mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

कामाची बातमी! महाराष्ट्रातील नव्या उद्योजकांसाठी खुशखबर; ‘एवढ्या’ लाखांची मदत मिळणार, ‘या’ फंडिंग’ योजना जाहीर

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 20, 2025
in राज्य, शैक्षणिक
महत्वाची बातमी! आजपासून ‘हे’ नियम बदलले, थेट आपल्या खिशावर होणार परिणाम; जाणून घ्या

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।

केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या “जेनिसिस (जनरेशन नेक्स्ट सपोर्ट फॉर इनोव्हेटिव्ह स्टार्टअप्स) उपक्रमांतर्गत देशातील नवोन्मेषी उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी दोन नवीन योजना जाहीर करण्यात आल्या आहेत.

या योजनांमध्ये “मॅचिंग इन्व्हेस्टमेंट घटक निधी योजना” आणि “पायलट प्रकल्प निधी योजना” समाविष्ट आहेत. या योजनांद्वारे पात्र नवउद्योजकांना त्यांच्या तंत्रज्ञानाधारित प्रकल्पांना वेग देण्यासाठी ५० आणि ४० लाख रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे.

या दोन्ही योजना मराठवाडा अॅक्सिलरेटर फॉर ग्रोथ अँड इन्क्युबेशन कौन्सिल (मॅजिक) या मान्यताप्राप्त स्टार्टअप इंक्युबेटर केंद्रामार्फत राबविण्यात येत आहेत.

मॅजिक हे भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या जेनिसिस उपक्रमाचे अधिकृत अंमलबजावणी केंद्र असून देशातील ग्रामीण आणि उपनगरी भागातील नवउद्योजकांना राष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्यासाठी कार्यरत आहे.

मॅचिंग इन्व्हेस्टमेंट निधी योजनेंतर्गत तंत्रज्ञानावर आधारित उत्पादन किंवा सॉफ्टवेअर तयार करणाऱ्या स्टार्टअप्सना ५० लाख रुपयांपर्यंत निधी सहाय्य दिले जाईल.

यासाठी भारतात नोंदणीकृत प्रायव्हेट लिमिटेड कंपनी (किमान ५१ टक्के भारतीय मालकी आवश्यक), औद्योगिक व अंतर्गत व्यापार संवर्धन विभागाकडून (डीपीआयआयटी) मान्यता प्राप्त स्टार्टअप, टिअर दोन किंवा टिअर तीन शहरातून कार्यरत,

बाजारपेठेसाठी तयार उत्पादन अथवा सॉफ्टवेअर असणे आवश्यक, महसूल मिळवणाऱ्या अथवा बाजारात प्रचलित झालेल्या उपक्रमांना प्राधान्य, पूर्वी टाइड २.० किंवा समृद्ध योजनेतून निधी न मिळालेला असणे आवश्यक आहे.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी bit.ly/GENESIS_PFC या संकेतस्थळावर अर्ज करावा, अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० ऑक्टोबर आहे.

पायलट प्रकल्प निधी योजनेंतर्गत नवउद्योजकांना खासगी उद्योगसंस्था, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम किंवा मोठ्या औद्योगिक गटांबरोबर प्रत्यक्ष पायलट प्रकल्प राबविण्यासाठी ४० लाख रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य मिळू शकते.

यासाठी डीपीआयआयटी मान्यता आवश्यक, कार्यक्षम नमुना (प्रोटोटाइप) तयार असणे आवश्यक, संस्थापक पूर्णवेळ उपक्रमाशी निगडित असणे आवश्यक आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी bit.ly/GENESIS_PILOT या संकेतस्थळावर अर्ज करावा, अर्ज करण्याची अंतिम तारीख पाच नोव्हेंबर आहे.

स्टार्टअप्सनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा आणि आपल्या नवकल्पनांना पुढील स्तरावर नेण्यासाठी त्वरित अर्ज करावा, असे आवाहन मॅजिकतर्फे करण्यात आले आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: नवे उद्योजक

संबंधित बातम्या

मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मोठी बातमी! दुष्काळाच्या झळा; दोन शेतकऱ्यांनी गमावला जीव, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

September 26, 2026

राज्यात दोन टप्प्यात दुष्काळ जाहीर होणार? पहिल्या 139 तालुक्यांची यादी आली समोर; सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यांचा समावेश

September 26, 2026
कै.आण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवेढयात विविध कार्यक्रम; सामाजिक कार्याबद्दल ‘यांना’ पुरस्कार जाहीर

कै.आण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त मंगळवेढ्यात आज पुरस्कार सोहळा; आमदार आवताडेंच्या हस्ते होणार सन्मान; पाहा कोणा-कोणाला मिळणार मानाचा ‘समाजभूषण पुरस्कार’?

September 25, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी मोठा निर्णय! सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळांचा होणार कायापालट; वाचा सविस्तर योजना

September 22, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी बातमी! तुकाराम मुंढे यांच्या प्रयत्नांना यश; रुग्णांना मिळणार ‘हा’ मोठा दिलासा; केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

September 22, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

​जमीन खरेदी-विक्रीत मोठा बदल! महाराष्ट्रात लवकरच ‘लँड टायटलिंग कायदा’; जमिनीच्या वादांवर सरकारचा कायमचा तोडगा

September 20, 2026

​पावसाचा खंड पडल्याने सरकार अलर्ट! विहिरी खोदण्यावर बंधने, पाणी चोरी रोखण्यासाठी संयुक्त पथके सज्ज; शासनाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय

September 20, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

एसटीचा प्रवास अधिक सोपा! आता धावत्या बसमध्येच होणार NCMC कार्ड रिचार्ज; महिला अन् ज्येष्ठ नागरिकांची पायपीट थांबली

September 19, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

मोठी बातमी! राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी व बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर

September 18, 2026
Next Post
अभिनंदनास्पद! तहसीलदार मदन जाधव यांना महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावरील ‘उत्कृष्ट अधिकारी’ म्हणून पुरस्कार जाहीर

मोठी बातमी! अतिवृष्टी शेतकऱ्यांची भरपाई कर्जात वळवल्यास कडक कारवाई; मंगळवेढा तहसीलदारांनी बँकांना दिले आदेश

ताज्या बातम्या

मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मोठी बातमी! दुष्काळाच्या झळा; दोन शेतकऱ्यांनी गमावला जीव, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

September 26, 2026

राज्यात दोन टप्प्यात दुष्काळ जाहीर होणार? पहिल्या 139 तालुक्यांची यादी आली समोर; सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यांचा समावेश

September 26, 2026
कै.आण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवेढयात विविध कार्यक्रम; सामाजिक कार्याबद्दल ‘यांना’ पुरस्कार जाहीर

कै.आण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त मंगळवेढ्यात आज पुरस्कार सोहळा; आमदार आवताडेंच्या हस्ते होणार सन्मान; पाहा कोणा-कोणाला मिळणार मानाचा ‘समाजभूषण पुरस्कार’?

September 25, 2026
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

घरात तहान, पाणी कर्नाटकच्या दारात! उजनी कालवाच्या गळतीमुळे मंगळवेढ्यातील शेतकरी संकटात; पाटबंधारे विभागाविरोधात संताप

September 24, 2026
अनाथ, वंचितांच्या आयुष्याला मायेची सावली: निंबोणीचे ‘सहारा बाल सेवा आश्रम’ ठरतेय निराधार चिमुकल्यांचे हक्काचे घर; ​शासकीय अनुदानाविना केवळ लोकवर्गणीतून उभा राहतोय मानवतेचा वसा

अनाथ, वंचितांच्या आयुष्याला मायेची सावली: निंबोणीचे ‘सहारा बाल सेवा आश्रम’ ठरतेय निराधार चिमुकल्यांचे हक्काचे घर; ​शासकीय अनुदानाविना केवळ लोकवर्गणीतून उभा राहतोय मानवतेचा वसा

September 24, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

आमदार समाधान आवताडेंचा मास्टरस्ट्रोक! प्रशासकीय कामांसाठी सोलापूरला जाण्याची कटकट संपली; पंढरपूरला अपर जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर; ‘या’ सात तालुक्यांना मोठा दिलासा

September 23, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा