मंगळवेढा टाईम्स टीम । इंदापूर येथे आणखी दोन महिला कोरोनाग्रस्त आढळल्याने शहरातील बाधितांची संख्या १३ वर पोहोचली आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत चालल्याने शहरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांनी घाबरून न जाता शासनच्या नियमांचे पालन करून आपले व कुटुंबांचे संरक्षण करावे , असे आवाहन नगराध्यक्षा अंकिता शहा यांनी केले. Two more coronated in Indapur corona virus
पुण्यातून आलेल्या शहरातील वेगवेगळ्या भागातील दोन महिला कोरोनाग्रस्त असल्याचे बुधवारी आढळून आले आहे.
त्यांच्या संपर्कातील एकूण सतराजणांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. त्यांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. मूळची पुण्याची असणारी व चार दिवसांपूर्वी येथे नातेवाइकांकडे आलेली ४५ वर्षीय व माळवाडी ग्रुप ग्रामपंचायतीच्या हद्दीतील ४७ वर्षीय अशा दोन महिलांना कोरोनाची लागण झाली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज