलांतील शेतकऱ्यांना मिळणार मदत; मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही; आ.आवताडे यांची मोठी ग्वाही

October 7, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा