टीम मंगळवेढा टाईम्स ।
कै.रामगोंडा बापुराया चौगुले बहुउद्देशिय संस्था, सिध्दापूर संचलित,आर.बी.सी.इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्युनिअर कॉलेज तांडोर-सिध्दापूर ता.मंगळवेढा, जि. सोलापुर आयोजित सिध्दापूर फेस्टीव्हल-२०२५ चा पत्रकारिता क्षेत्रातील जनमित्र आदर्श पत्रकार पुरस्कार प्रमोद बिनवडे प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार सोहळा सोमवार दि.१३ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता सिध्दापूर येथील आर.बी.सी. प्रशालेच्या प्रांगणात संपन्न झाला. विविध क्षेत्रातील पुरस्कार प्राप्त मान्यवरांना सौ अंजलीताई समाधान आवताडे यांच्या शुभ हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षा सुवर्णा चौगुले होत्या.
पत्रकार प्रमोद बिनवडे यांनी नेहमीच उपेक्षित व अन्यायग्रस्त वर्गासाठी आपली पत्रकारिता केली असून या सर्व गोष्टीची दखल म्हणून व पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणून चांगले करत असताना
त्यांना नवी दिल्ली येथील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय फेलोसिप पुरस्कार, मुंबई येथील लोकसेवा अकादमीच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय दर्पणरत्न पुरस्कार,
मंगळवेढा येथून चालणाऱ्या दै.दामाजी न्युज चॅनलचा व साप्ताहिक मंगळवेढा दणकाचा आदर्श पत्रकार पुरस्कार मिळाले असुन आता सिद्धापूर फेस्टिवलचा आदर्श पत्रकार पुरस्कारही प्रमोद बिनवडे यांना प्राप्त झाला आहे.
या कार्यक्रमास पं.स.गटशिक्षणाधिकारी बिभीषण रणदिवे,माजी सभापती प्रदिप खांडेकर,माजी जि.प.सदस्य सिध्दराया चौगुले,स्मिता म्हमाणे, संस्थेच्या सचिव मिनाक्षी पाटील,सौ.गायकवाड, उपसरपंच सचिन चौगुले, चंद्रकांत पाटील, गजानन चौघुले,सचिन नकाते,संजीव कवचाळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक संस्थापक गजानन पाटील सर,सुत्रसंचलन संतोष मिसाळ यांनी तर आभार सौ.पाटील यांनी मानले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज