mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

खळबळ! मंगळवेढ्यात पोलीस पाटलावर जीवघेणा हल्ला; काठ्यांनी बेदम चोपले, सोन्याची साखळी लुटली अन् भरचौकात केली जातीवाचक शिवीगाळ

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
April 2, 2026
in क्राईम, मंगळवेढा
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।

​मंगळवेढा तालुक्यातील मल्लेवाडी येथे एका धक्कादायक घटनेत, पोलीस पाटलांना तिघांनी मिळून बेदम मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ केली.

याप्रकरणी मंगळवेढा पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह (अ‍ॅट्रॉसिटी) चोरी आणि मारहाणीचे विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, मल्लेवाडीचे पोलीस पाटील आनंद आप्पासो रायबाण (वय ४०) हे काल बुधवार, दि.१ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९.३० च्या सुमारास गावातील मुख्य चौकात होते.

यावेळी आरोपी विनायक पाटील, शुभम सोलनकर आणि अजिल माळी (सर्व रा.मल्लेवाडी) यांनी त्यांना घेरले. “तू आमची बदनामी करतोस आणि लोकांजवळ आम्हाला शिवीगाळ करतोस,” असा बनाव रचून आरोपींनी वादाला सुरुवात केली.

​सोन्याची साखळी पळवून काठ्यांनी मारहाण
​वादाचे रूपांतर लवकरच हिंसेत झाले. आरोपींनी पोलीस पाटील रायबाण यांना हातापायाने मारहाण करण्यास सुरुवात केली.

यावेळी सोलनकर याने रायबाण यांच्या गळ्यातील एक तोळ्याची सोन्याची साखळी बळजबरीने हिसकावून घेतली. त्यानंतर तिन्ही आरोपींनी हातात काठ्या घेऊन ‘तुला बघून घेतो’ असे म्हणत त्यांच्या पाठीवर, हातावर आणि पायावर जबर मुक्कामार दिला.

​जातीवाचक शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी

​फिर्यादी आनंद रायबाण हे चर्मकार समाजाचे आहेत हे माहित असतानाही, आरोपींनी त्यांना उद्देशून अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच वाळू उपशाच्या संदर्भात “आम्ही वाळू काढू किंवा काहीही करू, तुझा काय संबंध?” असे म्हणत आरोपींनी त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली.

​पोलीस कारवाई

​या गंभीर प्रकारानंतर आनंद रायबाण यांनी मंगळवेढा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी याप्रकरणी:
​भारतीय न्याय संहिता (BNS): कलम ११८(१), ११९(१), ११५(२), ३५२, ३५१(२)(३), ३(५)
​अ‍ॅट्रॉसिटी कायदा: ३(१)(r), ३(१)(s), ३(२)(va) यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

​या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.बसवराज शिवपुजे हे स्वतः करत आहेत. पोलीस पाटलांसारख्या जबाबदार पदावरील व्यक्तीवर अशा प्रकारे हल्ला झाल्याने मल्लेवाडी परिसरात तणावाचे वातावरण झाले आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: पोलीस पाटील मारहाण

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

मंगळवेढ्यात निसर्गाचे ‘रुद्ररूप’; ४० अंशांच्या तडाख्यानंतर रात्री विजांच्या कडकडाटासह वरुणराजाची तुफानी बॅटिंग; बळीराजाच्या नजरा आकाशाकडे; आज हवामान खात्याचा अंदाज?

April 2, 2026
Breaking! मंगळवेढ्याच्या दोन ‘नायब तहसीलदारां’ची तहसीलदार पदावर पदोन्नती

खड्डा खोदून पूजाविधीचा प्रकार; मंगळवेढ्यात भीतीचे वातावरण; नरबळीच्या अफवेने परिसरात खळबळ; पोलिसांचा मोठा खुलासा

April 1, 2026
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण

मंगळवेढ्यात भाजप महिला मोर्चाचे रणशिंग; तालुका कार्यकारिणी जाहीर; पक्ष बळकटीकरणाचा निर्धार; आशा पाटील यांनी केली निवडीची अधिकृत घोषणा

April 1, 2026
मंगळवेढ्यात विद्यार्थ्यांसाठी ‘सुवर्णसंधी’! एका कोर्सच्या फीमध्ये दुसरा कोर्स मोफत; ACTI कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटची ऑफर; महिला दिनानिमित्त मुलींना विशेष सवलत

बांधकाम कामगारच्या मुलांना कॉप्युटर कोर्स नंतर मिळणार, ‘एवढे’ रुपये; आम्ही फक्त AI वापरण्यापुरते शिकवत नाही; AI तयार करायला शिकवतो; आता मंगळवेढा व नंदेश्वर मध्ये ACTI

April 1, 2026
महिलांनो! बसने प्रवास करताय तर सावधान, मंगळवेढा बसस्थानकावरून महिला प्रवाशाचे १० लाख किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात पळविले; स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल

भरदिवसा धाडसी चोरी! ​मंगळवेढा एसटी स्टँडवर गर्दीचा फायदा; बसमध्ये चढताना महिलेचे ६० हजारांचे गंठण चोरीला

April 1, 2026
मरवडे-चडचण रोडवर अपघात; एका कामगाराचा मृत्यू,महिला गंभीर जखमी

धक्कादायक! लग्नाच्या गाठी बांधण्यापूर्वीच काळाचा घाला; देवदर्शनाला निघालेल्या तरुणीचा मंगळवेढ्यात अपघातात अंत; होणारा पती जखमी

March 31, 2026
पालकांची चिंता! मंगळवेढ्यात ओल्या आणि सुक्या माव्याचा विळखा: युवा पिढीचे आरोग्य धोक्यात, प्रशासनाचे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष; नागरिकांची तस्करीवर बंदीची मागणी

पालकांची चिंता! मंगळवेढ्यात ओल्या आणि सुक्या माव्याचा विळखा: युवा पिढीचे आरोग्य धोक्यात, प्रशासनाचे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष; नागरिकांची तस्करीवर बंदीची मागणी

March 29, 2026
नागरिकांनो लक्ष द्या! मंगळवेढ्यातील सर्व दवाखाने,क्लिनिक आज बंद राहणार

धक्कादायक! सरकारी रुग्णालयात दाखल 6 वर्षीय चिमुकल्याचे डॉक्टरने दुसरेच बोट काढले; पंढरपुरातील घटनेने खळबळ

March 29, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! बंद दरवाजा उघडताच दिसला भाच्याचा मृतदेह; मंगळवेढ्यात एका दुर्दैवी घटनेने कुटुंबावर शोककळा

March 28, 2026
Next Post
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! आधी तीनही मुलांना विष पाजले; नंतर स्वतः पिऊन पित्याने जीवन संपवले; सोलापूर जिल्ह्यातील घटना; तिघांवर उपचार सुरू

ताज्या बातम्या

महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

मंगळवेढ्यात निसर्गाचे ‘रुद्ररूप’; ४० अंशांच्या तडाख्यानंतर रात्री विजांच्या कडकडाटासह वरुणराजाची तुफानी बॅटिंग; बळीराजाच्या नजरा आकाशाकडे; आज हवामान खात्याचा अंदाज?

April 2, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! आधी तीनही मुलांना विष पाजले; नंतर स्वतः पिऊन पित्याने जीवन संपवले; सोलापूर जिल्ह्यातील घटना; तिघांवर उपचार सुरू

April 2, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

खळबळ! मंगळवेढ्यात पोलीस पाटलावर जीवघेणा हल्ला; काठ्यांनी बेदम चोपले, सोन्याची साखळी लुटली अन् भरचौकात केली जातीवाचक शिवीगाळ

April 2, 2026
Breaking! मंगळवेढ्याच्या दोन ‘नायब तहसीलदारां’ची तहसीलदार पदावर पदोन्नती

खड्डा खोदून पूजाविधीचा प्रकार; मंगळवेढ्यात भीतीचे वातावरण; नरबळीच्या अफवेने परिसरात खळबळ; पोलिसांचा मोठा खुलासा

April 1, 2026
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण

मंगळवेढ्यात भाजप महिला मोर्चाचे रणशिंग; तालुका कार्यकारिणी जाहीर; पक्ष बळकटीकरणाचा निर्धार; आशा पाटील यांनी केली निवडीची अधिकृत घोषणा

April 1, 2026
मंगळवेढ्यात विद्यार्थ्यांसाठी ‘सुवर्णसंधी’! एका कोर्सच्या फीमध्ये दुसरा कोर्स मोफत; ACTI कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटची ऑफर; महिला दिनानिमित्त मुलींना विशेष सवलत

बांधकाम कामगारच्या मुलांना कॉप्युटर कोर्स नंतर मिळणार, ‘एवढे’ रुपये; आम्ही फक्त AI वापरण्यापुरते शिकवत नाही; AI तयार करायला शिकवतो; आता मंगळवेढा व नंदेश्वर मध्ये ACTI

April 1, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..