mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

बापरे..! बायकोला ‘सेकंड हँड’ म्हणणं पतीला भलतचं महागात पडलं; आता द्यावी लागणार तीन कोटींची भरपाई, कोर्टाने दिले आदेश; काय आहे प्रकरण?

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
April 23, 2024
in मनोरंजन, राष्ट्रीय
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

टीम मंगळवेढा टाईम्स ।

नवरा-बायकोच्या नात्यात भांडणं होणं हे कॉमन असतं. पती-पत्नीमध्ये वाद तर होतच असतात, पण थोड्याच वेळात हे भांडण मिटतं आणि नवरा-बायको पुन्हा गुण्या-गोविंदाने राहू लागतात.

मात्र काही वेळा भांडणादरम्यान असे काही शब्द बोलले जातात जे मनाला लागतात, शब्दांनी झालेली जखम पटकन बरी होत नाही आणि प्रकरण वाढतं.

अशीच एक घटना समोर आली आहे, ज्यामध्ये पत्नीला रागात काही बोलणं पतीला खूप महागात पडलं आहे. खरंतर या प्रकरणातील नवऱ्याने पत्नीला ‘सेकंड हँड’ म्हटलं होतं, मात्र ते त्याच्याच अंगावर शेकलं.

बायकोला ‘सेकंड हँड’ म्हटल्याने नवऱ्याला आता तिला तब्बल 3 कोटीं रुपयांची भरपाई द्यावी लागणार आहे. एवढंच नव्हे तर तिला दर महिन्याला खर्चासाठी 1.5 लाख रुपयेही द्यावे लागणार आहेत. न्यायालयाने हे आदेश दिले आहेत.

या प्रकरणातील पीडितेच्या सांगण्यानुसार, त्या दोघांचं 1994 मध्ये लग्न झालं. दोघेही हनिमूनसाठी नेपाळला गेले होते. यावेळी तिच्या पतीने तिला ‘सेकंड हँड’ म्हटले. वास्तविक, पीडितेचं याआधी लग्न ठरलं होतं, साखरपुडाही झाला होता, मात्र काही कारणाने तो मोडला.

नंतर पीडितेचं लग्न झालं. लग्नानंतर दोघेही पती-पत्नी अमेरिकेला गेले. त्यांनी अमेरिकेत लग्नसोहळाही आयोजित केला होता. काही दिवसांनी आरोपी पतीने पीडितेला मारहाण करण्यास सुरुवात केली. तो तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन खोटे आरोप करू लागला.

दरम्यान, पती-पत्नी दोघेही 2005 मध्ये मुंबईत परतले आणि संयुक्त मालकीच्या घरात राहू लागले. 2008 साली पीडिता ही आईसोबत राहण्यासाठी तिच्या माहेरी गेली. तर 2014 साली नवरा पुन्हा अमेरिकेला परतला.

महिलेने घेतली कोर्टात धाव

त्यानंतर निराश होऊन पीडितेने 2017 मध्ये मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टात घरगुती हिंसाचार कायद्याअंतर्गत तक्रार दाखल केली. पीडितेने केलेल्या आरोपांना तिची आई, भाऊ आणि काका यांनीही दुजोरा दिला.

पीडित महिला ही घरगुती हिंसाचाराची बळी ठरल्याचे न्यायालयाने मान्य केले. जानेवारी 2023 मध्ये न्यायालयाने आरोपी पतीला 3 कोटी रुपये नुकसानभरपाई, दादरमध्ये घर शोधण्यासाठी, पर्यायाने घरासाठी 75 हजार रुपये आणि दरमहा दीड लाख रुपये देखभाल भत्ता देण्याचे निर्देश दिले.

पतीने घेतली उच्च न्यायालयात धाव

ट्रायल कोर्टाच्या या आदेशाविरोधात आरोपी पतीने हायकोर्टात फेरविचार याचिका दाखल केली होती. आता मुंबई उच्च न्यायालयाने ट्रायल कोर्टाचा तो आदेश कायम ठेवला आहे. त्यानुसार, त्या इसमाला, त्याच्या पत्नीला तीन कोटी रुपयांची भरपाई आणि दीड लाख रुपयांची पोटगी देण्याचे निर्देश देण्यात आले.

ही रक्कम महिलेला केवळ शारीरिक दुखापतीसाठीच नव्हे तर मानसिक छळ आणि भावनिक त्रासाची भरपाई म्हणून देण्यात आली आहे, असे उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांनी आदेशात म्हटले. घरगुती हिंसाचारामुळे पत्नीच्या स्वाभिमानावर परिणाम झाला, असेही नमूद करण्यात आले.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: नवरा बायको

संबंधित बातम्या

कै.आण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवेढयात विविध कार्यक्रम; सामाजिक कार्याबद्दल ‘यांना’ पुरस्कार जाहीर

कै.आण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त मंगळवेढ्यात आज पुरस्कार सोहळा; आमदार आवताडेंच्या हस्ते होणार सन्मान; पाहा कोणा-कोणाला मिळणार मानाचा ‘समाजभूषण पुरस्कार’?

September 25, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

मांडव उधळला! साखरपुडा झाला, मांडवही सजला… पण ऐनवेळी पोलिस पोहोचले; मंगळवेढ्यात बालविवाह रोखत पालकांना दणका; लिहून घेतले ‘हे’ हमीपत्र

September 17, 2026
​‘माणगंगा’चा माणुसकीचा झरा! उपनगराध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त हजारो रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी; मूकबधिर विद्यार्थ्यांना मदतीचा हात

​‘माणगंगा’चा माणुसकीचा झरा! उपनगराध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त हजारो रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी; मूकबधिर विद्यार्थ्यांना मदतीचा हात

September 16, 2026
शिक्षकांनी पिढ्या घडवल्या! मंगळवेढ्यात विठाई परिवारातर्फे शिक्षक सन्मान सोहळा उत्साहात संपन्न; पारदर्शक कारभाराचे मान्यवरांकडून कौतुक

शिक्षकांनी पिढ्या घडवल्या! मंगळवेढ्यात विठाई परिवारातर्फे शिक्षक सन्मान सोहळा उत्साहात संपन्न; पारदर्शक कारभाराचे मान्यवरांकडून कौतुक

September 7, 2026
आमदार शहाजी पाटील यांच्या एंन्ट्रीने युवा महोत्सवाला आली रंगत, खास शैलीत विद्यार्थ्यांशी साधला संवाद; म्हणाले…

अघोरी पूजेचा पर्दाफाश! माझ्या भाच्याला जीवे मारण्यासाठी उघडे-नागडे होऊन पूजा केली;  सांगोल्यात शहाजीबापूंचा अंगावर काटा आणणारा आरोप

September 5, 2026
रक्षाबंधन आजच! दिवसभरात ‘या’ 5 मुहूर्तात कधीही बांधा राखी; फक्त ‘ही’ वेळ सांभाळा

रक्षाबंधन आजच! दिवसभरात ‘या’ 5 मुहूर्तात कधीही बांधा राखी; फक्त ‘ही’ वेळ सांभाळा

August 28, 2026
सोलापूर ग्रामीणमध्ये आज 244 जण कोरोनामुक्त, 223 नवे रुग्ण; वीस वर्षीय तरुणीचा मृत्यू

मोठी बातमी! कोरोनानंतर आता पुन्हा एका आजाराने डोके काढले वर; रुग्णांची संख्या वाढतेय झपाट्याने, गेल्या 24 तासांत…

August 26, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

धक्कादायक! शिक्षिकेने ६ वर्षांच्या विद्यार्थ्याच्या कानशिलात लगावली; पुढच्याच क्षणी चिमुकल्याचा जागीच तडफडून मृत्यू

August 22, 2026
मंगळवेढ्याचा शूर सुपुत्र अमर झाला! श्रीनगरमध्ये कर्तव्य बजावताना जवान वैभव आवताडे यांना वीरमरण; आज रात्री पार्थिव पुण्यात येणार

मंगळवेढ्याचा शूर सुपुत्र अमर झाला! श्रीनगरमध्ये कर्तव्य बजावताना जवान वैभव आवताडे यांना वीरमरण; आज रात्री पार्थिव पुण्यात येणार

August 15, 2026
Next Post
नीट समजून घ्या! दामाजी साखर कारखाना निवडणुक; यांनाच मिळणार मताचा अधिकार

'दामाजी'च्या अडचणीला स्व.सुधाकरपंत यांच्यानंतर प्रशांत परिचारक धावले मदतीला; एनसीडीसीकडून कारखान्यास 'एवढ्या' कोटीची मंजूरी

ताज्या बातम्या

खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

ज्येष्ठ नागरिकांचा मोठा विजय! सुनेची याचिका फेटाळली; घराचा ताबा वृद्ध सासू-सासऱ्यांकडेच राहणार

September 27, 2026
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

​मोठी खळबळ! पोलिसांनाच गाडीखाली चिरडण्याचा प्रयत्न; पंढरपुरात आरोपींची बेधडक कृती, पाठलाग करून मुसक्या आवळल्या

September 27, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मोठी बातमी! दुष्काळाच्या झळा; दोन शेतकऱ्यांनी गमावला जीव, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

September 27, 2026

राज्यात दोन टप्प्यात दुष्काळ जाहीर होणार? पहिल्या 139 तालुक्यांची यादी आली समोर; सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यांचा समावेश

September 26, 2026
कै.आण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवेढयात विविध कार्यक्रम; सामाजिक कार्याबद्दल ‘यांना’ पुरस्कार जाहीर

कै.आण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त मंगळवेढ्यात आज पुरस्कार सोहळा; आमदार आवताडेंच्या हस्ते होणार सन्मान; पाहा कोणा-कोणाला मिळणार मानाचा ‘समाजभूषण पुरस्कार’?

September 25, 2026
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

घरात तहान, पाणी कर्नाटकच्या दारात! उजनी कालवाच्या गळतीमुळे मंगळवेढ्यातील शेतकरी संकटात; पाटबंधारे विभागाविरोधात संताप

September 24, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा