टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात कोरोनाने आपली पकड घट्ट केली असून तालुक्यातील लक्ष्मी दहिवडी 80 वर्षीय पुरुषाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण बळींची संख्या 26 झाली आहे तर कोरोना बाधितांची संख्या 1 हजार 216 वर गेली आहे.
शहरात व ग्रामीण भागात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढतच चालला असून आज पुन्हा 13 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. आज तब्बल 49 जणांना उपचारानंतर घरी सोडणेत आलेले आहे.
आज दिनांक 02/10/2020 रोजी एकाही नागरीकांचे स्वब ( RT – PCR ) कोरोना चाचणी अहवाल तपासणी कामी घेणेत आलेले नाहीत.तसेच आज दिनांक 02/10/2020 रोजी 24 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट घेण्यात आलेल्या आहेत.
वरील 24 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट केलेल्या नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह 08 आणि निगेटिव्ह 16 आलेले आहेत . सदर नागरिक मौजे मंगळवेढा -07 , सलगर बु . – 01 येथील निकटतम पॉझिटिव्ह रुग्णाचे संपर्कातील आहेत .
सोलापूर येथे पाठविणेत आलेले स्वब ( RT – PCR ) चे आज 05 नागरीकांचा पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झालेला आहेत . मंगळवेढा -03 , आंधळगांव -01 , ब्रम्हपुरी -01 येथील निकटतम पॉझिटिव्ह रुग्णाचे संपर्कातील आहेत.
मंगळवेढा तालुक्यात आतापर्यंत 1 हजार 216 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 989 रुग्णांना उपचार कालावधी नंतर घरी सोडण्यात आले आहे. आणि आतापर्यंत 201 रुग्णांवर उपचार सुरू आहेत व आत्तापर्यंत 26 जणांचा मृत्यू झाला आहे.
नागरिकांची योग्य ती काळजी घेत प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज