टीम मंगळवेढा टाईम्स।
डॉ.ऋचा रुपनर आत्महत्याप्रकरणी भाऊसाहेब रुपनर यांच्या पोलिस कोठडीची शुक्रवार, १४ जून रोजी मुदत संपल्याने तपास अधिकारी
यांनी सांगोला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने शनिवार, १५ जूनपर्यंत एक दिवस पोलिस कोठडी वाढवून दिली आहे. वाढवून दिलेली कोठडी आज संपणार आहे.
सांगोला येथील डॉ. ऋचा सूरज रुपनर यांच्या आत्महत्येप्रकरणी पती डॉ. सूरज रुपनर, सासरे भाऊसाहेब रुपनर या पिता-पुत्रांना अटक केली होती.
दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता सूरज रुपनर यास सोमवार, १७ जूनपर्यंत पोलिस कोठडी दिली होती, तर भाऊसाहेब रुपनर यांना १४ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती.
भाऊसाहेब रुपनर यांच्या पोलिस कोठडीची शुक्रवारी मुदत संपल्याने पोलिसांनी न्यायालयात हजर केले. दरम्यान डॉ. ऋचा रुपनर आत्महत्या प्रकरणातील तिसरा संशयित आरोपी सासू सुजाता रुपनर यांना अद्याप अटक केली नसल्याचे समजते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज