टीम मंगळवेढा टाईम्स ।
मी आत एक आणि बाहेर एक भूमिका घेणारा माणूस नाही मी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला भक्कमपणे साथ देणार आहे त्यांना निवडून आणणार आहे,
आम्ही जे बोलतो तेच करण्याचे काम आतापर्यंत केले आहे जनतेने खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन आमदार समाधान यांनी केले आहे.

मंगळवेढा नगरपालिका भाजप नगराध्यक्ष उमेदवार सुजाता अजित जगताप यांच्या प्रचारार्थ आयोजित कॉर्नर सभेत ते बोलत होते.
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष प्रकाश गायकवाड, पक्षनेते अजित जगताप, नगरसेवक सोमनाथ आवताडे, बाबा कोंडूभैरी, गौरीशंकर बुरकुल, नितीन मेटकरी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

आमदार समाधान आवताडे पुढे बोलताना म्हणाले की,मी 2014 पासून राजकारण सक्रिय असून मी आतापर्यंत दिलेला शब्द कधीच बदललेला नाही व बदलणारही नाही असा ठाम विश्वास यावेळी व्यक्त केला.

मंगळवेढा शहराचा झपाट्याने विकास करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा असे आवाहन आमदार समाधान आवताडे यांनी केले आहे.

आमदार फंडातून आतापर्यंत शहराच्या विकासासाठी जी मोठी विकास कामे झाली आहेत त्या धर्तीवर जनता भक्कमपणाने आमच्या पाठीमागे उभी राहणार आहे.
मंगळवेढा शहराचा अजून भरपूर विकास करायचा आहे. अनेक मोठ्या योजना राबवायच्या आहेत, चांगली कामे करायची आहेत, त्यासाठी चांगली माणसे निवडून आली पाहिजेत माझे व पक्षाचे धोरण आहे.

मंगळवेढा शहरात भाविक येण्यासाठी महात्मा बसवेश्वरांचे स्मारक व संतसृष्टी हे होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस व पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे मोठे स्वप्न असून हे स्वप्न लवकरच साकार होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











