mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

शेतकऱ्यांनो! कोल्हापुरात उसाला 3500 रुपयांचा दर मिळतो मग सोलापुरातच 2800 का? शेतकरी आक्रमक; ‘या’ तारखेपासून आमरण उपोषण

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
December 4, 2025
in सोलापूर
ऊसाची पहिली उचल 2500 जाहिर करा व अंतीम बिल 3100 द्या; स्वाभिमानी शेतकरी संघटना या मागणीवर ठाम

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।

ऊस दराच्या मुद्यावरुन सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आणि शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. साखर कारखाने सुरु होऊन एक महिन्याचा कालावधी पूर्ण झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील अनेक साखर कारखानदारांनी उसाचा पहिला हप्ता 2800 ते 2850 जाहीर केला आहे.

मात्र, शेजारील कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी उसाचा दर हा 3500 ते 3600 रुपये देणार असल्याचे जाहीर केले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांना जर 3 हजार 500 रुपयांचा दर देणं शक्य असेल तर सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानादरांना तेवढा दर देणं का शक्य नाही? असा सवाल शेतकऱ्यांनी केला आहे.

कारखानदारांनी जर 3500 रुपये दर जाहीर केला नाहीतर 8 डिसेंबरपासून शेतकरी नेते समाधान फाटेसह इतर शेतकरी आमरण उपोषण करणार आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी उसाचा पहिला हप्ता 3500 रुपये जाहीर करावा

सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी देखील उसाचा पहिला हप्ता 3500 रुपये जाहीर करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. कारखानदारांनी जर उसाला 3500 रुपयांचा दर जाहीर केला नाहीतर 8 डिसेंबरपासून पंढरपुरातील वाखरी पालखीतळ आमरण उपोषण करण्यात येणार आहे. याबाबतचे निवेदन देखील पंढरपुरच्या तहसीलदारांना देण्यात आले आहे.

ऊस दर ठरवताना कारखानदारांची एकी

ऊस दरासाठी शेतकरी संघटनेच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी साथ देण्याचे आवाहन शेतकरी संगटनेच्या कार्यकर्त्यांनी केले आहे. 8 तारखेपासून वाखरी पालखीतळ येथे आमरण उपोषण करण्यात येणार आहे.

शेजारील जिल्ह्यांमधे 3200 ते 3500 पहिला हफ्ता मिळत असताना आपल्या सोलापूर जिल्ह्यातील कारखानदारांनी मात्र 2800 ते 2850 पहिला हफ्ता जाहिर केला आहे. या कारखानदारांचा उघडपणे कितीही एकमेकाला विरोध असला तरी ऊस दर ठरवताना मात्र यांची एकी पुन्हा एकदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बघायला मिळाली आहे. याच कारखानदारांच्या विरोधात आता शेतकरी संघटनांनी गांधीगिरी मार्गाने आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतलेला आहे.

शेतकऱ्यांनी पक्ष पार्टी गट तट न बघता या आंदोलनामधे सामिल व्हावं, शेतकरी नेत्यांचं आवाहन

या निमित्ताने 2017 मधे झालेल्या आंदोलनाची पुनरावृत्ती करायची असेल 3500 हजार रुपये पहिला हफ्ता घ्यायचा आसेल तर शेतकऱ्यांनी देखील पक्ष पार्टी गट तट न बघता या आंदोलनामधे सामिल होण्याचे आवाहन शेतकरी चळवळीतील नेते निवास नागणे यांनी केले आहे.

या ऊस दरासाठीच्या उपोषणाच्या निमित्ताने गावभेट दौरे करुन शेतकऱ्यांमधून जनजागृती देखील करण्यात येणार असल्याची माहिती समाधान फाटे, निवास नागणे, निरंजन ताटे, विनोद बागल, दत्तात्रय बिल्डर या शेतकऱ्यांनी दिली आहे.

सोलापूर जिल्ह्यात उसाला अतिवृष्टी आणि पुराचा मोठा फटका

पश्चिम महाराष्ट्रातील महत्वाचं पिकं म्हणजे ऊस आहे. ऊस शेतीवर या भागातील हजारो प्रपंच उभे आहेत. मात्र, या वर्षी सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पुराचा मोठा फटका ऊस पिकाला बसलाय. एका बाजूला शेतकरी आस्मानी संकटात आहे आणि दुसऱ्या बाजूला कारखानदारांनी दर जाहीर न केल्यामुळं सुलतानी संकटात आहे.(स्रोत:abp माझा)

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: ऊसदर आंदोलन

संबंधित बातम्या

मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

एका रागाचा असाही अंत! मोबाईलवरून रागावताच नववीच्या विद्यार्थ्याने उचलले टोकाचे पाऊल; सोलापुरात पालकांवर दुःखाचा डोंगर

March 21, 2026
ईदचा गोडवा वाढला! अनिल (दादा) सावंत फाउंडेशनकडून ३ हजार लिटर दुधाचे मोफत वाटप; मंगळवेढ्यात सामाजिक सलोख्याची नवी मिसाल; उपक्रमाचे सर्वत्र कौतुक

ईदचा गोडवा वाढला! अनिल (दादा) सावंत फाउंडेशनकडून ३ हजार लिटर दुधाचे मोफत वाटप; मंगळवेढ्यात सामाजिक सलोख्याची नवी मिसाल; उपक्रमाचे सर्वत्र कौतुक

March 21, 2026
सोलापुरात शेतकऱ्याच्या पत्नीने घरातून साडेचार लाखांच्या दागिनेसह रोख रक्कम घेऊन केले पलायन

काय झाडी, काय डोंगर… अन काय तो पेपर! भूगोलाच्या पेपरात ‘नापास’ होण्याची भीती, पठ्ठ्यानं थेट प्रश्नपत्रिकाच केली चोरी

March 20, 2026
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

बळीराजासाठी आनंदाची बातमी! उजनीतून कालवा आणि बोगद्याद्वारे पाणी सोडण्यास सुरुवात; ‘एवढ्या’ लाभक्षेत्राला पाणी मिळणार; ‘या’ अखेरपर्यंत पाणी चालू राहणार

March 19, 2026
नंदूरमध्ये ‘श्रीकृपा अर्बन को-ऑप क्रेडिट’ संस्थेचा दिमाखदार शुभारंभ; आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर होणार उद्घाटन

नंदूरमध्ये ‘श्रीकृपा अर्बन को-ऑप क्रेडिट’ संस्थेचा दिमाखदार शुभारंभ; आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर होणार उद्घाटन

March 19, 2026
शेतकऱ्यांनो! मंगळवेढ्यात ‘प्रभात इलेक्ट्रिकल’ आजपासून सेवेसाठी सज्ज; डीपी उभारणी व दुरुस्ती त्वरित; शेतकऱ्यांच्या वेळेची आणि पैशांची होणार मोठी बचत

शेतकऱ्यांनो! मंगळवेढ्यात ‘प्रभात इलेक्ट्रिकल’ आजपासून सेवेसाठी सज्ज; डीपी उभारणी व दुरुस्ती त्वरित; शेतकऱ्यांच्या वेळेची आणि पैशांची होणार मोठी बचत

March 19, 2026
वाटचाल सोनपावलांची! श्री वैभवलक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती बँकेचा आज तिसरा वर्धापनदिन; बँकेची सोने तारण व 6 वर्षात दाम दुप्पट योजना झाली लोकप्रिय

वाटचाल सोनपावलांची! श्री वैभवलक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती बँकेचा आज तिसरा वर्धापनदिन; बँकेची सोने तारण व 6 वर्षात दाम दुप्पट योजना झाली लोकप्रिय

March 19, 2026
मंगळवेढ्यातील दोन महिलांनी अनेकांना घातला लाखोंचा गंडा; मोठे रॅकेट उघडकीस येणार

​पोलिसांचा आशीर्वाद की यंत्रणेचा सुस्तपणा? गुन्हा दाखल असलेले ‘ते’ १० विद्यार्थी अजूनही मोकाटच; मनसेचा पोलीस महानिरीक्षकांना सवाल

March 18, 2026
दक्षिण भागात म्हैसाळचे पाणी “टेल टू हेड” मिळणेसाठी आ.आवताडे यांची विधानसभेत मागणी; देवेंद्र फडणवीस यांचे सकारात्मक उत्तर

नदी वाचवा, निधी द्या! भीमेच्या शुद्धीकरणासाठी १०० कोटी द्या; आमदार आवताडेंची सरकारकडे आग्रही मागणी; विधानसभेत घुमवला आवाज

March 17, 2026
Next Post
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

गुड न्यूज! तब्बल 15 हजार 631 पदांसाठी पोलिस भरती, अर्ज करण्यास मुदतवाढ; 'या' पदांसाठी करा अर्ज

ताज्या बातम्या

मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

एका रागाचा असाही अंत! मोबाईलवरून रागावताच नववीच्या विद्यार्थ्याने उचलले टोकाचे पाऊल; सोलापुरात पालकांवर दुःखाचा डोंगर

March 21, 2026
ईदचा गोडवा वाढला! अनिल (दादा) सावंत फाउंडेशनकडून ३ हजार लिटर दुधाचे मोफत वाटप; मंगळवेढ्यात सामाजिक सलोख्याची नवी मिसाल; उपक्रमाचे सर्वत्र कौतुक

ईदचा गोडवा वाढला! अनिल (दादा) सावंत फाउंडेशनकडून ३ हजार लिटर दुधाचे मोफत वाटप; मंगळवेढ्यात सामाजिक सलोख्याची नवी मिसाल; उपक्रमाचे सर्वत्र कौतुक

March 21, 2026
कोरोनाचे संकटामुळे राज्यसेवा पुर्व परिक्षा पुन्हा पुढे ढकलली

​मंगळवेढ्यात अवैध क्लासेसचा सुळसुळाट; पदवी नसलेलेही ‘मुन्नाभाई’ शिकवतायत धडे; शिक्षणाच्या नावाखाली पालकांची लूट, अवैध क्लासेसवर कारवाई कधी? प्रशासन झोपलेय का?

March 21, 2026
अशोक खरातची संगत भोवली, रुपाली चाकणकरांचा अखेर राजीनामा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा पहिला मोठा निर्णय; चाकणकर यांनी पत्रात काय लिहिलं?

अशोक खरातची संगत भोवली, रुपाली चाकणकरांचा अखेर राजीनामा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा पहिला मोठा निर्णय; चाकणकर यांनी पत्रात काय लिहिलं?

March 21, 2026
सोलापुरात शेतकऱ्याच्या पत्नीने घरातून साडेचार लाखांच्या दागिनेसह रोख रक्कम घेऊन केले पलायन

काय झाडी, काय डोंगर… अन काय तो पेपर! भूगोलाच्या पेपरात ‘नापास’ होण्याची भीती, पठ्ठ्यानं थेट प्रश्नपत्रिकाच केली चोरी

March 20, 2026
वृक्षारोपणाने गुंफले सामाजिक उत्तरदायित्व! श्री वैभवलक्ष्मी महिला पतसंस्थेचा ३रा वर्धापनदिन दिमाखात साजरा

वृक्षारोपणाने गुंफले सामाजिक उत्तरदायित्व! श्री वैभवलक्ष्मी महिला पतसंस्थेचा ३रा वर्धापनदिन दिमाखात साजरा

March 20, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..