मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
मंगळवेढा शहरातील मुख्य रस्त्यावर हॉटेल राजयोग शेजारी असणाऱ्या मुख्य रस्त्यावरील प्रशस्त गाळे विना डिपॉझिट भाड्याने देणे आहेत.
व्यवसाय करण्यासाठी सुवर्णसंधी, गाळा घ्या विना डिपॉझिट तरुण व्यावसायिक, ऑफिस आदी सर्व प्रकारच्या गोष्टीसाठी गाळे भाड्याने देणे सुरू आहेत.

‘या‘ नंबरवर साधा संपर्क
विना डिपॉझिट गाळे भाड्याने हवे असल्यास या 9890168916 नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; मान्सून आलाय पण पेरणीची घाई नको; कृषी विभागाचं आवाहन
राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस पडत आहे. केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर आज लगेच राज्यात मान्सूनचे आगमन झालं. मान्सून आल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. शेतकरी पेरणीच्या कामांना सुरुवात करतील.

परंतु कृषी विभागाने यावर्षी मान्सूनचा प्रवास वेगाने सुरू आहे. मात्र मान्सूनच्या प्रवासाची गती लवकरच मंद होणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नका, असे आव्हान असे आवाहन कृषी विभागानं केलंय.
मान्सूनचा प्रवास वेगाने सुरू आहे. त्यामुळे 25 मे रोजी दक्षिण कोकणात दाखल झाला. मान्सून सामान्य तारखेपेक्षा 10 दिवस आधीच दाखल झालाय. मात्र 27 मे पासून मान्सूनच्या प्रवासाची गती कमी होणार आहे.

राज्यातील हवामानात लवकरच मोठे बदल दिसून येतील, अशी माहिती कृषी विभागानं दिलीय. सध्या अंदाजानुसार 27 मे पासून राज्यातील हवामान हळूहळू कोरडे होईल. तसेच काही प्रमाणात तापमानात वाढ देखील होईल.

मे महिन्याच्या शेवटपर्यंत कोकण वगळता बहुतांश भागातही कोरडे हवामान असेल.साधारण 5 जूनपर्यंत ही स्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज आहे.

यामुळे किमान 5 जूनपर्यंत तरी राज्यातील बहुतांश भागात मान्सून दाखल होण्याची शक्यता दिसत नाहीये.

दरम्यान देशातील इतर भागात सुद्धा मान्सूनचा प्रवास तात्पुरता थांबू शकतो. राज्यातील अनेक जिल्ह्यात जोरदार अवकाळी पाऊस पडलाय. आपल्या भागात लवकरच मान्सून दाखल होईल

अशा खोट्या बातम्यावर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी पेरणी आणि लागवडीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाकडून केलं जात आहे. राज्यात हवामान कोरडे राहणार आहे आणि जर पेरणीची घाई केली तर शेतकऱ्याचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













