टीम मंगळवेढा टाईम्स ।
आज आषाढी एकादशीचा दिवस. हिंदू पंचांगानुसार,आषाढी एकादशीची तिथी ही फार पवित्र मानली जाते.आषाढी एकादशीलाच देवशयनी एकादशी असं देखील म्हणतात.हा वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव आहे.या दिवसापासूनच चातुर्मासाला सुरुवात होते.
आषाढी एकादशीलाच देवशयनी एकादशी म्हणतात. भगवान विष्णूला, विठ्ठलाला ही तिथी समर्पित आहे.
या दिवशी एकादशी तिथीनंतर भगवान विष्णू निद्रावस्थेत जातात तेव्हाच चातुर्मासाला सुरुवात होते. याचाच अर्थ, देव पुढचे चार महिने निद्रा घेतात. त्यामुळे या काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही.
आषाढी एकादशीनिमित्त काही उपाय केल्याने आयुष्य अधिक सोपं जगता येतं.
सुख-समृद्धीसाठी करा ‘हे’ उपाय
जर तुमच्या कुटुंबात सुख, शांती, समृद्धी नांदावी असं तुम्हाला वाटत असेल तर आजच्या दिवशी विठ्ठलाच्या मूर्तीचा जलाभिषेक करा. यामुळे विठ्ठलाबरोबरच देवी लक्ष्मीची देखील कृपा राहील. तसेच, तुमच्या घरात सुख-समृद्धी नांदेल.
वैवाहिक जीवन सुखी राहण्यासाठी करा ‘हे’ उपाय
आषाढी एकादशीच्या दिवशी पहाटे स्नान केल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करा. तसेच, तुळशीच्या रोपाची पूजा करा. यावेळी तुमच्या सुखी वैवाहिक जीवनासाठी प्रार्थना करा. यामुळे तुमचं वैवाहिक जीवन सुखी राहील.
आर्थिक तंगी दूर करण्यासाठी करा ‘हे’ उपाय
एकादशीच्या दिवशी पूजेच्या वेळी एक रुपयाचं नाणं विठ्ठलाच्या फोटोजवळ ठेवा. पूजा केल्यानंतर नाण्याला लाल रंगाच्या कापडात बांधून तिजोरीत ठेवा. यामुळे भगवान विष्णूसह तुमच्यावर देवी लक्ष्मीची देखील विशेष कृपा असणार आहे. तसेच, घरात धन-धान्याची देखील कमी भासणार नाही.
जीवनातील समस्या दूर करण्यासाठी ‘हे’ उपाय करा
आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठलाला केसरच्या दुधाने अभिषेक करा. असं केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते. त्याचबरोबर जीवनातील सर्व समस्या दूर होतात अशी मान्यता आहे.
इच्छेनुसार विवाह होण्यासाठी ‘हे’ उपाय करा
जर तुमच्या वैवाहिक जीवनात अनेक अडचणी येत असतील तर आषाढी एकादशीच्या दिवशी स्नान केल्यानंतर विठ्ठलाला नमन करा. विठ्ठल नामाचा गजर करा. तुमचं वैवाहिक जीवन सुखी होईल.
(टीप : वरील सर्व बाबी ‘मंगळवेढा टाईम्स न्युज’ केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून मंगळवेढा टाईम्स न्युज कोणताही दावा करत नाही.)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज