mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

पाणीदार आमदार! मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचेही टेंडर निघाले; युद्ध पातळीवर काम करण्याचा चंग आ.आवताडे यांनी बांधला

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 10, 2024
in मंगळवेढा
मंगळवेढेकरांसाठी सुवर्ण दिन! आ.आवताडेंच्या प्रयत्नांतुन 24 गाव उपसा सिंचन योजनेचे काम आजपासून सुरू; देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते आज 1100 कोटींच्या विविध विकास कामांचा शुभारंभ

टीम मंगळवेढा टाईम्स ।

गेल्या अनेक वर्षापासून राजकारणाचा मुद्दा ठरलेली मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला आमदार समाधान आवताडे यांनी पाठपुरावा करून १३ मार्च २४ च्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजुरी मिळवली होती त्यानंतर पहिल्या टप्प्यातील १११ कोटीचे टेंडर निघून सात ऑक्टोबर रोजी देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या कामाचा कार्यारंभ करण्यात आला आहे.

यावरही निवडणुकीच्या तोंडावर हे स्टंटबाजी सुरू असल्याचे काही विरोधकांकडून म्हटले जात असताना कार्यक्रमानंतर आ समाधान आवताडे यांनी दोन दिवस मुंबईत देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर ठाण मांडून दुसऱ्या टप्प्याचे टेंडर ही काढले आहे.

या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचे ७८ कोटी ४३ लाखाचे टेंडर काल दि.१० ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झाले असून निविदा मागवण्यात आल्या आहेत त्यामुळे दिवसेंदिवस या योजनेवर बोलणाऱ्या विरोधकांची बोलती बंद होत चालली आहे.

मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला मार्च महिन्यात मंजुरी दिल्यानंतर अगोदर दोन वेळा मंजुरी मिळाली आहे, हे केवळ राजकारणासाठी लोकसभेच्या तोंडावर मंजुरी देऊन लोकांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे.

अशा टीका विरोधकांनी केल्या मात्र मंजुरीनंतर दुसऱ्याच दिवशी टेंडर पब्लिश झाल्यामुळे विरोधकांना चपराक बसली होती त्यानंतर पहिल्या टप्प्याच्या टेंडर नंतर आमदार समाधान आवताडे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या योजनेच्या शुभारंभासाठी मंगळवेढ्यात बोलवत धुमधडाक्यात या योजनेचा शुभारंभ करून कामास सुरुवात केली आहे.

https://mangalwedhatimes.in/wp-content/uploads/2024/10/VID-20241009-WA0199.mp4

पहिल्या टप्प्याच्या कामाला सुरुवात होते न होते तोच दुसऱ्या टप्प्यातील कामाचेही टेंडर निघाले असून ही योजना युद्ध पातळीवर पूर्ण करण्याचा चंग आमदार समाधान आवताडे यांनी बांधला असल्याचे यावरून दिसून येत आहे.

६९७.५१ कोटीच्या मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या या कामांमध्ये दुसऱ्या टप्प्यात पंपगृह टप्पा दोन,संरक्षक भिंत, बॅलन्सिंग टॅंक, उर्ध्वगामी नलिका दोन लेंडवे चिंचाळे, मुख्य गुरुत्वीय नलिका व त्यावरील वितरण व्यवस्थेचे काम, तसेच योजना कार्यान्वितीकरण करणे, पाच वर्षे परिचलन,

देखभाल व दुरुस्ती करून शेतकऱ्यांना प्रशिक्षणासह सर्व वितरण व्यवस्थेचे पाणी वापर संस्था स्थापन करून सर्व वितरण व्यवस्था हस्तांतरण करणे या बाबी दुसऱ्या टप्प्यातील टेंडर मध्ये नमूद करण्यात आले आहेत.

दिनांक १४ ऑक्टोबर २०२४ ते २८ ऑक्टोबर २०२४ या कालावधीमध्ये शासनाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने निविदा मागवण्यात आल्या आहेत तर दिनांक २९ ऑक्टोबर २०२४ रोजी या निविदा उघडण्यात येणार आहेत.

या निविदा स्वीकारण्याचा अथवा नाकारण्याचा अधिकार कार्यकारी अभियंता उजनी कालवा विभाग क्रमांक नऊ मंगळवेढा यांनी राखून ठेवलेला आहे.

मंगळवेढा तालुक्यातील जनतेला ही योजना वर्षानुवर्षे राजकारणाचा मुद्दा ठरल्याने मृगजळ वाटत होती मात्र आमदार समाधान आवताडे यांनी पाठपुरावा करत या योजनेचे काम सुरू केल्याने येथील शेतकऱ्यांना आपल्या शेतात मंगळा उपसा सिंचन योजनेचे पाणी येईल अशी आशा वाटू लागली आहे.

दुष्काळी भागासाठी फार मोठा दिलासा

2009 च्या लोकसभेवर बहिष्कार टाकून दुष्काळी 35 गावचा पाणीप्रश्न आम्ही चव्हाट्यावर आणला त्यानंतर सातत्याने आंदोलने करून सतत त्या-त्या लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधून घेतले आ.समाधान आवताडे यांच्या प्रयत्नांने पहिल्या टप्प्यातील कार्यारंभ व दुसऱ्या टप्प्याची निघालेली निविदा हे या दुष्काळी भागासाठी फार मोठा दिलासा देणाऱ्या घटना आहेत.

या योजनेच्या लाभक्षेत्रातील सर्व क्षेत्राला शंभर टक्के ठिबक सिंचन,प्रत्येक शेतकऱ्याला सोलर पंप व शेततळे शासनाने विशेष योजना राबवून देण्यासंदर्भात पायलट प्रोजेक्ट राबविण्याची मागणी आम्ही करणार आहे.- अंकुश पडवळे कृषीभूषण शेतकरी खुपसंगी

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मंगळवेढा उपसा सिंचन योजना

संबंधित बातम्या

खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

मंगळवेढ्यात गांजा विक्रीचे मोठे रॅकेट उध्वस्त; पाच जणांवर गुन्हे, झटपट श्रीमंत होण्याच्या नादात तरुण गजाआड; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

May 10, 2026
निराधार लेकरांसोबत सुखाचा घास! उद्योजक संजय आवताडे यांचा वाढदिवस अनाथ मुलांसोबत ‘सहभोजनाने’ होणार साजरा

निराधार लेकरांसोबत सुखाचा घास! उद्योजक संजय आवताडे यांचा वाढदिवस अनाथ मुलांसोबत ‘सहभोजनाने’ होणार साजरा

May 9, 2026
मंगळवेढ्यात भीषण आग! ‘श्री जिजामाता कृषी केंद्र’ खाक, लाखोंची राखरांगोळी; आगीचे कारण…

मंगळवेढ्यात भीषण आग! ‘श्री जिजामाता कृषी केंद्र’ खाक, लाखोंची राखरांगोळी; आगीचे कारण…

May 8, 2026
मोठी बातमी! उपसा सिंचन योजनेच्या कामाचे निघाले टेंडर; आ.आवताडे यांच्या प्रयत्नामुळे प्रत्यक्षात कामाला लवकरच होणार सुरुवात

जळालेला ट्रान्सफॉर्मर ३ दिवसांत द्या, अन्यथा गाठ माझ्याशी आहे; आमदार समाधान आवताडे यांचा महावितरणला ‘खणखणीत’ इशारा; शेतकऱ्यांच्या विजेसाठी आमदार मैदानात

May 8, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! बेपत्ता तरुणाचा जंगलात सापडला मृतदेह; रागाच्या भरात उचलले टोकाचे पाऊल; मंगळवेढ्यातील तरुणाची हृदयद्रावक आत्महत्या

May 7, 2026
मंगळवेढ्यात थरकाप! पहाटेच्या अंधारात ATM वर दरोडा; पोलिसांना पाहताच दरोडेखोरांचा ‘धूम’ स्टाईलने पोबारा

मंगळवेढ्यात थरकाप! पहाटेच्या अंधारात ATM वर दरोडा; पोलिसांना पाहताच दरोडेखोरांचा ‘धूम’ स्टाईलने पोबारा

May 7, 2026
वाळू आता ऑनलाईन मिळणार; ‘ना नफा, ना तोटा’ वर विक्री, नव्या धोरणाला मान्यता; यांच्या अध्यक्षतेखालील तांत्रिक समिती नेमली जाणार

मंगळवेढ्यात कायद्याचा धाक उरलाय की नाही? सीसीटीव्हीवर कापड झाकून वाळूची उघड दरोडेखोरी; कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा

May 6, 2026
मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

हृदयद्रावक! प्रसूतीसाठी दाखल पत्नीला डबा द्यायला निघालेल्या पतीचा अपघातात अंत; जन्माला आलेल्या मुलाचे तोंडही पाहता आले नाही

May 5, 2026
मंगळवेढेकरांसाठी गोड बातमी! ‘चौंडेश्वरी रबडी हाऊस’चा आज भव्य शुभारंभ; प्रीमियम स्पेशल रबडी, थंडावा, हेल्दी ड्रिंक्स अनेक पदार्थ उपलब्ध

मंगळवेढेकरांसाठी गोड बातमी! ‘चौंडेश्वरी रबडी हाऊस’चा आज भव्य शुभारंभ; प्रीमियम स्पेशल रबडी, थंडावा, हेल्दी ड्रिंक्स अनेक पदार्थ उपलब्ध

May 2, 2026
Next Post
मराठा आंदोलकांच्या विरोधानंतर, MPSC च्या परीक्षाबाबत ठाकरे सरकारचा मोठा निर्णय!

तयारीला लागा! PSI, कर सहायक ते लिपीक टंकलेखक पदांची भरती; महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून जाहिरात प्रसिद्ध; 'एवढ्या' जागा भरणार

ताज्या बातम्या

कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

संतापजनक! शेतीच्या कारणावरून मुलाचा वडिलांवर चाकूने हल्ला; वडिलांची मुलाविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार

May 10, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

गावात पाणी नाही, मजुरांना पैसे नाही! ग्रामपंचायतींचा आर्थिक कारभार ठप्प; कोर्टाच्या आदेशामुळे सरपंच अडचणीत; ग्रामीण भागात संतापाचा उद्रेक

May 10, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

मंगळवेढ्यात गांजा विक्रीचे मोठे रॅकेट उध्वस्त; पाच जणांवर गुन्हे, झटपट श्रीमंत होण्याच्या नादात तरुण गजाआड; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

May 10, 2026
शेतकऱ्यांना मोठा आधार! सोलापुरात कांद्याला मिळाला प्रति क्विंटल ‘एवढया’ हजारांचा भाव

​कांदा रडवतोय! ५० पैसे किलो भाव; ७३ पिशव्या कांदा विकून खर्च वजा जाता शेतकऱ्याच्या पदरात उरली चहा-पाण्याइतकीच रक्कम; बळीराजा’चे डोळे पाणावले

May 9, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

मोठी बातमी! दहावीच्या परीक्षेत ‘या’ विषयात 80 हजारापेक्षा जास्त विद्यार्थी नापास

May 9, 2026
निराधार लेकरांसोबत सुखाचा घास! उद्योजक संजय आवताडे यांचा वाढदिवस अनाथ मुलांसोबत ‘सहभोजनाने’ होणार साजरा

निराधार लेकरांसोबत सुखाचा घास! उद्योजक संजय आवताडे यांचा वाढदिवस अनाथ मुलांसोबत ‘सहभोजनाने’ होणार साजरा

May 9, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा