mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

राजकीय खळबळ! परिचारक आणि भालके एकाच स्टेजवर, एकाच हारात दोघांचा सत्कार; भगीरथ भालके यांच्या उपस्थितीत प्रशांत परिचारकांचा भावी आमदार म्हणून उल्लेख

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
September 21, 2024
in मंगळवेढा, राजकारण, सोलापूर
राजकीय खळबळ! परिचारक आणि भालके एकाच स्टेजवर, एकाच हारात दोघांचा सत्कार; भगीरथ भालके यांच्या उपस्थितीत प्रशांत परिचारकांचा भावी आमदार म्हणून उल्लेख

टीम मंगळवेढा टाईम्स। 

पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील अनेक इच्छुक उमेदवार कामाला लागले आहेत. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून इच्छुक असलेले भगीरथ भालके यांनी मतदारसंघात जन आशीर्वाद यात्रा सुरू केली आहे.

याच मतदारसंघातून माजी आमदार प्रशांत परिचारक देखील इच्छुक आहेत. मात्र एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असणारे भालके-परिचारक आज मंगळवेढ्यात एकाच व्यासपीठावर आले होते.

श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याला राज्य सरकारच्या माध्यमातून 94 कोटी रुपये कर्ज मिळवून दिल्याबद्दल माजी आमदार प्रशांत परिचारक यांचा सत्कार ठेवण्यात आला होता.

या कार्यक्रमाला युवक नेते भगीरथ भालके हे जनआशीर्वाद यात्रा सोडून उपस्थित होते. भालके आणि परिचारक यांचा एकच हार घालून यावेळी सत्कार करण्यात आला. सत्कार प्रसंगी आयोजकांनी माजी आमदार प्रशांत परिचारक यांचा भावी आमदार असा उल्लेख केला.

यावेळी बोलताना भगीरथ भालके म्हणाले की, कार्यक्रम सुरू असताना पाऊस सुरू आहे हे मंगळवेढ्यासाठी शुभ संकेत आहेत.

माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी त्यांच्या सरकारला धारेवर धरून कारखान्याला मदत मिळवून दिली. ही मदत मिळू नये म्हणून काहींनी देव पाण्यात ठेवले होते. अशी टीका नाव न घेता त्यांनी आमदार समाधान आवताडे यांच्यावर केली.

दोन वर्षांपूर्वी भालके आणि परिचारक यांनी संत दामाजी साखर कारखान्याच्या निवडणुकीत समविचारी आघाडीची स्थापना केली होती. आज मी कार्यक्रमाला आलो नसतो तर काहींनी वेगळा अर्थ काढला असता. म्हणून जन आशीर्वाद यात्रा सोडून मी कार्यक्रमाला आलो.

यावेळी भगीरथ भालके यांनी राज्य सरकारवर टीका करणे टाळले. मी सरकारवर टीका केली तर प्रशांत परिचारकांना अडचणी अशी मिष्कील टिप्पणी यावेळेस त्यांनी केली.

राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: प्रशांत परिचारकभगीरथ भालके

संबंधित बातम्या

खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

ज्येष्ठ नागरिकांचा मोठा विजय! सुनेची याचिका फेटाळली; घराचा ताबा वृद्ध सासू-सासऱ्यांकडेच राहणार

September 27, 2026
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

​मोठी खळबळ! पोलिसांनाच गाडीखाली चिरडण्याचा प्रयत्न; पंढरपुरात आरोपींची बेधडक कृती, पाठलाग करून मुसक्या आवळल्या

September 27, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मोठी बातमी! दुष्काळाच्या झळा; दोन शेतकऱ्यांनी गमावला जीव, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

September 27, 2026

राज्यात दोन टप्प्यात दुष्काळ जाहीर होणार? पहिल्या 139 तालुक्यांची यादी आली समोर; सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यांचा समावेश

September 26, 2026
कै.आण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवेढयात विविध कार्यक्रम; सामाजिक कार्याबद्दल ‘यांना’ पुरस्कार जाहीर

कै.आण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त मंगळवेढ्यात आज पुरस्कार सोहळा; आमदार आवताडेंच्या हस्ते होणार सन्मान; पाहा कोणा-कोणाला मिळणार मानाचा ‘समाजभूषण पुरस्कार’?

September 25, 2026
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

घरात तहान, पाणी कर्नाटकच्या दारात! उजनी कालवाच्या गळतीमुळे मंगळवेढ्यातील शेतकरी संकटात; पाटबंधारे विभागाविरोधात संताप

September 24, 2026
अनाथ, वंचितांच्या आयुष्याला मायेची सावली: निंबोणीचे ‘सहारा बाल सेवा आश्रम’ ठरतेय निराधार चिमुकल्यांचे हक्काचे घर; ​शासकीय अनुदानाविना केवळ लोकवर्गणीतून उभा राहतोय मानवतेचा वसा

अनाथ, वंचितांच्या आयुष्याला मायेची सावली: निंबोणीचे ‘सहारा बाल सेवा आश्रम’ ठरतेय निराधार चिमुकल्यांचे हक्काचे घर; ​शासकीय अनुदानाविना केवळ लोकवर्गणीतून उभा राहतोय मानवतेचा वसा

September 24, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

आमदार समाधान आवताडेंचा मास्टरस्ट्रोक! प्रशासकीय कामांसाठी सोलापूरला जाण्याची कटकट संपली; पंढरपूरला अपर जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर; ‘या’ सात तालुक्यांना मोठा दिलासा

September 23, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

माझ्या मुलीला का नांदवत नाही?’ जावयाला रस्त्यावर पाडून दगडाने ठेचले; सासऱ्याचा मंगळवेढ्यात थरारक राडा; सासू, सासरे आणि पत्नीवर पोलीस कारवाई

September 25, 2026
Next Post
‘दामाजी’ला कोणाच्या सहकार्यामुळे ९४ कोटी कर्ज मंजुर झाले? प्रशांत परिचारक यांनी थेट जाहीर केलं नाव; राजकारण न आणता मदतीचा हात देऊन संस्था ठिकवावी; परीचारकांनी टोचले विरोधकांचे कान

'दामाजी'ला कोणाच्या सहकार्यामुळे ९४ कोटी कर्ज मंजुर झाले? प्रशांत परिचारक यांनी थेट जाहीर केलं नाव; राजकारण न आणता मदतीचा हात देऊन संस्था ठिकवावी; परीचारकांनी टोचले विरोधकांचे कान

ताज्या बातम्या

खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

ज्येष्ठ नागरिकांचा मोठा विजय! सुनेची याचिका फेटाळली; घराचा ताबा वृद्ध सासू-सासऱ्यांकडेच राहणार

September 27, 2026
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

​मोठी खळबळ! पोलिसांनाच गाडीखाली चिरडण्याचा प्रयत्न; पंढरपुरात आरोपींची बेधडक कृती, पाठलाग करून मुसक्या आवळल्या

September 27, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मोठी बातमी! दुष्काळाच्या झळा; दोन शेतकऱ्यांनी गमावला जीव, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

September 27, 2026

राज्यात दोन टप्प्यात दुष्काळ जाहीर होणार? पहिल्या 139 तालुक्यांची यादी आली समोर; सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यांचा समावेश

September 26, 2026
कै.आण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवेढयात विविध कार्यक्रम; सामाजिक कार्याबद्दल ‘यांना’ पुरस्कार जाहीर

कै.आण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त मंगळवेढ्यात आज पुरस्कार सोहळा; आमदार आवताडेंच्या हस्ते होणार सन्मान; पाहा कोणा-कोणाला मिळणार मानाचा ‘समाजभूषण पुरस्कार’?

September 25, 2026
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

घरात तहान, पाणी कर्नाटकच्या दारात! उजनी कालवाच्या गळतीमुळे मंगळवेढ्यातील शेतकरी संकटात; पाटबंधारे विभागाविरोधात संताप

September 24, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..