mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मोठी बातमी! पंढरपूर-मंगळवेढ्यात काँग्रेसमध्ये उभी फूट; भगीरथ भालकेंवर नाराज होत काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा अनिल सावंतांना पाठिंबा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 9, 2024
in मंगळवेढा, सोलापूर
मोठी बातमी! पंढरपूर-मंगळवेढ्यात काँग्रेसमध्ये उभी फूट; भगीरथ भालकेंवर नाराज होत काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा अनिल सावंतांना पाठिंबा

टीम मंगळवेढा टाईम्स ।

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून समाधान आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून अनिल सावंत, काँगेस कडून भगीरथ भालके रिंगणात आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या दोन्ही पक्षांनी आपापले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत.

काँग्रेसने घेतलेल्या या निर्णयामुळे तालुक्यातील काँग्रेसचे पदाधिकारी नाराज झाले आहेत. काँग्रेसआयच्या पदाधिकाऱ्यांनी नाराज होऊन, आज पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अनिल सावंत यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.

आज शनिवार दिनांक 9 नोव्हेंबरला विठ्ठल इन कार्यालय, स्टेशन रोड, पंढरपूर या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन हा निर्णय घेतला गेला.

काँगेस पक्षाचे पंढरपूर शहराध्यक्ष अमर सूर्यवंशी, पंढरपूर युवक शहराध्यक्ष संदीप शिंदे, सेवादल शहराध्यक्ष गणेश माने, व्ही, जे, एन, टी शहराध्यक्ष गोकुळ माने, सोशल मीडिया अध्यक्ष महेश अधरराव, त्याचे जिल्हा सचिव पांडुरंग डांगे, काँग्रेसचे  विधानसभा युवक अध्यक्ष सोमनाथ आरे,

काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष सागर कदम, शैलेश घोगरदरे, अंशुभन शिंदे, काँग्रेस सरचिटणीस पिंटू जाधव, शहर सचिव अनिल माने, शहर सचिव सुदीप पवार, शहर उपाध्यक्ष आण्णा अधरराव, किशोर महाराज जाधव आदी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी अनिल सावंत यांना जाहीर पाठिंबा दिला.

शहराध्यक्ष अमर सूर्यवंशी पत्रकार परिषदेत माध्यमांशी बोलताना म्हणाले, यापूर्वी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेची निवडणूक केवळ पाणी प्रश्न आणि रस्त्याच्या समस्येवर लढवली गेली. यावेळी पहिल्यांदाच अनिल सावंत यांनी मतदार संघात यापुढे जाऊन शिक्षण संस्था, रोजगाराचे मुख्य केंद्र उभारण्याचा विचार मांडला आहे.

आम्हाला अनिल सावंत यांचे विचार पटले,  विकासासंबंधीची त्यांची धडपड आम्हाला भावली. आणि म्हणून सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्रित अनिल सावंत यांना जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला.

याबरोबरच काँग्रेसने दिलेला उमेदवारही आम्हाला पसंत नाही. काँग्रेसचा उमेदवार आम्हाला विचारत नाही, विश्वासात घेत नाही. प्रणिती शिंदे आमच्या नेत्या आहेत. मात्र आमचा निर्णय झालेला आहे. आता माघार घेण्याचा कोणताही प्रश्न नाही.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अनिल सावंत यांनी पंढरपूर शहराध्यक्ष अमर सूर्यवंशी आणि पाठिंबा देणाऱ्या काँग्रेसच्या विविध पदाधिकाऱ्यांचे कार्यकर्त्यांचे आभार मानले.

माध्यमांशी बोलताना अनिल सावंत म्हणाले, पंढरपूर मंगळवेढा हा राष्ट्रवादीचा पारंपारिक मतदारसंघ आहे. काल जयंत पाटील यांनी देखील अनिल सावंत हेच महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असल्याचे स्पष्ट केलं आहे. या मतदारसंघात कोणाची किती ताकद आहे, हा प्रश्न नाही. आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढून ही जागा निश्चितपणे जिंकणार आहोत.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: अनिल सावंत

संबंधित बातम्या

नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

शाळेची भीती संपणार! सोलापूर जिल्ह्यात ‘या’ शाळेतच अंगणवाडी भरणार; बालवयात शाळेची गोडी लागणार; ग्रामीण शिक्षणाला मिळणार नवी दिशा

June 6, 2026
महिलांनो! बसने प्रवास करताय तर सावधान, मंगळवेढा बसस्थानकावरून महिला प्रवाशाचे १० लाख किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात पळविले; स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल

मंगळवेढा बस स्थानकावर प्रवास करताय? तर सावधान! गर्दीच्या ठिकाणी स्वतःच्या साहित्याची आणि पैशांची काळजी घ्या; वृद्ध शेतकऱ्याची पुंजी चोरट्याने उडवली

June 6, 2026
मंगळवेढ्यात आर्थिक प्रगतीचा नवा अध्याय! ‘नूतन महिला अर्बन’चा आज दिमाखदार शुभारंभ; महिला सक्षमीकरणासाठी विविध योजनांची मेजवानी

मंगळवेढ्यात आर्थिक प्रगतीचा नवा अध्याय! ‘नूतन महिला अर्बन’चा आज दिमाखदार शुभारंभ; महिला सक्षमीकरणासाठी विविध योजनांची मेजवानी

June 6, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

समृद्ध पंचायतराज अभियानात मंगळवेढ्यातील ‘या’ गावची छाप; जिल्हास्तरीय मूल्यमापन समितीकडून विकासकामांची पाहणी

June 5, 2026
खुशखबर! श्रीराम सुपर मार्ट आजपासून मंगळवेढ्यातील ग्राहकांच्या सेवेसाठी सज्ज; सर्व खरेदी आता एकाच छताखाली; खरेदीवर ग्राहकांना आकर्षक भेटवस्तू

पालकांसाठी आनंदाची बातमी! मंगळवेढ्यातील ‘श्रीराम सुपर मार्ट’मध्ये शालेय साहित्यावर २५% ते ६०% पर्यंत घसघशीत सूट; महागाईला ब्रेक, नव्या शैक्षणिक वर्षाची खरेदी होणार आता बजेटमध्ये

June 3, 2026
माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते देवेंद्र फडणवीसांचा सत्कार; मालकांनी ठरल्याप्रमाणे केलं… आता संधी मिळणार का? परिचारक समर्थकांचा सवाल

मालक, आता निर्णय घ्या! परिचारक समर्थकांचा भाजपला थेट इशारा, बंडखोरी की पेल्यातील वादळ? पक्षाने शब्द पाळला नाही; प्रशांत परिचारकांकडून मात्र ‘सबुरी’चा सल्ला

June 4, 2026
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

अन्नदाता की गुन्हेगार? जळणाऱ्या पिकांसाठी पाणी मागितलं; प्रशासनाने थेट ‘गुन्हा’ दाखल केला; ​माण नदीकाठच्या १६ गावांतील शेतकऱ्यांचा संताप

June 3, 2026
चमकदार कामगिरी! सोलापूर पोलिसांनी उध्वस्त केला बनावट नोटांची छपाई करणारा अड्डा

खळबळ! कर्नाटक हादरवणारे गोविंदपूर हत्याकांड; सिद्धापूर कनेक्शन’ उघड, पोलिसांकडून एका संशयिताला अटक

June 2, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

मदरशात धार्मिक शिक्षणाच्या नावाखाली अश्लील चाळे; सोलापूरच्या नराधम मौलानाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; पीडितांचा आकडा वाढण्याची भीती

June 2, 2026
Next Post
ठराव गोळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु; सोलापूर जिल्हा बॅंकेची निवडणूक पुढे ढकलली

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक अनियमित कर्जवाटप प्रकरण, 238 कोटींच्या वसुलीचे आदेश; 33 जणांच्या अडचणी वाढल्या

ताज्या बातम्या

नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

शाळेची भीती संपणार! सोलापूर जिल्ह्यात ‘या’ शाळेतच अंगणवाडी भरणार; बालवयात शाळेची गोडी लागणार; ग्रामीण शिक्षणाला मिळणार नवी दिशा

June 6, 2026
महिलांनो! बसने प्रवास करताय तर सावधान, मंगळवेढा बसस्थानकावरून महिला प्रवाशाचे १० लाख किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात पळविले; स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल

मंगळवेढा बस स्थानकावर प्रवास करताय? तर सावधान! गर्दीच्या ठिकाणी स्वतःच्या साहित्याची आणि पैशांची काळजी घ्या; वृद्ध शेतकऱ्याची पुंजी चोरट्याने उडवली

June 6, 2026

मराठा विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; ओबीसींप्रमाणे ‘या’ 8 सवलती लागू; जीआर देखील निघाला

June 6, 2026
मंगळवेढ्यात आर्थिक प्रगतीचा नवा अध्याय! ‘नूतन महिला अर्बन’चा आज दिमाखदार शुभारंभ; महिला सक्षमीकरणासाठी विविध योजनांची मेजवानी

मंगळवेढ्यात आर्थिक प्रगतीचा नवा अध्याय! ‘नूतन महिला अर्बन’चा आज दिमाखदार शुभारंभ; महिला सक्षमीकरणासाठी विविध योजनांची मेजवानी

June 6, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मनोज जरांगे इफेक्ट! मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाचा निर्णय, शासकीय यंत्रणा लागली कामाला; ‘हा’ हेल्पलाइन नंबरही जारी

June 5, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

आता खेळ खल्लास! भेसळखोरांविरोधात तुकाराम मुंढे आक्रमक; शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय

June 5, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा