mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

धक्कादायक! पोलिस अकॅडमीतील तरूणीला लग्नाचे अमिष दाखवून जबरदस्तीने केले अत्याचार; मंगळवेढ्यातील एकाविरूध्द गुन्हा दाखल

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
June 16, 2024
in क्राईम, मंगळवेढा
सोलापुरात गोपीचंद पडळकरांनी पुकारलेल्या आंदोलनानंतर ‘धनगर’ समाजाच्या नेत्यांनीच केला संयोजकावर खुनी हल्ला

टीम मंगळवेढा टाईम्स ।

पोलिस भरतीसाठी अकॅडमीत प्रवेश घेतलेल्या एका 22 वर्षीय तरूणीला लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी जबरदस्तीने तीच्याशी लैंगिक संबंध ठेवून ऐनवेळी लग्नास नकार दिल्याप्रकरणी चंद्रकांत सुरेश कोळी (रा.सिध्दापूर) याच्याविरूध्द मंगळवेढा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,यातील 22 वर्षीय तरुणी ही अन्य तालुक्यातील असून  सन 2021 मध्ये तीने बालाजीनगर येथील पोलिस भरती अकॅडमीमध्ये प्रवेश घेतला होती.

या दरम्यान आरोपी चंद्रकांत कोळी यानेही तेथेच अ‍ॅडमिशन घेतल्याने या दोघांची ओळख निर्माण झाली होती. अकॅडमीत असताना आरोपी हा नेहमी फिर्यादीचा पाठलाग करून बोलण्याचा प्रयत्न करायचा.

जून 2021 मध्ये फिर्यादीने नवीन मोबाईल घेतल्यावर आरोपीने मोबाईल नंबर मागून घेतला व त्यावर सारखे मेसेज पाठविण्याचे कृत्य करायचा.दि.7 मे 2021 रोजी पिडीता रहात असलेल्या खोलीच्या पाठीमागे आरोपीने येवून

माझे तुइयावर प्रेम असून तु मला खूप आवडतेस असे म्हणताच पिडीतेने त्याला नकार दिला.त्यावेळी तुझा काय प्रॉब्लेम आहे ते मला एकदा सांग,मला तुइयासोबत लग्न करायचे असून मी तुइया घरच्यांशी बोलतो असे म्हणाला.

वेळप्रसंगी मी घरच्यांचा मारही खाईन पण तुइयाशीच लग्न करणार आहे. तु लग्नाला तयार झाली नाही तर मी काहीतरी जीवाचे बरेवाईट करून घेईन.तुइयाशिवाय मी राहूच शकत नाही.असे म्हणताच पिडीतेने त्याला वारंवार समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.

मात्र तो ऐकण्याच्या मनःस्थितीत नसल्याने तो बहिणीच्या मोबाईलवर फोन करून त्रास देत होता. त्याने आक्टोबर 2022 मध्ये लग्न कर म्हणून स्वतःचा हात ब्लेडने कापून घेतला व मी मरणार असल्याची धमकी देवू लागला.लॉकडाऊनमध्ये पिडीता ही गावाकडे रहाण्यास गेल्यावर आरोपीने पिडीतेच्या गावी जावून तीचा वाढदिवस साजरा केला व चल आपण लग्न करू या असे म्हणून शरीर सुखाची मागणी करू लागला.

त्यावेळी पिडीतेने नकार देत समजावून सांगून आरोपीला पाठवून दिले. दि.13 मार्च 2023 रोजी पिडीता ही पोलिस भरतीला नायगाव-मुंबई येथे गेल्यावर सोलापूरला येण्यास सांगितले.

आरोपीने सोलापूर येथे जावून पिडीतेला मोटर सायकलवर घेवून तांडोर येथील एका ऊसाच्या फडात रात्री 11.00 वा. नेवून तुइयासोबत लग्न करणार आहे असे म्हणून विश्‍वासात घेवून शरीर संबंध ठेवले. तदनंतर दुसर्‍या दिवशी पिडीतेला मंगळवेढा येथे पाठविले.

दुसर्‍या दिवशी लग्नाबाबत पिडीतेने विचारले असता बोलण्यास टाळाटाळ करून पिडीतेचा नंबर ब्लॉक केला.  दि.25 जून 2023 रोजी आरोपीने स्वतःची चूक कबूल करून भेटण्याची विनंती केली. व मरवडे येथे भेटण्यास बोलावले.

सायंकाळी पाचच्या दरम्यान एका शेतात नेवून तुइयाशी लग्न करायला तयार आहे असे म्हणून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. आरोपीने फिर्यादीकडून बर्‍याच वेळा पैसेही मागून घेतले होते. 13 नोव्हेंबर 2023 रोजी पिडीता ही पुण्याला पोलिस भरतीसाठी निघाल्यावर आरोपीने सोबत येवून पुण्यात लॉज बुक करून लॉजवर रहायला नेले.त्यावेळी पिडीतेची संमती नसताना शरीर संबंध ठेवले.

नंतर लग्नाबाबत विचारल्यावर टाळाटाळ केली.तदनंतर  फेब्रुवारी 2024 रोजी रात्री 11.00 वा. मंगळवेढयातील रुमवरून गाडीवर बसून बोराळे रोडवर शेतात नेवून शारिरिक सुखाची मागणी केली.यावेळी नकार दिला असता आरोपीने मारहाण केली.

पिडीता ही रडत असताना तीच्या संमतीविना जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले. अशा अवस्थेत पिडीतेला रूमवर आणून सोडले.ती रात्रभर झोपली नाही.लग्नाचे अमिष दाखवून वारंवार शारिरिक संबंध ठेवून लग्न करण्यास टाळाटाळ केली.  मी तुइयासोबत लग्न करणार नाही तु केस जरी दाखल केली तरी मला काही फरक पडणार नाही.

तक्रार केली तर तुला जीवंत सोडणार नाही अशी धमकी देवून हाकालून दिले असल्याचे दिलेल्या फिर्यादीत पिडीतेने म्हटले आहे.याचा अधिक तपास पोलिस करीत आहेत. पिडीतेच्या फिर्यादीवरून भा.द.वि.कलम 376(2) (एन),323,504,506 प्रमाणे आरोपीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मंगळवेढा गुन्हेगार

संबंधित बातम्या

मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

​मोठी खळबळ! पोलिसांनाच गाडीखाली चिरडण्याचा प्रयत्न; पंढरपुरात आरोपींची बेधडक कृती, पाठलाग करून मुसक्या आवळल्या

September 27, 2026

राज्यात दोन टप्प्यात दुष्काळ जाहीर होणार? पहिल्या 139 तालुक्यांची यादी आली समोर; सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यांचा समावेश

September 26, 2026
कै.आण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवेढयात विविध कार्यक्रम; सामाजिक कार्याबद्दल ‘यांना’ पुरस्कार जाहीर

कै.आण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त मंगळवेढ्यात आज पुरस्कार सोहळा; आमदार आवताडेंच्या हस्ते होणार सन्मान; पाहा कोणा-कोणाला मिळणार मानाचा ‘समाजभूषण पुरस्कार’?

September 25, 2026
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

घरात तहान, पाणी कर्नाटकच्या दारात! उजनी कालवाच्या गळतीमुळे मंगळवेढ्यातील शेतकरी संकटात; पाटबंधारे विभागाविरोधात संताप

September 24, 2026
अनाथ, वंचितांच्या आयुष्याला मायेची सावली: निंबोणीचे ‘सहारा बाल सेवा आश्रम’ ठरतेय निराधार चिमुकल्यांचे हक्काचे घर; ​शासकीय अनुदानाविना केवळ लोकवर्गणीतून उभा राहतोय मानवतेचा वसा

अनाथ, वंचितांच्या आयुष्याला मायेची सावली: निंबोणीचे ‘सहारा बाल सेवा आश्रम’ ठरतेय निराधार चिमुकल्यांचे हक्काचे घर; ​शासकीय अनुदानाविना केवळ लोकवर्गणीतून उभा राहतोय मानवतेचा वसा

September 24, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

आमदार समाधान आवताडेंचा मास्टरस्ट्रोक! प्रशासकीय कामांसाठी सोलापूरला जाण्याची कटकट संपली; पंढरपूरला अपर जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर; ‘या’ सात तालुक्यांना मोठा दिलासा

September 23, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

माझ्या मुलीला का नांदवत नाही?’ जावयाला रस्त्यावर पाडून दगडाने ठेचले; सासऱ्याचा मंगळवेढ्यात थरारक राडा; सासू, सासरे आणि पत्नीवर पोलीस कारवाई

September 25, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! काळ्या आईची सेवा करतानाच काळाची झडप; मंगळवेढ्यात सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू

September 24, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

माझ्या जिवाला आईकडूनच धोका! तरुणीच्या उत्तराने पोलीसही चक्रावले; विवाह नोंदणीत कुटुंबप्रमुखाची संमती सक्तीची हवी; एका आईच्या अश्रूंनी पेटवला नवा सामाजिक प्रश्न; वारी परिवारानी केली मोठी मागणी

September 21, 2026
Next Post
पंढरीतील महाआरोग्य शिबिरात ५००० वैद्यकीय कर्मचारी वारकऱ्यांच्या सेवेसाठी उपलब्ध असणार; आरोग्यमंत्री सावंत यांची संकल्पना

वारकऱ्यांनो! आषाढी वारीतील दिंड्यांना 'इतक्या' हजार रुपयांचे अनुदान मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

ताज्या बातम्या

खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

ज्येष्ठ नागरिकांचा मोठा विजय! सुनेची याचिका फेटाळली; घराचा ताबा वृद्ध सासू-सासऱ्यांकडेच राहणार

September 27, 2026
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

​मोठी खळबळ! पोलिसांनाच गाडीखाली चिरडण्याचा प्रयत्न; पंढरपुरात आरोपींची बेधडक कृती, पाठलाग करून मुसक्या आवळल्या

September 27, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मोठी बातमी! दुष्काळाच्या झळा; दोन शेतकऱ्यांनी गमावला जीव, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

September 27, 2026

राज्यात दोन टप्प्यात दुष्काळ जाहीर होणार? पहिल्या 139 तालुक्यांची यादी आली समोर; सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यांचा समावेश

September 26, 2026
कै.आण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवेढयात विविध कार्यक्रम; सामाजिक कार्याबद्दल ‘यांना’ पुरस्कार जाहीर

कै.आण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त मंगळवेढ्यात आज पुरस्कार सोहळा; आमदार आवताडेंच्या हस्ते होणार सन्मान; पाहा कोणा-कोणाला मिळणार मानाचा ‘समाजभूषण पुरस्कार’?

September 25, 2026
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

घरात तहान, पाणी कर्नाटकच्या दारात! उजनी कालवाच्या गळतीमुळे मंगळवेढ्यातील शेतकरी संकटात; पाटबंधारे विभागाविरोधात संताप

September 24, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा