mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

कामाची बातमी! शेतकऱ्यांना अवघ्या ‘इतक्या’ रुपयांत मिळणार वीज; निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारची मोठी घोषणा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
March 8, 2024
in राज्य
विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून, सर्वसामान्यांना काय मिळणार? असं असेल अधिवेशनाचे कामकाज

टीम मंगळवेढा टाईम्स ।

राज्यातील शेतकऱ्यांना आता 24 तास अगदी स्वस्तात वीज मिळणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने याविषयीचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना अवघ्या दोन रुपयांत वीज मिळेल.

या सर्व योजनेचा घोषवारा उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल. तर महावितरण ही नवरत्न कंपनी करण्याचा संकल्प ही त्यांनी सोडला. वीज कर्मचाऱ्यांच्या समस्या आणि त्यांच्या अडचणी तातडीने सोडविण्याचे आश्वासन पण त्यांनी दिले.

दीड वर्षात चमत्कार

राज्य सरकारने आतापर्यंत दीड लाख पंप दिले आहेत. पण आता आपण या एकाच वर्षांमध्ये 8 लाख सोलर पंप मंजूर करुन निधीचा पुरवठा केल्याचे फडणवीस यांनी सांगितले. मागेल त्याला सोलर पंप देण्यात येणार आहेत.

सध्या पाच लाख सोलरची मागणी असून राज्य सरकारकडे आठ लाख सोलर पंप असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचा शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. शेतकऱ्यांचे रात्रीचे वीजेचे संकट आम्ही संपवू असे वचन दिले होते. त्याप्रमाणे ते आम्ही पूर्ण करु. दीड वर्षात आता 50 टक्के शेतकऱ्यांचे हे संकट संपविण्याचे अभिवचन त्यांनी दिले.

स्वस्तात मिळणार वीज

शेतकऱ्यांना स्वस्तात वीज मिळणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. ही वीज आता 24 तास उपलब्ध असेल. शेतकऱ्यांन 2 रुपये 87 पैसे ते 3 रुपये 10 पैशात वीज मिळणार आहे.

त्यासाठी पूर्वी राज्य सरकारला साडेसात रुपयांचा खर्च येतो. हा खर्च मोठ्या प्रमाणात वाचेल. तसेच राज्यात विजेची पण बचत होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यासाठी केवळ 11 महिन्यामध्ये ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.

अजून 18 महिने काम पूर्ण करण्यासाठी देण्यात आले आहे. एकूण कृषी फीडर पैकी 50 टक्के फिडर हे पुढच्या दीड वर्षांमध्ये सोलर होतील. 50% फीडर्सचे काम पूर्ण होताच, महाराष्ट्र पहिलं राज्य असेल की ज्यामध्ये 100% कृषी जी काही वीज निर्मिती आहे ही सोलरवर त्या ठिकाणी ट्रान्सफॉर्म होईल आणि खर्चाची बचत होईल, असे ते म्हणाले.

महावितरण होणार नवरत्न

सध्या सबसिडीवर राज्य सरकार 13000 कोटी रुपये खर्च करते. सौर पंपामुळे हा खर्च वाचेल. तर औद्योगिक वीजेचा दर पण काही प्रमाणात बदलता येतील. सध्या जी ॲग्री सोलर कंपनी काढलेली आहे.त्याच्या आधारावर पुरत्या तीन ते चार वर्षांमध्ये महावितरण कंपनीला नवरत्न कंपनीमध्ये आणण्याचा आमचा प्रयत्न आहे.

आजच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे 40,000 कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. तर 25000 रोजगार निर्मिती होणार असल्याचे ऊर्जामंत्री फडणवीस यांनी सांगितले.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: महाराष्ट्र राज्य सरकार

संबंधित बातम्या

मंगळवेढेकरांनो! दलित मित्र कदम गुरुजी महाविद्यालय व इंग्लिश स्कूलचे स्नेहसंमेलन; ‘ही’ प्रसिद्ध सिनेअभिनेत्रीची असणार उपस्थिती

दहावीच्या निकालात मोठा उलटफेर! पुनर्मूल्यांकनानंतर मंगळवेढ्याची पाटील महाराष्ट्रात सर्वप्रथम; मंगळवेढा इंग्लिश स्कूलच्या शिरपेचात रोवला मानाचा तुरा

June 20, 2026
बळीराजाला मोठा दिलासा! शेतकरी कर्जमाफीची घोषणा; देवेंद्र फडणवीसांची घोषणा; कोणाचे कर्ज होणार माफ?

मोठी बातमी! सरकारी जमिनी हडपणाऱ्यांना मोठा दणका… ‘या’ जमिनींवर आता थेट महाराष्ट्र शासनाचे नाव लागणार…;  ‘इतक्या’ महिन्यांचा अल्टीमेटम

June 20, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

शेतकऱ्यांनो! राज्याला पावसाची हुलकावणी, हवमान विभागाचा हादरवणारा अंदाज; आता थेट ‘या’ तारखेनंतरच पाऊस

June 20, 2026
‘चांगले दिवस येणार होते, पण तू सोडून गेलीस…’ रीलस्टार रोहिणी पारध्ये आत्महत्येप्रकरण; पतीची पहिली पोस्ट चर्चेत, नेमके कारण काय?

स्क्रीनवर लाखो फॉलोअर्स, पण खऱ्या आयुष्यात नरकयातना! रिल स्टार रोहिणी पाराध्येच्या मृत्यूचा खरा विलन अखेर समोर; मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

June 20, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

राज्य सरकारची मोठी घोषणा! महिला बचत गटांना मिळणार अडीच एकर जमीन आणि 1 लाखांचं अनुदान; काय आहे योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये?

June 18, 2026
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

महायुती सरकारचं मोठं पाऊल, ‘या’ शहरामध्ये सुरू होतेय देवाभाऊ टॅक्सी सेवा; स्वस्तात मस्त होईल प्रवास

June 18, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

धक्कादायक! नव्या दुचाकीची खरेदी, मिठाईतून 7 जणांना विषबाधा; थेट तुकाराम मुंढेंशी संपर्क अन् स्वीट मार्ट सील

June 17, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

सरपंच निवड जनतेतून तर ग्रामपंचायत सदस्यांचे काय महत्त्व? ‘हम करे सो कायदा’ म्हणत मनमानी कारभार; प्रहार संघटनेचे राकेश पाटील यांचा थेट सरकारला सवाल

June 15, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

रुग्णालयांची मनमानी खपवून घेणार नाही! औषध खरेदीच्या सक्तीवर तुकाराम मुंढेंचा कडक प्रहार; रुग्णांची आर्थिक लूट थांबणार

June 14, 2026
Next Post
एका बाजूला यांची मोदींची गॅरंटी आणि दुसऱ्या बाजूला दर दिवसाला शेतकरी आत्महत्या करतोय; ही स्थिती किती दिवस चालू द्यायची; शरद पवारांनी साधला निशाणा

मोठी बातमी! मी शरद पवार आहे, माझा नाद करू नका; शरद पवार यांचा 'या' आमदाराला सज्जड दम

ताज्या बातम्या

मंगळवेढेकरांनो! दलित मित्र कदम गुरुजी महाविद्यालय व इंग्लिश स्कूलचे स्नेहसंमेलन; ‘ही’ प्रसिद्ध सिनेअभिनेत्रीची असणार उपस्थिती

दहावीच्या निकालात मोठा उलटफेर! पुनर्मूल्यांकनानंतर मंगळवेढ्याची पाटील महाराष्ट्रात सर्वप्रथम; मंगळवेढा इंग्लिश स्कूलच्या शिरपेचात रोवला मानाचा तुरा

June 20, 2026
धक्कादायक! ज्या रुग्णालयात हजारो रुग्णांवर उपचार केले तिथंच घेतला अखेरचा श्वास; सोलापूरमधील प्रसिद्ध न्युरोफिजिशियन डॉ.शिरीष वळसंगकर यांनी जीवन संपवलं

सोलापुरात खळबळ! देवमाणूस गेला, पण मागे वादाची ठिणगी पडली; डॉ. वळसंगकर यांच्या कुटुंबातील ‘तो’ वाद अखेर चव्हाट्यावर; पोलिसांसमोर मोठा खुलासा

June 20, 2026
बळीराजाला मोठा दिलासा! शेतकरी कर्जमाफीची घोषणा; देवेंद्र फडणवीसांची घोषणा; कोणाचे कर्ज होणार माफ?

मोठी बातमी! सरकारी जमिनी हडपणाऱ्यांना मोठा दणका… ‘या’ जमिनींवर आता थेट महाराष्ट्र शासनाचे नाव लागणार…;  ‘इतक्या’ महिन्यांचा अल्टीमेटम

June 20, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

शेतकऱ्यांनो! राज्याला पावसाची हुलकावणी, हवमान विभागाचा हादरवणारा अंदाज; आता थेट ‘या’ तारखेनंतरच पाऊस

June 20, 2026
मोठी बातमी! धैर्यशील मोहिते पाटलांनी दिला भाजपा पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा; भाजपाची मोठी डोकेदुखी वाढणार

अदृश्य शक्तीनं आम्हाला साथ दिली, दुष्काळात ‘वसंत’ बहरेल; धैर्यशील मोहिते पाटलांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास

June 19, 2026
‘चांगले दिवस येणार होते, पण तू सोडून गेलीस…’ रीलस्टार रोहिणी पारध्ये आत्महत्येप्रकरण; पतीची पहिली पोस्ट चर्चेत, नेमके कारण काय?

स्क्रीनवर लाखो फॉलोअर्स, पण खऱ्या आयुष्यात नरकयातना! रिल स्टार रोहिणी पाराध्येच्या मृत्यूचा खरा विलन अखेर समोर; मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

June 20, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा