mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

कौतुकास्पद! मुलाच्या वाढदिवसाला दिले मुकबधीर शाळेत सोलर वॉटर हिटर; उद्योजक सुरज डोके यांचा अनोखा उपक्रम

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
January 15, 2025
in मंगळवेढा, मनोरंजन, शैक्षणिक
कौतुकास्पद! मुलाच्या वाढदिवसाला दिले मुकबधीर शाळेत सोलर वॉटर हिटर; उद्योजक सुरज डोके यांचा अनोखा उपक्रम

टीम मंगळवेढा टाईम्स।

आजच्या या युगात वाढदिवसावर लोक लाखो रुपये खर्च करतात. पण माचणूर युवा उद्योजक सुरज डोके व धनश्री डोके या दांपत्याने आपल्या मुलाच्या म्हणजेच चि.राजवर्धन याच्या चौथ्या वाढदिवसा निमित्ताने अनावश्यक खर्चाला फाटा देत

मंगळवेढा येथील श्री संत दामाजी अपंग सेवा मंडळ मंगळवेढा संचलित करुणा मतिमंद व मूकबधिर शाळा मंगळवेढा येथे जवळपास 25000 रुपये किंमतीचे व एकाच वेळी जवळपास 25 मुलांचे गरम पाणी होणारे 150 लिटर एल.पी.डी. सोलर वॉटर हीटर या मूकबधिर शाळेत भेट देण्यात आले. युवा उद्योजक सूर्य डोके यांच्या या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

डोके दांपत्याने आपला मुलगा चि.राजवर्धन याच्या चौथ्या वाढदिवसानिमित्त मंगळवेढा येथील करुणा मतिमंद व मूकबधिर शाळा येथे सोलर वॉटर हीटर व सर्व विद्यार्थ्यांना मकर संक्रातीनिमित्त पुरणपोळी जेवणाचे आयोजन केले होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवा उद्योजक सुरज डोके होते.यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नागनाथ पाथरूट, मुख्याध्यापक हेंबाडे सर, पाटकर सर, राकेश पाटील, प्रभाकर कादे ,सुरज आवळे, शामल स्वामी ,शेवंता ऐवळे, धनश्री डोके, विद्या डोके, अविनाश डोके, माधुरी डोके, वैष्णवी पुजारी व दिनकर पाटील इत्यादी उपस्थित होते.

या सध्याच्या काळात हॉल, मंडप, डेकोरेशन,पार्टी यावर अवाढव्य खर्च करतर वाढदिवस साजरा करण्याची परंपरा सध्या समाजात जोमात सुरू आहे.

आपला वाढदिवस चांगल्या प्रकारे कसा साजरा केला जाईल याकडे सध्या ग्रामीण भागातील तरुणात क्रेझ निर्माण झाली आहे. वाढदिवसाच्या दिवशी डीजे लावून नाचणाऱ्यांची संख्या आजकाल कमी नाही.

परंतु आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून कार्य करणाऱ्यांची संख्या मात्र मोजकीच आहे.या भावनेतून सामाजिक बांधिलकी जोपासत माचणूर येथील डोके परिवाराने आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त मूकबधिर शाळेत अत्यंत आवश्यक असणारा सोलर वॉटर हिटर देऊन समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे.

दानशूर व्यक्तींनी अशाच पद्धतीने विविध उपक्रम राबवावा

आपण या समाजाचे काहीतरी तरी देणं लागतो या उदात्त भावनेने आमच्या डोके परिवाराने या मूकबधिर प्रशालेस आवश्यक असणारा सोलर वॉटर हिटर बसवून दिला आहे.

वाढदिवसाच्या निमित्ताने होणारा हजारो रुपयांचा अनावश्यक खर्च टाळून आम्ही हा उपक्रम मनापासून राबवला असून समाजातील दानशूर व्यक्तींनी अशाच पद्धतीने विविध उपक्रम राबवून अशा चांगल्या गोष्टींना सहकार्य करणं आवश्यक आहे.- सुरज डोके, युवा उद्योजक, माचणूर.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: माचणूरसुरज डोके

संबंधित बातम्या

Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

मोठी खळबळ! मंगळवेढ्यात २६ वर्षीय विवाहित महिलेचे टोकाचे पाऊल; स्वयंपाक खोलीत ओढणीने घेतला गळफास; आत्महत्येचे कारण…

August 7, 2026
​मंगळवेढ्यातील महिलांनो सावधान! मॉर्निंग वॉक दरम्यान शिक्षिकेसोबत घडला धक्कादायक प्रकार

मंगळवेढ्यात मॉर्निंग वॉकला गेलेल्या ७१ वर्षीय महिलेचे सोन्याचे गंठण लांबवले; महिनाभरात दुसरी घटना, महिलांमध्ये घबराट

August 7, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

​मंगळवेढा हादरला! मुदतबाह्य दही, ताक आणि लस्सी बाजारात; ‘या’ दूध डेअरीवर एफडीएचा सर्जिकल स्ट्राईक; ​तुकाराम मुंढेचा दणका

August 7, 2026
स्वप्नातील घरासाठी नागरिकांची तुफान पसंती; ‘दामाजी सिटी’ ठरतेय मंगळवेढ्यातील पहिली पसंती; भरघोस प्रतिसादानंतर अंतिम टप्प्यात बुकिंग; 9890605962 आजच संपर्क साधा

स्वप्नातील घरासाठी नागरिकांची तुफान पसंती; ‘दामाजी सिटी’ ठरतेय मंगळवेढ्यातील पहिली पसंती; भरघोस प्रतिसादानंतर अंतिम टप्प्यात बुकिंग; 9890605962 आजच संपर्क साधा

August 6, 2026
ग्रामीण भागातून रक्त संकलन करणे ही काळाची गरज – तृप्तीताई राजू खरे; राजेंद्र फुगारे यांच्या वाढदिवशी भव्य रक्तदान शिबिर

ग्रामीण भागातून रक्त संकलन करणे ही काळाची गरज – तृप्तीताई राजू खरे; राजेंद्र फुगारे यांच्या वाढदिवशी भव्य रक्तदान शिबिर

August 6, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

मंगळवेढ्यात कर्जमाफीचा मोठा धमाका! ‘त्या’ एकाच गावातील ३५६ शेतकऱ्यांना जॅकपॉट

August 5, 2026
महिलांनो! बसने प्रवास करताय तर सावधान, मंगळवेढा बसस्थानकावरून महिला प्रवाशाचे १० लाख किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात पळविले; स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल

बसस्थानकावर चोरट्यांचा सुळसुळाट! बसमध्ये चढणाऱ्या महिला प्रवाशाचे ४३ हजार लांबवले; मंगळवेढा बसस्थानकावरील CCTV कॅमेरे पडले बिनकामी

August 1, 2026
गोणेवाडीची सहकार क्रांती! श्री सिद्धनाथ महिला पतसंस्थेची बिनविरोध निवड; हजारे चेअरमन तर उपाध्यक्षपदी चव्हाण

गोणेवाडीची सहकार क्रांती! श्री सिद्धनाथ महिला पतसंस्थेची बिनविरोध निवड; हजारे चेअरमन तर उपाध्यक्षपदी चव्हाण

July 31, 2026
मंगळवेढ्यातील दोन महिलांनी अनेकांना घातला लाखोंचा गंडा; मोठे रॅकेट उघडकीस येणार

राजकीय पार्श्वभूमी आहे म्हणून सूट मिळणार नाही! मंगळवेढा न्यायालयात आरोपीला ३ वर्षांची ठोकली शिक्षा

July 31, 2026
Next Post
ब्रम्हपुरीचे सुपुत्र प्रमोद बिनवडे यांना आदर्श पत्रकार पुरस्कार प्रदान; ‘या’ गोष्टींची घेतली गेली दखल

ब्रम्हपुरीचे सुपुत्र प्रमोद बिनवडे यांना आदर्श पत्रकार पुरस्कार प्रदान; 'या' गोष्टींची घेतली गेली दखल

ताज्या बातम्या

Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

मोठी खळबळ! मंगळवेढ्यात २६ वर्षीय विवाहित महिलेचे टोकाचे पाऊल; स्वयंपाक खोलीत ओढणीने घेतला गळफास; आत्महत्येचे कारण…

August 7, 2026
​मंगळवेढ्यातील महिलांनो सावधान! मॉर्निंग वॉक दरम्यान शिक्षिकेसोबत घडला धक्कादायक प्रकार

मंगळवेढ्यात मॉर्निंग वॉकला गेलेल्या ७१ वर्षीय महिलेचे सोन्याचे गंठण लांबवले; महिनाभरात दुसरी घटना, महिलांमध्ये घबराट

August 7, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

​मंगळवेढा हादरला! मुदतबाह्य दही, ताक आणि लस्सी बाजारात; ‘या’ दूध डेअरीवर एफडीएचा सर्जिकल स्ट्राईक; ​तुकाराम मुंढेचा दणका

August 7, 2026
स्वप्नातील घरासाठी नागरिकांची तुफान पसंती; ‘दामाजी सिटी’ ठरतेय मंगळवेढ्यातील पहिली पसंती; भरघोस प्रतिसादानंतर अंतिम टप्प्यात बुकिंग; 9890605962 आजच संपर्क साधा

स्वप्नातील घरासाठी नागरिकांची तुफान पसंती; ‘दामाजी सिटी’ ठरतेय मंगळवेढ्यातील पहिली पसंती; भरघोस प्रतिसादानंतर अंतिम टप्प्यात बुकिंग; 9890605962 आजच संपर्क साधा

August 6, 2026
ग्रामीण भागातून रक्त संकलन करणे ही काळाची गरज – तृप्तीताई राजू खरे; राजेंद्र फुगारे यांच्या वाढदिवशी भव्य रक्तदान शिबिर

ग्रामीण भागातून रक्त संकलन करणे ही काळाची गरज – तृप्तीताई राजू खरे; राजेंद्र फुगारे यांच्या वाढदिवशी भव्य रक्तदान शिबिर

August 6, 2026
आधारकार्ड घरी मागवून घेण्यासाठी फक्त 50 रुपये शुल्क भरावे लागणार

मतदारांना मोठी दिलासादायक बातमी! ‘एसआयआर’ अभियानासाठी ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ; सुधारित वेळापत्रक जाहीर

August 6, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..