mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

धक्कादायक! मुलीच्या कमाईवर जगत असल्याच्या टोमण्यांमुळे वडिलांकडून मुलीची हत्या

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
July 13, 2025
in क्राईम, राष्ट्रीय
बापाचे पाऊल वाकडे पडले,मुलाने त्याला यमसदनी धाडले; बेकरी चालकाच्या हत्येचे गूढ उकलले

मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्किंग ।

टेनिसपटू राधिका यादव हिच्या कमाईवर जगत असल्याने तिचे वडील दीपक यादवला सतत टोमणे मारण्यात येत असत. त्यामुळे संतापून तिची हत्या केली, अशी कबुली आरोपीने पोलिसांना दिली आहे. राधिका चालवत असलेल्या टेनिस प्रशिक्षण संस्थेवरूनही तिचे वडिलांशी वाद झाले होते. आरोपी दीपकला न्यायालयाने शुक्रवारी एक दिवसाची पोलिस कोठडी दिली.

त्याला दोन दिवसांची कोठडी देण्यात यावी अशी मागणी पोलिसांनी केली होती. पहिल्या मजल्यावर हा गोळीबार झाला त्यावेळी राधिकाची आई मंजू यादव त्याच ठिकाणी होती, असे दीपकचा भाऊ कुलदीप यादव याने पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

मंजू ही गोळीबाराच्या वेळी तळमजल्यावर होती, असे आधी पोलिसांना सांगण्यात आले होते. कुलदीप यांनी सांगितले की दीपक, त्याची पत्नी मंजू आणि मुलगी राधिका हे तिघेही या घराच्या पहिल्या मजल्यावर राहत होते, तर मी कुटुंबासह तळमजल्यावर राहतो.

गुरुवारी सकाळी १०:३० च्या सुमारास स्फोटासारखा आवाज ऐकू आला. त्यामुळे मी धावत पहिल्या मजल्यावर गेलो. तिथे राधिका स्वयंपाकघरात रक्ताच्या थारोळ्यात, तर रिव्हॉल्व्हर ड्रॉइंग रूममध्ये पडलेले होते.

तेवढ्यात माझा मुलगा पीयूष यादवही तळमजल्यावरून पहिल्या मजल्यावर आला. आम्ही दोघांनी राधिकाला तातडीने एशिया मारिंगो रुग्णालयात नेले; पण तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. (वृत्तसंस्था)

उत्तम टेनिसपटू

गुरुग्राम पोलिसांनी सांगितले की, राधिका एक टेनिस अकॅडमी चालवत होती. आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशनने राधिकाला १९९९वा क्रमांक दिला होता.

राधिकाने या वर्षी सुरुवातीला इंदूर आणि क्वालालंपूर स्पर्धामध्ये भाग घेतला होता. मात्र त्या मुख्य फेरीच्या नव्हे, तर पात्रता फेरीच्या स्पर्धा होत्या.

प्रेमगीताचा व्हिडीओ तयार केला

टेनिसपटू राधिका यादव हिने गेल्या वर्षी एका कलाकारासोबत प्रेमगीताच्या व्हिडीओचे चित्रीकरण केले होते. त्यामुळेही तिच्या घरात तणाव वाढला होता. राधिकाच्या पाठीवर तीन व खांद्यावर एक अशा चार गोळ्या लागल्या. तिच्या पार्थिवावर शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.

राधिकाने टेनिस प्रशिक्षण अकादमी 3 चालविणे तिच्या वडिलांना पसंत नव्हते. ती संस्था बंद करावी, असा वडिलांनी दिलेला आदेश मानण्यास तिने नकार दिला होता. तिचे वडील दीपक यादव हा गेल्या १५ दिवसांपासून विलक्षण निराश होते, असेही तपासात उघड झाले आहे.

आई घरातच होती, मग…

या प्रकरणात ज्या वेळी मुलीची हत्या झाली, त्या वेळी आई मंजू यादव घरीच होती. याची माहिती राधिकाच्या वडिलांविरुद्ध एफआयआर दाखल करणारे काका कुलदीप यादव यांनीही दिली. त्यांनी सांगितले की गोळीचा आवाज ऐकून जेव्हा ते घरी पोहोचले, तेव्हा आई तिथेच होती.

पोलिसांनी विचारणा केली असता, आईने या प्रकरणावर काहीही सांगण्यास नकार दिला. मी आजारी होते, असे तीने सांगितले.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: बापाकडून मुलीची हत्या

संबंधित बातम्या

खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

सावधान! मंगळवेढ्याच्या महिलेचा सांगोला बसस्थानकावर हातसफाईचा डाव; पोलिसांनी २४ तासांत ठोकल्या बेड्या

September 11, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

चौकात मित्रांसोबत गप्पा मारत बसले होते, अचानक समोरून आले आणि दोन तरुणांवर चाकूने केला हल्ला; मंगळवेढ्यात खळबळजनक घटना

September 10, 2026
धक्कादायक! सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती व सासूविरुद्ध फिर्याद दाखल

धक्कादायक! सावकारी त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; मंगळवेढा शहरातील घटना, ‘या’ सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल

September 10, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

खळबळ! विवाह जुळत नसल्याने तरुणाने केला नायब तहसीलदार असल्याचा बनाव; लन्नानंतर पुढे जे घडलं, पत्नीने पोलीस स्टेशन गाठलं

September 7, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

दारूचे व्यसन ठरले आईच्या जीवावर; पैसे न दिल्याने पोटच्या मुलाने आईला संपवले, आरोपी गजाआड

September 1, 2026
सोलापूर ग्रामीणमध्ये आज 244 जण कोरोनामुक्त, 223 नवे रुग्ण; वीस वर्षीय तरुणीचा मृत्यू

मोठी बातमी! कोरोनानंतर आता पुन्हा एका आजाराने डोके काढले वर; रुग्णांची संख्या वाढतेय झपाट्याने, गेल्या 24 तासांत…

August 26, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

बाबो..! कुत्र्याने कोंबडी पळवल्यावरून दोन कुटुंबांमध्ये हाणामारी; चौघांवर गुन्हा; कोंबडीच्या मागे कुत्रे लागल्यावरून चौघांकडून मारहाण

August 25, 2026
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

सावधान! बचत गट अन् भिशीच्या नावाखाली अडीच कोटींची फसवणूक, तिघांवर गुन्हा; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

August 26, 2026

शाळेत ‘तालिबानी’ कृत्य! शिक्षकाने लाकडी पट्टी अन् बुक्क्यांनी मुलाला तुडवले, २६ दिवसांनंतर अखेर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील घटना

August 24, 2026
Next Post
कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची बाधा, विवाहितेने घेतला गळफास; सोलापुरातील धक्कादायक घटना

भयानक! वडिलांचे सहामहिन्यांपूर्वी निधन, जमीन नाही, स्वतःचे हक्काचे घर नव्हते, हलाखीच्या परिस्थितीमुळे मानसिक तणावाखाली १४ वर्षीय तरुणाची आत्महत्या

ताज्या बातम्या

मोठी बातमी! राज्यातील प्राथमिक शाळांच्या वेळेत होणार बदल, आता ‘या’ वेळेत भरणार चौथीपर्यंतचे वर्ग; सर्व शाळांना नियम लागू

धक्कादायक! निंबोणीतील ‘सहारा बाल आश्रमा’चा बोगस कारभार; जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल; तक्रारदाराचे गंभीर आरोप

September 11, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

सावधान! मंगळवेढ्याच्या महिलेचा सांगोला बसस्थानकावर हातसफाईचा डाव; पोलिसांनी २४ तासांत ठोकल्या बेड्या

September 11, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

​हक्काच्या आरक्षणासाठी मंगळवेढा पेटून उठला; आज शिवतीर्थावर तरुणांचे भव्य ठिय्या आंदोलन; शिक्षण-नोकरीत हक्काचे आरक्षण द्या

September 11, 2026
रतनचंद शहा बँकेच्या सर्व खातेदारांच्या ठेवी सुरक्षित : चेअरमन राहुल शहा

रतनचंद शहा बँकेचे खातेदार व सभासदांसाठी महत्त्वाची बातमी! ​अपप्रचारावर विश्वास ठेवू नका, बँक सभासदांच्या विश्वासावर भक्कम; चेअरमन राहुल शहा यांनी मांडली वस्तुस्थिती

September 10, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

चौकात मित्रांसोबत गप्पा मारत बसले होते, अचानक समोरून आले आणि दोन तरुणांवर चाकूने केला हल्ला; मंगळवेढ्यात खळबळजनक घटना

September 10, 2026
येरे येरे पावसा! मंगळवेढा तालुक्यात दुष्काळी परिस्थिती, गावगाडा ठप्प झाल्याने नागरिकांचे गावागावात ग्रामदैवतांना जलाभिषेक

मोठी बातमी! मंगळवेढा तालुक्यात दुष्काळसदृश स्थिती, पिकांच्या नुकसानीचा वस्तुनिष्ठ अहवाल तयार करण्यासाठी विशेष समिती गठीत; तज्ज्ञांचे पथक थेट बांधावर उतरणार

September 10, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा