mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मोठा दावा! शरद पवार यांचे 5 सर्वात मोठे गौप्यस्फोट; महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात खरंच काही बदल होतात का?

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 20, 2024
in राजकारण, राज्य
एका बाजूला यांची मोदींची गॅरंटी आणि दुसऱ्या बाजूला दर दिवसाला शेतकरी आत्महत्या करतोय; ही स्थिती किती दिवस चालू द्यायची; शरद पवारांनी साधला निशाणा

टीम मंगळवेढा टाईम्स ।

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी ‘लोकसत्ता’ वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अनेक गौप्यस्फोट केले आहेत. त्यांच्या या गौप्यस्फोटांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात खरंच काही बदल होतात का?

ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीनंतर शिवसेनेकडून मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे यांच्या नावाचा प्रस्ताव महाविकास आघाडीच्या बैठकीत आला होता का? या प्रश्नाचं उत्तर शरद पवार यांनी दिलंय. त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्या नावाला आमची हरकत नव्हती, असं स्पष्टीकरण शरद पवारांनी दिलं आहे.

तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल हे 2004 मध्ये भाजपसोबत जाण्यासाठी आग्रही होते, असा मोठा दावा शरद पवारांनी केलाय. शरद पवार यांनी असे अनेक गौप्यस्फोट केले आहेत. त्यापैकी 5 महत्त्वाच्या गौप्यस्फोटांची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

शरद पवार यांचे 5 महत्त्वाचे गौप्यस्फोट

पहिला – “विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री करण्यास आमची हरकत नव्हती. पण त्यांचं नाव आमच्यापुढे आलं नाही. एकनाथ शिंदे यांच्या नावाबद्दल शिवसेनेअंतर्गत चर्चा झाल्याचं नंतर समजले”, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

दुसरा – “2014 मध्येच महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न होता, असा मोठा दावा शरद पवार यांनी केला. भाजप आणि शिवसेनेत अंतर पाडण्याचा आमचा प्रयत्न होता. शिवसेना भाजपसोबत गेली आणि 2014 मध्ये महाविकास आघाडीचा आमचा प्रयोग फसला”, असंदेखील शरद पवार म्हणाले.

तिसरा – “प्रफुल्ल पटेल 2004 पासूनच भाजपसोबत जाण्यासाठी आग्रही होते. काँग्रेसबरोबर जाण्यास प्रफुल्ल पटेल यांनी विरोध केला होता. तरीदेखील युपीए सरकारमध्ये आम्ही पटेल यांना केंद्रीय मंत्रीपद दिलं. 2004च्या निवडणुकीच्या आधीपासून प्रफुल्लभाई सारखं सांगायचे की, या निवडणुकीत आपले पक्ष टिकणार नाहीत. वाजपेयींना पर्याय नाही. आपण सगळे भाजपमध्ये जाऊ, तासंतास त्यांनी आग्रह केला होता. शेवटी मी नाही म्हणून सांगितलं. तुम्ही जा म्हणून सांगितलं. शेवटी अक्षरश: त्यांच्या डोळ्यांत पाणी आलं”, असा मोठा दावा शरद पवार यांनी केला.

चौथा- “2004 मध्ये पक्षाकडे मुख्यमंत्रीपदासाठी योग्य नेता नव्हता. अजित पवार त्यावेळी नेता नव्हता. अजित दादा नवखे होते. त्यावेळी छगन भुजबळ यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोपवलं असतं तर भविष्यात पक्षात फूट पडली असती”, असा मोठा दावा शरद पवार यांनी केला.

पाचवा- “काँग्रेसबाहेर पडलेल्या नेत्यांनी स्थापन केलेले छोटे पक्ष विलीन होऊ शकतात. आपला पक्ष विलीन करण्याचा विचार नाही. पुढे हा पर्याय त्याज्य नाही”, असं स्पष्टीकरण शरद पवार यांनी दिलं.(स्रोत:TV9 मराठी)

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: शरद पवार

संबंधित बातम्या

नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल; नेमकं कारण काय?

February 22, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

खुर्ची तीच, फक्त नाव बदलले! ग्रामंपचायतींवर सरपंचांना प्रशासक बनवून सरकारने साधली ‘राजकीय सोय’

February 22, 2026
खळबळ! सोलापूरात महिलेवर अत्याचारप्रकरणी एका पोलिस निरीक्षकावर गुन्हा दाखल

भिगवण तरुणी अपहरण प्रकरणात नवा ट्विस्ट, तरुणीचा रवानगी सुधारगृहात; आता तरुणाचं काय होणार? तरुणीचे धक्कादायक शपथपत्र

February 21, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

खळबळजनक! दहावीच्या परीक्षेत १० ‘मुन्नाभाई’; तरुणीसह २० जणांवर मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; केंद्र संचालकांच्या सतर्कतेने मोठा रॅकेट उघड

February 21, 2026
देखो चॅंद आया ! जाणून घ्या ‘या’ वर्षातील रमजानमधील सेहरी आणि इफ्तारची भारतातील वेळ

आल्हाददायक! तब्बल ३० वर्षांनी निसर्गाची साथ, फेब्रुवारीत रमजान आल्याने वाढत्या तापमानाची चिंता मिटली; रोजेधारकांसाठी यंदाचा महिना ठरणार सुखद

February 20, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

पंचायत समिती नंतर जिल्हा परिषदेच्या निवडी; नव्या सदस्यांचे गॅझेट झाले प्रसिद्ध; निवडणूक कार्यक्रम होणार लवकरच जाहीर;..अशी असेल पुढची प्रक्रिया…

February 17, 2026
धक्कादायक : मंगळवेढ्यात दारूच्या नशेत अल्पवयीन मुलाची आत्महत्या

आई मला माफ कर…! 23 वर्षीय तरुणाने उचललं टोकाचं पाऊल; नोट वाचून पोलीसही हादरले

February 17, 2026
भीमेचा श्वास गुदमरतोय! वाळू उपशाच्या हव्यासामुळे भीमेचं अस्तित्व धोक्यात; पर्यावरणाचा समतोल कोलमडला; वाळू माफियांच्या ‘ड्रेझर’ खाली नदीचं पात्र छिन्नविच्छिन्न; भविष्यात पाणीटंचाईचे संकेत

भीमेचा श्वास गुदमरतोय! वाळू उपशाच्या हव्यासामुळे भीमेचं अस्तित्व धोक्यात; पर्यावरणाचा समतोल कोलमडला; वाळू माफियांच्या ‘ड्रेझर’ खाली नदीचं पात्र छिन्नविच्छिन्न; भविष्यात पाणीटंचाईचे संकेत

February 16, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांसाठी खूशखबर! साता-बारा होणार कोरा, राज्यात शेतकरी कर्जमाफीचा दिवस ठरला; ‘या’ दिवशी होणार घोषणा

February 15, 2026
Next Post
चिंता वाढली : मंगळवेढ्यात कोरोनाचा दहावा बळी; 35 वर्षीय महिलेचा मृत्यू

कामाची बातमी! मृत्यूनंतर जग कसं दिसतं? निधनानंतर जिवंत झाली महिला, सांगितला थरारक अनुभव

ताज्या बातम्या

Gas booking Number : आता गॅस बुकिंगसाठी संपूर्ण देशात एकच नंबर; जूना नंबर करा डिलिट

मंगळवेढेकरांनो! गॅसची ‘ई-केवायसी’ त्वरित करा, अन्यथा सबसिडी होईल बंद; ​शांतीसागर इंडेन गॅस कंपनीने नागरिकांना केले आवाहन

February 22, 2026
नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल; नेमकं कारण काय?

February 22, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

सोलापूर जिल्हा परिषदेच्या नव्या सदस्यांची जात वैधता पडताळणी होणार; सदस्यांची यादी मागितली

February 22, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

खुर्ची तीच, फक्त नाव बदलले! ग्रामंपचायतींवर सरपंचांना प्रशासक बनवून सरकारने साधली ‘राजकीय सोय’

February 22, 2026
खळबळ! सोलापूरात महिलेवर अत्याचारप्रकरणी एका पोलिस निरीक्षकावर गुन्हा दाखल

भिगवण तरुणी अपहरण प्रकरणात नवा ट्विस्ट, तरुणीचा रवानगी सुधारगृहात; आता तरुणाचं काय होणार? तरुणीचे धक्कादायक शपथपत्र

February 21, 2026
मोठी बातमी! उपसा सिंचन योजनेच्या कामाचे निघाले टेंडर; आ.आवताडे यांच्या प्रयत्नामुळे प्रत्यक्षात कामाला लवकरच होणार सुरुवात

शेत आणि पाणंद रस्त्यांसाठी प्रशासकीय हालचालींना वेग; शेतकऱ्यांनी थेट तहसीलदारांशी संपर्क साधण्याचे आवाहन; आमदार आवताडेंचा शेतकऱ्यांच्या हितासाठी पुढाकार

February 22, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा