टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा तालुक्यातील खुपसंगी येथील कै.सिताराम केराप्पा सलगर आणि कै. भामाबाई केराप्पा सलगर यांचा १५ वा पुण्यस्मरण सोहळा आज गुरुवार, दि. २३ एप्रिल २०२६ रोजी अत्यंत सात्त्विक आणि मंगलमय वातावरणात आयोजित करण्यात आला आहे.
या निमित्ताने गावात विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.

ह.भ.प. संदेश भोसले महाराज मारोळी यांचे सुश्राव्य कीर्तन
पुण्यस्मरण सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे ह.भ.प. भोसले महाराज यांचे नातू, युवा कीर्तनकार ह.भ.प. संदेश भोसले महाराज (मारोळी) यांचे कीर्तन होणार आहे.

आज गुरुवार सकाळी ११:०० ते १२:०० या वेळेत हे कीर्तन रंगणार असून, रामकृष्ण भजनी मंडळ, खुपसंगी यांच्या साथीने हा कार्यक्रम पार पडेल.
पुष्पार्पण सोहळा
कीर्तनानंतर दुपारी १२:०५ वाजता कै.सीताराम सलगर व कै. भामाबाई सलगर यांच्या प्रतिमेस फुले वाहण्याचा (पुष्पार्पण) कार्यक्रम नियोजित आहे.

याप्रसंगी परिसरातील ग्रामस्थ आणि आप्तेष्ट उपस्थित राहून आपल्या भावना व्यक्त करणार आहेत.
सलगर परिवारातर्फे उपस्थितीचे आवाहन
या पुण्यस्मरण सोहळ्यासाठी सिद्धनाथ साळगर, समस्त सलगर परिवार (खुपसंगी) आणि T.K दयावान ग्रुप (खुपसंगी) यांच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे.

या धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमाला सर्व भाविकांनी आणि ग्रामस्थांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सिध्दनाथ सलगर व सलगर परिवाराकडून करण्यात आले आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













