mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

तरुणांनो! नुकतीच ओळख झालेल्या मित्राला भेटायला जाताय तर सावधान; ‘या’ शहरात घडली थरकाप उडवणारी घटना

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
April 11, 2024
in क्राईम, राज्य
फायनान्स कंपनीची मुजोरी! मंगळवेढ्यात सामाजिक कार्यकर्त्यास दिली जीवे मारण्याची धमकी

टीम मंगळवेढा टाईम्स। 

सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा कुणाच्या तरी मध्यस्थीने ओळख झाली असेल तर वेळीच सावध व्हा. ही ओळख तुमच्या जीवावर उठू शकते. तुम्हाला आयुष्यातून उठवू शकते. तुमच्या घरच्यांना नाहक त्रास देणारी ठरू शकते.

तुमची एक चूक सर्वांसाठी कशी महागात पडू शकते हे तुम्हालाही कळणार नाही. पुण्यात एका तरुणीची एका तरुणासोबत नुकतीच ओळख झाली. केवळ तोंडओळख असतानाही ही तरुणी त्याला भेटायला गेली अन् पुढे जे घडलं त्याने शांत, संयमी पुणेकर हादरले. सध्या ही घटना पुण्यात चर्चेचा विषय झाली आहे.

पुण्यातील एका अभियांत्रिकी कॉलेजमध्ये शिक्षण घेत असणारी तरुणी नुकतीच ओळख झालेल्या आपल्या मित्राला भेटायला गेली होती. पण ही तरुणी मॉलमध्ये गेली आणि आपला जीव गमावून बसली.

या तरुणीला भेटायला आलेल्या तिच्या मित्राने तिचं त्याच मॉल परिसरातून काही साथीदारांसह अपहरण केलं. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांकडे 9 लाख रुपयांची खंडणी मागितली. खंडणी दिली नाही म्हणून या तीन नराधमांनी त्या तरुणीचा गळा दाबून खून केला.

शेतात मृतदेह जाळला

या तरुणीचा खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी या तरुणांनी नगरजवळील एका शेतात तिचा मृतदेह जाळला. त्यानंतर या तरुणीचा जळालेला मृतदेह एका खड्यात पुरला. ही घटना उघड झाल्यानंतर संपूर्ण पुणे हादरून गेलंय. पुणेकरांच्या तोंडचं पाणी पळालं आहे. या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून अधिक तपास करत आहेत.

आईला म्हणाली…

या तरुणीने घरातून निघताना मैत्रिणीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी जात असल्याचं आईला सांगितलं होतं. आईचं आणि तिचं हे शेवटचं बोलणं होतं. त्यानंतर ती घरी आली नाही म्हणून तिच्या कुटुंबीयांनी तक्रार केल्याचं अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी सांगितलं. कोणतीही ओळख नसतान नुकतीच ओळख झालेल्या मित्राला भेटायला जाणं या तरुणीच्या जीवावर बेतलं. त्यामुळे पुण्यात घबराट पसरली आहे.

पोलीस काय म्हणाले?

या प्रकरणी अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी माहिती दिली. गावाकडचा असल्याचं सांगून या मुलाने तिला बोलावलं होतं. त्यानंतर गाडीतच तिची हत्या केली. नंतर तिच्या कुटुंबीयांकडे त्यांनी खंडणीची मागणी केली होती, असं मनोज पाटील यांनी सांगितलं.

विमानतळ परिसरात ही घटना घडली. 1 तारखेला अपहरणाची माहिती मिळाली. 2 तारखेला या मुलीच्या आईच्या फोनवर फोन आला आणि त्यांच्याकडे काही रक्कमची मागणी करण्यात आली. विशेष म्हणजे ज्या दिवशी अपहरण केलं त्याच दिवशी त्यांनी हत्या केली होती. नंतर खंडणी मागण्यात आली आहे. तपासात खंडणीसाठीच खून झाल्याचं तपासात निष्पन्न झालं, असं पाटील म्हणाले.

दोघेही एकाच कॉलेजात शिकणारे होते. एकाच भागात राहणारे होते. त्यांचा परिचय होता. गावाकडचा आहे म्हणून त्याने या मुलीशी ओळख केली आणि तिला बोलावून हत्या केली. या प्रकरणी तिच्या वर्गात शिकणाऱ्या शिवमला अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत तिघांना अटक केली आहे. त्यातील एक तिच्या वर्गात शिकतो. दुसरा डिप्लोमा करतो तर तिसरा इयत्ता बारावीत आहे, असं पाटील यांनी स्पष्ट केलं.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: सोशल मीडिया

संबंधित बातम्या

महिलांनो! बसने प्रवास करताय तर सावधान, मंगळवेढा बसस्थानकावरून महिला प्रवाशाचे १० लाख किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात पळविले; स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल

मंगळवेढा बस स्थानकावर प्रवास करताय? तर सावधान! गर्दीच्या ठिकाणी स्वतःच्या साहित्याची आणि पैशांची काळजी घ्या; वृद्ध शेतकऱ्याची पुंजी चोरट्याने उडवली

June 6, 2026

मराठा विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; ओबीसींप्रमाणे ‘या’ 8 सवलती लागू; जीआर देखील निघाला

June 6, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मनोज जरांगे इफेक्ट! मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाचा निर्णय, शासकीय यंत्रणा लागली कामाला; ‘हा’ हेल्पलाइन नंबरही जारी

June 5, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

आता खेळ खल्लास! भेसळखोरांविरोधात तुकाराम मुंढे आक्रमक; शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय

June 5, 2026
तयारी! बँक ठेवी विमा संरक्षण ‘एवढ्या’ लाखांपर्यंत वाढवण्याचा विचार; सध्या मर्यादा ५ लाख; खातेधार व ठेवीदारांना याचा होणार लाभ

शेतकऱ्यांनो! आधी ‘ही’ रक्कम बँकेत भरावी लागणार; मगच मिळणार कर्जमाफी व नवीन पीककर्ज

June 5, 2026
बडा मासा! मंगळवेढा प्रांत कार्यालयातील तलाठी निघाला लाचखोर; लाचेची रक्कम घेऊन केला पोबारा; लाच कुणाच्या सांगण्यावरून?

धक्कादायक! स्त्री रोगतज्ञ डॉक्टर लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात; 4500 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडलं

June 4, 2026
माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते देवेंद्र फडणवीसांचा सत्कार; मालकांनी ठरल्याप्रमाणे केलं… आता संधी मिळणार का? परिचारक समर्थकांचा सवाल

मालक, आता निर्णय घ्या! परिचारक समर्थकांचा भाजपला थेट इशारा, बंडखोरी की पेल्यातील वादळ? पक्षाने शब्द पाळला नाही; प्रशांत परिचारकांकडून मात्र ‘सबुरी’चा सल्ला

June 4, 2026
बळीराजाला मोठा दिलासा! शेतकरी कर्जमाफीची घोषणा; देवेंद्र फडणवीसांची घोषणा; कोणाचे कर्ज होणार माफ?

बळीराजाला मोठा दिलासा! शेतकरी कर्जमाफीची घोषणा; देवेंद्र फडणवीसांची घोषणा; कोणाचे कर्ज होणार माफ?

June 2, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

मदरशात धार्मिक शिक्षणाच्या नावाखाली अश्लील चाळे; सोलापूरच्या नराधम मौलानाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; पीडितांचा आकडा वाढण्याची भीती

June 2, 2026
Next Post
एका बाजूला यांची मोदींची गॅरंटी आणि दुसऱ्या बाजूला दर दिवसाला शेतकरी आत्महत्या करतोय; ही स्थिती किती दिवस चालू द्यायची; शरद पवारांनी साधला निशाणा

मोठी बातमी! अखेर शरद पवारांनी डाव टाकलाच; माढ्यातून यांनाच उमेदवारी? पक्षप्रवेशाचा मुहूर्तही ठरला

ताज्या बातम्या

नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

शाळेची भीती संपणार! सोलापूर जिल्ह्यात ‘या’ शाळेतच अंगणवाडी भरणार; बालवयात शाळेची गोडी लागणार; ग्रामीण शिक्षणाला मिळणार नवी दिशा

June 6, 2026
महिलांनो! बसने प्रवास करताय तर सावधान, मंगळवेढा बसस्थानकावरून महिला प्रवाशाचे १० लाख किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात पळविले; स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल

मंगळवेढा बस स्थानकावर प्रवास करताय? तर सावधान! गर्दीच्या ठिकाणी स्वतःच्या साहित्याची आणि पैशांची काळजी घ्या; वृद्ध शेतकऱ्याची पुंजी चोरट्याने उडवली

June 6, 2026

मराठा विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; ओबीसींप्रमाणे ‘या’ 8 सवलती लागू; जीआर देखील निघाला

June 6, 2026
मंगळवेढ्यात आर्थिक प्रगतीचा नवा अध्याय! ‘नूतन महिला अर्बन’चा आज दिमाखदार शुभारंभ; महिला सक्षमीकरणासाठी विविध योजनांची मेजवानी

मंगळवेढ्यात आर्थिक प्रगतीचा नवा अध्याय! ‘नूतन महिला अर्बन’चा आज दिमाखदार शुभारंभ; महिला सक्षमीकरणासाठी विविध योजनांची मेजवानी

June 6, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मनोज जरांगे इफेक्ट! मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाचा निर्णय, शासकीय यंत्रणा लागली कामाला; ‘हा’ हेल्पलाइन नंबरही जारी

June 5, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

आता खेळ खल्लास! भेसळखोरांविरोधात तुकाराम मुंढे आक्रमक; शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय

June 5, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा