मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
दहावी बोर्डाची परीक्षा आजपासूनच सुरू झाली आणि पहिल्याच दिवशी कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाला. दहावीच्या परीक्षेला पेपरफुटीचं ग्रहण लागलं. दहावीचा पहिलाच मराठी विषयाचा पेपर फुटला.
जालन्यातील बदनापूर शहरात दहावीचा मराठीचा पेपर फुटला असल्याची माहिती समोर आली आहे.
दहावीच्या मराठी पेपरच्या प्रश्नपत्रिकांवर उत्तरं असलेल्या प्रती विद्यार्थ्यांना वाटण्यात आल्या. परीक्षा केंद्राबाहेरच्याच झेरॉक्स सेंटरमधून उत्तरपत्रिकांच्या प्रिंट काढून त्या विद्यार्थ्यांना पुरवल्या गेल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जालन्यात दहावीचा मराठीचा पेपर फुटला आहे. पेपर सुरू झाल्यानंतर अवघ्या १५ मिनिटांत हा पेपर फुटला आहे. जालन्यातील बदनापुरात हा पेपरफुटीचा प्रकार घडला आहे.
परिक्षा केंद्राच्या बाहेर शहरातील झेरॉक्स सेंटरमधून उत्तरपत्रिकांच्या झेरॉक्स काढून विद्यार्थ्यांना पुरवल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर उघड झालाय.
संपूर्ण राज्यात दहावीच्या बोर्डाती परीक्षा सुरू झाली आहे. वर्षभरापासून या परीक्षेसाठी विद्यार्थी तयारी करत होते. शुक्रवारी दहावीचा मराठीचा पेपर होता. परिक्षा सुरू असतानाच जालन्यातील बदनापूर शहरात एक धक्कादायक प्रकार घडला. जालना जिल्ह्यातील बदनापूर शहरात दहावीचा मराठीचा पेपर फुटला आहे.
उत्तरांसहीत प्रश्नपत्रिकांच्या झेरॉक्स अवघ्या २० रुपयांत विद्यार्थ्यांना विकल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर शिक्षण विभाग खडबडून जागं झालं असून, या प्रकाराची माहिती घेतली जात असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
सकाळी दहावीचा मराठीचा पेपर होता. पेपर सुरू झाल्यानंतर अवघ्या १५ मिनिटात दहावीच्या मराठीची प्रश्नपत्रिका परिक्षा केंद्राच्या बाहेर आली. त्यानंतर झेरॉक्स सेंटरवर थेट उत्तरपत्रिकांच्या झेरॉक्स मारून विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्याचा प्रकार समोर आलाय.
२० रूपयात उत्तरपत्रिका विकली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे बॉर्ड दहावीचा पेपर रद्द करणार की, नाही, कारवाई होणार की नाही? याकडे सर्वांचे लक्ष आहे.(स्रोत:sam tv)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज