टीम मंगळवेढा टाईम्स ।
आषाढी एकादशीनिमित्ताने आज मंगळवेढ्यातील दोन विठ्ठल भक्तांनी मंगळवेढा ते गोपाळपूर या मार्गावरील पहिल्या पाच फेऱ्या नागरिकांसाठी मोफत ठेवल्या आहेत.
विठ्ठल भक्तांची सेवा हा उदात्त हेतू ठेवून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आषाढी एकादशी दिवशी गोपाळपूर ते मंगळवेढा या मार्गावर
मंगळवेढा आगाराच्या पहिल्या पाच एस.टी. बसेसच्या प्रवाशांना मंगळवेढा महालक्ष्मी ज्वेलर्सचे संचालक अर्जुन रामकृष्ण नागणे व क्ष-किरण वैज्ञानिक,
ग्रामीण रुग्णालय मंगळवेढाचे संतोष बाबुराव गवंडी यांचेतर्फे मोफत प्रवास घडविण्यात येणार आहे.
तरी सदर उपक्रमाचा प्रवाशांनी अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन आगार प्रमुख संजय भोसले यांनी केले आहे.
आषाढी यात्रेसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन तब्बल 5 हजार बसेस
आषाढी यात्रेनिमित्त विठू नामाचा जयघोष करीत श्री श्रेत्र पंढरपुरला येणाऱ्या भाविक- प्रवाशांच्या सेवेसाठी एसटी सदैव तत्पर आहे. यात्राकाळात 5 हजार विशेष बस सोडून लाखो भाविकांना सुलभ आणि सुरक्षित प्रवासी सेवा देण्यासाठी एसटी कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन एसटी महामंडळाचे मा. उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.माधव कुसेकर यांनी केले.
यंदा पावसाची शक्यता गृहीत धरून प्रवाशांना यात्रा बसस्थानकावरील सोई-सुविधांची व्यवस्था करावी, बसेस चिखलात अडकून पडणार नाहीत, अशा पद्धतीने त्यांची पार्किंग करण्यात यावे. तसेच आपल्या एसटी बसेसमुळे वाहतूक कोंडी होणार नाही याची दक्षता घ्यावी. ” याबरोबरच जादा वाहतुकीसाठी येणारे हजारो चालक, वाहक, यांत्रिकी कर्मचारी पर्यवेक्षक व अधिकारी यांची राहण्याची, जेवणाची तसेच नैसर्गिक विधीची व्यवस्थित व्यवस्था करण्यात यावी. अशा सूचना कुसेकर यांनी स्थानिक प्रशासनात दिल्या आहेत.
ग्रुप बुकिंग असल्यास थेट गावापासून पंढरपूर पर्यंत एसटी
विशेष म्हणजे यंदा राज्यातील कोणत्याही गावातून 40 अथवा त्या पेक्षा जास्त भाविक प्रवाशांनी एकत्रित मागणी केल्यास त्यांना थेट पंढरपूरला जाण्यासाठी त्यांच्या गावातून एसटी बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी भाविक प्रवाशांनी आपल्या जवळच्या आगारात संपर्क साधावा असे आवाहन एसटी महामंडळातर्फे करण्यात आले आहे.
अर्थात, या प्रवासात देखील 75 वर्षावरील ज्येष्ठांना मोफत प्रवास देणारी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना, महिलांसाठी 50 टक्के तिकीट दरात सुट देणारी महिला सन्मान योजना यासारख्या शासनाने दिलेल्या सर्व सवलती लागू राहणार आहेत. मागील वर्षी 18 लाख भाविक-प्रवाशांची सुरक्षित वाहतूक मागील वर्षी एसटीने आषाढी यात्रे निमित्त 4245 विशेष बसेस सोडल्या होत्या. याव्दारे यात्रा काळामध्ये 18 लाख, 30 हजार, 934 भाविक प्रवाशांची सुखरूप ने-आन एसटीने केली होती.
चार तात्पूरर्ती बस स्थानके
पंढरपूर यात्रेसाठी राज्यभरातील लाखो भाविकांसाठी विविध विभागांतून गाड्या सोडण्यात येणार आहेत. वारकरी, भाविक तसेच पर्यटकांची होणारी गर्दी पाहता एकाच स्थानकावर गर्दी होऊ नये यासाठी प्रवाशांच्या सोयीसाठी यात्रा कालावधीत पंढरपूर येथे चंद्रभागा, भिमा, पांडुरंग (आयटीआय कॉलेज) व विठ्ठल कारखाना यात्रा स्थानक अशी चार तात्पुरती बस स्थानके उभारण्यात येणार आहेत.
दरम्यान, यात्रा काळात बसस्थानकावर पिण्याचे पाणी, सुलभ शौचालय, संगणकीय आरक्षण केंद्र, चौकशी कक्ष, मार्गदर्शन फलक… अशा विविध सोयी-सुविधा पुरविण्यात येणार असून जास्तीत जास्त भाविक-प्रवाशांनी, एसटीच्या सुरक्षित प्रवासी सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
चार प्रमुख बसस्थानके
1 चंद्रभागा बसस्थान – मुंबई, ठाणे, रायगड, सातारा, पुणे विभाग व पंढरपूर आगार
2 भिमा यात्रा देगाव – छत्रपती संभाजी नगर , नागपूर व अमरावती प्रदेश
3 विठ्ठल कारखाना – नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर
4 पांडुरंग बसस्थानक – सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज