mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढ्यातील प्रलंबित विकास कामे सुरू करण्यास जाणूनबुजून विलंब, ‘या’ संबंधितावर कारवाई करा; अजित जगताप यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
March 15, 2024
in मंगळवेढा
Breaking! मंगळवेढ्याच्या दोन ‘नायब तहसीलदारां’ची तहसीलदार पदावर पदोन्नती

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढा शहरातील विविध विकास कामे खोळंबली असून आलेला निधी माघारी जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे जबाबदार अधिकाऱ्यावरती निलंबनाची कारवाई करावी अशी लेखी तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष अजित जगताप यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे केली आहे.

दिलेल्या तक्रारीत म्हंटले आहे की, सांस्कृतिक भवन कामाचे वर्क ऑर्डर देऊनही शासकीय दबावापोटी ठेकेदारास लाईन आऊट न दिल्यामुळे काम सुरू झाले नाही सदर कामास मिळालेला 7 कोटी निधी परत जाण्याची शक्यता असल्याने यास नगरपरिषद इंजिनियर सोनटक्के यांना जबाबदार धरून निलंबित करण्यात यावे सदरचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे.

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर विकसित करणे या निविदेश जाणून बुजून राजकीय दबाव पोटे वारंवार मुदतवाड देऊन सदरचे काम आचारसंहिता लागेपर्यंत रखडून ठेवणारे अधिकाऱ्या वरती कारवाई करून सदरचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे.

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे पुतळा परिसर सुशोभीकरण करणे कामाचे निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून जाणून-बुजून राजकीय दबाव पोटी सर्व प्रक्रिया रद्द करण्यात आली नंतर फेरनिविदा काढून आचारसंहितेमध्ये सदर काम रखडून ठेवण्याचे अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्याचे सदरचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे.

अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेतून साठे नगर व भीमनगर साठी पाण्याच्या टाकीचे काम गेले तीन वर्षे झाले अद्याप पूर्ण नाही त्यामुळे दलित वस्तीत पाण्याची टंचाई होत आहे. तरी तात्काळ सदर काम सुरू करून पाणीपुरवठा करण्यात यावा.

नागणेवाडी येथील पाण्याच्या टाकीचे वर्क ऑर्डर होऊन पण काम अद्याप सुरुवात नाही त्यामुळे निधी परत जाण्याची शक्यता आहे तरी तात्काळ काम सुरू करण्यात यावे.

S.T. स्टॅन्ड ते नर्मदा पार्क, कृष्ण नगर ते संभाजीनगर रस्त्यावरील प्लॉट धारकांची अतिक्रमणे काढून नागरिकांसाठी रस्ता खुला करण्यात यावा.

S.T. स्टॅन्ड ते किल्लाभाग रस्ता भूसंपादन करण्याचे कामाची रक्कम भरून 5 वर्ष झाली परंतु प्रशासनाच्या ना करते पणामुळे आज अखेर ते प्रलंबित आहे, तरी तात्काळ भूसंपादन होऊन रस्त्याचे काम करण्यात यावे.

रोजंदारी कामगारांना कायम करण्याची मागणी करून गेली 20 ते 25 वर्षे झाले तरी याबाबत ठराव होऊन हीं शासन दरबारी प्रशासनाकडून पाठपुरवठा होत नाही. तरी तात्काळ शासनास प्रस्ताव सादर करावा.

स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्र नवीन इमारत येथे फर्निचर करणे, ई लायब्ररी करणे काम जाणीवपूर्वक न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर ते कारवाई करण्यात यावी.

सांगोला रोड ते बोराळ नाका या रस्त्याचे काम वर्ष झाले तरी पूर्ण नाही नागरिकांची हेळसांड होत आहे. तरी संबंधित अधिकाऱ्यांवर ते कारवाई करावी वरून रस्त्याचे काम तात्काळ करणे ही विनंती.

वरील सर्व कामाबाबत आपण नगरपरिषदे कडील संबंधित कर्मचारी यांची चौकशी करून या जबाबदार अधिकाऱ्यावरती निलंबनाची कारवाई करावी व मंगळवेढा शहरातील प्रलंबित विकास कामे सुरू करावेत अशी मागणी देखील जगताप यांनी केली आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मंगळवेढा नगरपालिका

संबंधित बातम्या

दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

March 8, 2026
​’साप्ताहिक रणयुग टाईम्स’चा १४ वा वर्धापन दिन: मंगळवेढ्यात कर्तृत्ववानांचा होणार सन्मान; संपादक प्रमोद बिनवडे यांची माहिती

​’साप्ताहिक रणयुग टाईम्स’चा १४ वा वर्धापन दिन: मंगळवेढ्यात कर्तृत्ववानांचा होणार सन्मान; संपादक प्रमोद बिनवडे यांची माहिती

March 8, 2026
मंगळवेढ्यात विद्यार्थ्यांसाठी ‘सुवर्णसंधी’! एका कोर्सच्या फीमध्ये दुसरा कोर्स मोफत; ACTI कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटची ऑफर; महिला दिनानिमित्त मुलींना विशेष सवलत

मंगळवेढ्यात विद्यार्थ्यांसाठी ‘सुवर्णसंधी’! एका कोर्सच्या फीमध्ये दुसरा कोर्स मोफत; ACTI कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटची ऑफर; महिला दिनानिमित्त मुलींना विशेष सवलत

March 8, 2026
जनतेचे समाधान! मंगळवेढ्यात ‘महाराजस्व’चा महामेळावा; एकाच दिवशी 1584 लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू; ‘हा’ ठरला राज्यातील पहिला उपक्रम

जनतेचे समाधान! मंगळवेढ्यात ‘महाराजस्व’चा महामेळावा; एकाच दिवशी 1584 लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू; ‘हा’ ठरला राज्यातील पहिला उपक्रम

March 7, 2026
दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार नको, १ लाखाचा लाभ द्या; ​उपसरपंच बालाजी गरड यांची शासनाकडे आग्रही मागणी ​

March 7, 2026
मेजवानी! मरवडे फेस्टिव्हलचे सोमवारपासून आयोजन; कलावंतांच्या आविष्कारासह शोभायात्रेचे आयोजन; शेकडो कलावंत सहभागी होणार

सज्ज व्हा! मरवडे फेस्टिव्हलचा आजपासून शुभारंभ, पाच दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी आणि प्रबोधनाची वारी

March 7, 2026
अभिनंदनास्पद! तहसीलदार मदन जाधव यांना महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावरील ‘उत्कृष्ट अधिकारी’ म्हणून पुरस्कार जाहीर

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाला आजपासून शुभारंभ; महसूल विभागाच्या योजना आता शेतकऱ्यांच्या बांधावर

March 7, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

धक्कादायक! ​झाड काढण्यावरून सख्खा भाऊ आणि बापच बनले वैरी; मंगळवेढ्यात विहिरीवर चालला थरार

March 6, 2026
चमकदार कामगिरी! सोलापूर पोलिसांनी उध्वस्त केला बनावट नोटांची छपाई करणारा अड्डा

दहावी परीक्षेला तोतया विद्यार्थी बसविल्याप्रकरणी रॅकेटच्या मास्टरमाईंडला सांगलीतून अटक; आणखीन कोणाचा सहभाग? तपास सुरू

March 6, 2026
Next Post
Breaking! आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देणार मोठी जबाबदारी; आज वाढदिवसादिवशीच घोषणा होण्याची शक्यता

नागरिकांनो! आरोग्यमंत्री डॉ.तानाजीराव सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त आज लवंगी येथे रक्तदान शिबिर व 'लकी ड्रॉ'चे आयोजन

ताज्या बातम्या

Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

​धक्कादायक! शेतीचा वाद ठरला काळ; सुसाईड नोटमध्ये मांडली व्यथा आणि संपवलं आयुष्य

March 8, 2026
दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

March 8, 2026
​’साप्ताहिक रणयुग टाईम्स’चा १४ वा वर्धापन दिन: मंगळवेढ्यात कर्तृत्ववानांचा होणार सन्मान; संपादक प्रमोद बिनवडे यांची माहिती

​’साप्ताहिक रणयुग टाईम्स’चा १४ वा वर्धापन दिन: मंगळवेढ्यात कर्तृत्ववानांचा होणार सन्मान; संपादक प्रमोद बिनवडे यांची माहिती

March 8, 2026
मंगळवेढ्यात विद्यार्थ्यांसाठी ‘सुवर्णसंधी’! एका कोर्सच्या फीमध्ये दुसरा कोर्स मोफत; ACTI कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटची ऑफर; महिला दिनानिमित्त मुलींना विशेष सवलत

मंगळवेढ्यात विद्यार्थ्यांसाठी ‘सुवर्णसंधी’! एका कोर्सच्या फीमध्ये दुसरा कोर्स मोफत; ACTI कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटची ऑफर; महिला दिनानिमित्त मुलींना विशेष सवलत

March 8, 2026
जनतेचे समाधान! मंगळवेढ्यात ‘महाराजस्व’चा महामेळावा; एकाच दिवशी 1584 लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू; ‘हा’ ठरला राज्यातील पहिला उपक्रम

जनतेचे समाधान! मंगळवेढ्यात ‘महाराजस्व’चा महामेळावा; एकाच दिवशी 1584 लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू; ‘हा’ ठरला राज्यातील पहिला उपक्रम

March 7, 2026
दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार नको, १ लाखाचा लाभ द्या; ​उपसरपंच बालाजी गरड यांची शासनाकडे आग्रही मागणी ​

March 7, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..