mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मोठी बातमी! मंगळवेढ्यातील उद्योजकाची बिहारमध्ये हत्या; १०० कोटी रुपयांची ऑर्डर देण्याच्या बहाण्याने अपहरण

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
April 16, 2025
in क्राईम, मंगळवेढा, राज्य, राष्ट्रीय
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।

खाणीतील खोदकामाच्या उपकरणांची १०० कोटी रुपयांची ऑर्डर देण्याच्या बहाण्याने बिहारमध्ये बोलावून मूळच्या मारोळी (ता. मंगळवेढा, सध्या रा. कोथरूड) येथील उद्योजकाची हत्या करण्यात आली.

उद्योजक पाटणा विमानतळावर पोहोचल्यावर त्यांचे अपहरण करून खून करण्यात आला. त्यांच्या बँक खात्यातील ९० हजार रुपये काढून घेतले. आरोपींना पाटणा विमानतळ पोलिसांनी अटक केली आहे.

लक्ष्मण साधू शिंदे (वय ५५, रा. डीपी रस्ता, कोथरूड), असे उद्योजकाचे नाव आहे. शिंदे हे रत्नदीप कास्टिंग या उद्योगाचे संचालक होते. पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे यांना एक ई-मेल आला होता. त्यावरून त्यांनी फोन केला होता.

‘झारखंडमधील एका खाणीचे खोदकाम करण्यासाठी उपकरणे हवी असून, १०० कोटींची ऑर्डर आहे’, अशी बतावणी करण्यात आली. संबंधितांनी शिंदे यांना पाटणा शहरात बैठकीसाठी बोलावून घेतले. शिंदे हे ११ मार्च रोजी विमानाने पाटणा येथे पोहोचले. जाण्यापूर्वी त्यांनी आपल्या मुलीस याबाबत कल्पना दिली होती.

तेथे पोहोचल्यानंतर शिंदे यांचे संबंधितांशी बोलणे झाले. त्यानुसार शिंदे यांनी कुटुंबीयांशी संपर्क साधून आपण पाटण्यातून झारखंड येथील खाण पाहण्यासाठी जात असल्याचे सांगितले.

त्यानंतर वारंवार संपर्क करूनही तो होत नसल्याने शिंदे यांच्या कुटुंबाने १२ एप्रिल रोजी ते बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. पोलिसांनी शिंदे यांचे लोकेशन तपासल्यानंतर ते बिहारमधील गुन्हेगारी पट्टा असलेल्या वेगवेगळ्या भागांत आढळले. घटनेचे गांभीर्य ओळखून पुणे पोलिसांचे पथक पाटणा येथे रवाना झाले.

पुणे पोलिस आणि पाटणा विमानतळ पोलिसांनी विमानतळावरील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासल्यावर शिंदे यांचे विमानतळावरूनच अपहरण झाल्याचे समोर आले. पोलिसांनी शोध घेतल्यानंतर सोमवारी (१४ एप्रिल) बिहारमधील जहानाबाद परिसरात शिंदे यांचा मृतदेह आढळला.

अडीच लाख रुपये मारहाण करून जबरदस्तीने काढून घेतले

उद्योजक लक्ष्मण शिंदे यांचा मृतदेह बिहार येथील जहानाबाद जिल्ह्यात सापडला आहे. अधिक तपासामध्ये गुजरातच्या व्यापाऱ्यालाही अशाच प्रकारे बिहार येथे बोलावून त्याचे अपहरण करून त्याच्याकडील अडीच लाख रुपये मारहाण करून जबरदस्तीने काढून घेतले होते. नंतर त्याला सोडूनही देण्यात आले होते. असाच प्रकार या गुन्ह्यात झाल्याचे दिसून येत आहे. यानिमित्ताने आरोपींची गुन्हे करण्याची पद्धतीही समोर आली आहे.- अमितेश कुमार, पोलिस आयुक्त, पुणे

९० हजारांची रक्कम काढून घेतली

आरोपींनी शिंदे यांच्या बँक खात्यातून २० हजारांची रक्कम काढून घेऊन मोबाइलमधील सर्व माहिती डिलीट केल्याचे उघड झाले. पाटणा पोलिसांनी तपास करून आरोपींना अटक केली. शिंदे यांची हत्या १२ एप्रिल रोजी झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून, हत्येमागचे निश्चित कारण समजू शकले नाही. त्यांचे पार्थिव मंगळवारी सायंकाळी विमानाने पुण्यात आणण्यात आले. त्यानंतर कोथरूडमधील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती शिंदे कुटुंबीयांच्या निकटवर्तीयांनी दिली.(स्रोत:लोकमत)

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मंगळवेढा हत्या

संबंधित बातम्या

कथित खोट्या ॲट्रॉसिटी गुन्ह्याची निष्पक्ष चौकशी करा; अन्यथा ३ ऑक्टोबरपासून मंगळवेढा तालुका बेमुदत बंद; समस्त मंगळवेढेकर नागरिकांचा पोलीस प्रशासनाला थेट इशारा

कथित खोट्या ॲट्रॉसिटी गुन्ह्याची निष्पक्ष चौकशी करा; अन्यथा ३ ऑक्टोबरपासून मंगळवेढा तालुका बेमुदत बंद; समस्त मंगळवेढेकर नागरिकांचा पोलीस प्रशासनाला थेट इशारा

October 1, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

मंगळवेढा हादरले! वादाच्या तडजोडीसाठी बोलावून महिलेला लज्जास्पद वागणूक व बेदम मारहाण प्रकरणी नगरसेवकासह १२ जणांवर गुन्हा

October 1, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

अस्मानी-सुलतानी संकटांपुढे १८ वर्षांचा पोराचा धीर सुटला; संकटांच्या मालिकेने सोलापूर जिल्ह्यातील तरुण शेतकऱ्याचा घेतला बळी; रुग्णालयात नातेवाइकांची गर्दी

September 30, 2026
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

गुगलवरून नंबर शोधणं पडलं महागात! पाच रुपये ऑनलाइन पाठवायला सांगून पाच लाख खात्यातून लुटले; हॉस्पिटल अपॉइंटमेंटच्या नावाखाली सायबर दरोडा

October 1, 2026
स्व.जनाबाई आवताडे यांचे आज व्दितीय पुण्यस्मरण; भजन, पुष्पवृष्टीचे आयोजन

स्व.जनाबाई आवताडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज मंगळवेढ्यात कीर्तन सोहळा; हिंदूभूषण सुनिताताई आंधळे यांची उपस्थिती

September 29, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

दारूचे व्यसन ठरले काळ! पत्नीच्या विरोधाने खवळलेल्या पतीने कोयत्याने वार करून केली हत्या

September 28, 2026
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

​मोठी खळबळ! पोलिसांनाच गाडीखाली चिरडण्याचा प्रयत्न; पंढरपुरात आरोपींची बेधडक कृती, पाठलाग करून मुसक्या आवळल्या

September 27, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मोठी बातमी! दुष्काळाच्या झळा; दोन शेतकऱ्यांनी गमावला जीव, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

September 27, 2026

राज्यात दोन टप्प्यात दुष्काळ जाहीर होणार? पहिल्या 139 तालुक्यांची यादी आली समोर; सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यांचा समावेश

September 26, 2026
Next Post
मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा! लाडका शेतकरी योजना जाहीर; प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार ”इतकी” हजार रक्कम

मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा! लाडका शेतकरी योजना जाहीर; प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार ''इतकी'' हजार रक्कम

ताज्या बातम्या

कथित खोट्या ॲट्रॉसिटी गुन्ह्याची निष्पक्ष चौकशी करा; अन्यथा ३ ऑक्टोबरपासून मंगळवेढा तालुका बेमुदत बंद; समस्त मंगळवेढेकर नागरिकांचा पोलीस प्रशासनाला थेट इशारा

कथित खोट्या ॲट्रॉसिटी गुन्ह्याची निष्पक्ष चौकशी करा; अन्यथा ३ ऑक्टोबरपासून मंगळवेढा तालुका बेमुदत बंद; समस्त मंगळवेढेकर नागरिकांचा पोलीस प्रशासनाला थेट इशारा

October 1, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

मंगळवेढा हादरले! वादाच्या तडजोडीसाठी बोलावून महिलेला लज्जास्पद वागणूक व बेदम मारहाण प्रकरणी नगरसेवकासह १२ जणांवर गुन्हा

October 1, 2026
तगडा बंदोबस्त! सोलापूर व माढा लोकसभेसाठी आजपासून अर्ज दाखल होणार, अनामत रक्कम रोखच भरावी लागणार; उमेदवाराबरोबर ‘एवढ्या’ लोकांनाच प्रवेश

दुष्काळात दांडी मारणाऱ्या अधिकाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल होणार; सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांचा कडक इशारा; ​मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई

September 30, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

अस्मानी-सुलतानी संकटांपुढे १८ वर्षांचा पोराचा धीर सुटला; संकटांच्या मालिकेने सोलापूर जिल्ह्यातील तरुण शेतकऱ्याचा घेतला बळी; रुग्णालयात नातेवाइकांची गर्दी

September 30, 2026
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

गुगलवरून नंबर शोधणं पडलं महागात! पाच रुपये ऑनलाइन पाठवायला सांगून पाच लाख खात्यातून लुटले; हॉस्पिटल अपॉइंटमेंटच्या नावाखाली सायबर दरोडा

October 1, 2026
शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

शेतकऱ्यांनो आणि व्यापाऱ्यांनो सावधान! जिल्ह्याची वेस ओलांडण्यापूर्वी ‘हा’ नियम नाही वाचला तर थेट पोलीस कारवाई; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचा मोठा निर्णय

October 1, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..