टीम मंगळवेढा टाईम्स ।
मराठा समाजाला सर्वात जास्त फसवणारा बेईमान नेता हे शरद पवार असल्याची टीका भाजप आमदार आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी केली आहे.
त्यांच्यासमोर शकुनी मामा देखील फेल आहे असं लोणीकर म्हणाले. परतूर येथील भाजप कार्यकर्ता मेळाव्यामध्ये बबनराव लोणीकर बोलत होते.
दरम्यान मराठा आणि ओबीसीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना हे भांडण लावत असल्याचा आरोप देखील बबनराव लोणीकर यांनी केला.
तसेच या तिन्ही पक्षांना शिव्यांची लाखोली देखील लोणीकरांनी वाहिली. जातीपातीच्या बहकाव्यात येऊ नका, काँग्रेसवाले बेईमान आहेत,
तर उद्धव ठाकरेंची शिवसेनावाले बेबनाव करणारे आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेसलाही लोणीकरांनी शिव्यांची लाखोली वाहीली आहे.
महाविकास आघाडीच्या सरकारनं मराठा आरक्षण घालवलं
मराठा आरक्षण हे आपल्या सरकारनं दिल्याचे बबनराव लोणीकर म्हणाले. पण महाविकास आघाडीच्या सरकारनं ते आरक्षण घालवल्याचे लोणीकर म्हणाले.
उद्धव ठाकरे हे खोटं पण रेटून बोलत आहेत. आम्ही सारे हिंदू एक आहोत. मोदींजींना सबका साथ सबका विकास हा नारा दिला आहे. त्याप्रमाणे काम सुरु असल्याचे लोणीकर म्हणाले.(स्रोत:ABP माझा)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज