टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा येथील संत कान्होपात्रा महिला पतसंस्थेच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त मंगळवेढा एसटी स्टँड येथे पंढरपूर कडे जाणाऱ्या भाविकांना फराळाचे वाटप करण्यात आले.
यावेळी तेथील भाविकांना राजगिरा लाडू, केळी, खिचडी, केळी व पाण्याच्या बाटल्या देण्यात आल्या.
या कार्यक्रमास मंगळवेढा आगार प्रमुख संजय भोसले, सुरसंगम ग्रुपचे प्रमुख दिगंबर भगरे, मंगळवेढा म्युझिक क्लबचे अध्यक्ष लहु ढगे ,सुरसंगम फॅमिली क्लबचे अध्यक्ष लक्ष्मण नागणे, संपादक समाधान फुगारे,
पत्रकार दावल इनामदार, बाळासाहेब नागणे विलास मासाळ, औदुंबर ढावरे, अभियंता नामदेव काशीद, मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष सचिन डोरले, माध्यमिक शिक्षक पतसंस्थेचे माजी चेअरमन लक्ष्मण हेंबाडे,
संत कान्होपात्रा महिला पतसंस्थेच्या संस्थापक चेअरमन सीमा भगरे, संचालिका सुवर्णा काशीद, सुवर्णा नागणे, रेश्मा ढगे, रसिका हेंबाडे, प्र.व्यवस्थापिका करिष्मा मुलाणी यांचेसह मंगळवेढा आगारातील् चालक, वाहक, एसटी कर्मचारी तसेच अनेक भाविक व महिला उपस्थित होत्या.
तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपुरात टोकन दर्शन सुरू होणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा
आषाढी एकादशीच्या निमित्ताने आज बुधवारी पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न झाली. महापूजा संपन्न झाल्यानंतर विठ्ठल रुक्मिणीच्या पदस्पर्श दर्शनाला सुरुवात झाली. विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच वारकऱ्यांनी लांबच लांब रांगा लावल्या होत्या
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते विठ्ठल-रखुमाईची शासकीय पूजा पार पडली. यावेळी त्यांनी सलग तिसऱ्यांदा महापूजा करण्याचा मान मिळाल्यानं पांडुरंगाचे आभार मानले आहेत.
पांडुरंगाच्या आशीर्वादानं सरकार चांगलं काम करत असून प्रत्येक घटक सुखी-समाधानी व्हावा हेच मागणं विठ्ठलाकडे मागितल्याचं त्यांनी म्हटलंय.
दुसरीकडे तिरुपती बालाजीच्या धर्तीवर पंढरपुरात टोकन दर्शन सुरू होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. यासाठी 103 कोटींचा निधी शासनाकडून उपलब्ध करुन त्यासाठी 103 कोटी देणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तिरुपती बालाजीच्या धर्तीवर ही सेवा देण्यात येणार आहे.
तिरुपतीमध्ये टोकन सेवा सकाळी पाच वाजल्यापासून सुरू असते. त्यासाठी टोकन घेऊन तुम्हाला तुमचं आधार कार्ड दाखवून रांगेत उभं न राहता थेट दर्शन घेता येतं.
तासंतास रांगेत उभं न राहता हे दर्शन घेता येतं. त्याच पार्श्वभूमीवर आता पंढरपुरातही ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी किती पैसे भरावे लागणार, किती वेळ ही सुविधा असणार याबाबत सविस्तर माहिती समोर आली नाही.
अकरा पत्रा शेड भाविकांनी फुल्ल झाले होते. सावळ्या विठुरायाच्या दर्शना नंतर भाविक आनंदी झाले. राज्यात भरपूर पाऊस पाणी पडू दे, माझा बळीराजा सुखी आणि समाधानी राहू दे, असं साकडं आपण विठुरायाच्या चरणी घातल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील अंबासन येथील बाळू शंकर अहिरे आणि आशा बाळू अहिरे या वारकरी दाम्पत्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत शासकीय महापूजेला उपस्थित राहण्याचा मान मिळाला.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज