मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।
शेतीच्या बांधाच्या कारणावरून माढा तालुक्यातील जाखले येथील ६८ वर्षीय वृद्धावर हल्ला करून खुनाची घटना शनिवारी (दि. १४) दुपारी २ ते २:३०च्या सुमारास घडली.

हनुमंत रघुनाथ गायकवाड असे मयत व्यक्तीचे नाव आहे. संशयित आरोपी उत्तरेश्वर रघुनाथ गायकवाड (वय ५४) यास पोलिसांनी रात्री उशिरा ताब्यात घेऊन गुन्हा नोंदला. माढा न्यायालयाने त्याला २० फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार शनिवारी दुपारी २ ते २:३० वाजण्याचा सुमारास जाखले (ता. माढा) येथील गट क्रमांक ७९/१ मधील शेतीच्या बांधाच्या कारणावरून मयत हनुमंत गायकवाड यांचा सख्खा भाऊ उत्तरेश्वर रघुनाथ गायकवाड याने डोक्यात घन व छातीवर दगडाने मारून जखमी केले.

ही माहिती मेहुणे फिर्यादी वामन धोंडिबा पवार (रा. चौभे पिंपरी) यांना मिळताच त्यांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या हनुमंत गायकवाड यांना टेंभुर्णी येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच हनुमंत गायकवाड यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

पोलिस निरीक्षक नारायण पवार यांचा मार्गदर्शनाखाली अधिक तपास सपोनि गणेश चौधरी करीत आहेत. उत्तरेश्वर गायकवाड यास माढा न्यायालयापुढे उभे केले असता २० फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे.

खून झालेले हनुमंत गायकवाड हे आध्यात्मिक प्रवृत्तीचे होते. भजनाबरोबरच प्रवचनही ते देत होते. त्यांचा अशा पद्धतीने भाऊबंदकीतून झालेल्या खुनाबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.

एक मुलगा परदेशात दुसरा पुण्यात
हनुमंत गायकवाड हे शेतात एकटेच राहण्यास होते. त्यांचा एक मुलगा परदेशात तर पत्नी, दुसरा मुलगा व सून हे पुण्यात राहण्यास आहेत. मयत हनुमंत व संशयित आरोपी उत्तरेश्वर व नवनाथ, अशा तिघा भावांत प्रत्येकी दोन-दोन एकर जमीन वाटणीस आली होती. बांधाच्या कारणावरून त्यांच्यात वाद सतत होत होते, अशी माहिती समोर आली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












