mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

निराशाजनक! राज्यातील ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर; मंगळवेढा, पंढरपूरला दुष्काळी तालुक्याच्या सुधारित यादीतून वगळले

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 1, 2023
in मंगळवेढा, राज्य
येरे येरे पावसा! मंगळवेढा तालुक्यात दुष्काळी परिस्थिती, गावगाडा ठप्प झाल्याने नागरिकांचे गावागावात ग्रामदैवतांना जलाभिषेक

टीम मंगळवेढा टाईम्स। 

महाराष्ट्रातील १५ जिल्ह्यातील २४ तालुक्यांत गंभीर तर १६ तालुक्यांत मध्यम दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. सरकारने मंगळवारी या संदर्भातील आदेश जारी केले आहेत. राज्यात जून ते सप्टेंबर या कालावधित बऱ्याच ठिकाणी पाऊस कमी झाला होता.

त्यानंतर राज्यस्तरीय दुष्काळ देखरेख समितीकडून अहवाल मागवण्यात आला होता. या समितीच्या शिफारसींनुसार सरकारने हा निर्णय घेतला आहे.

दुसरीकडे मंगळवेढा तालुक्यात कोरडवाहू जमिनीचे क्षेत्र जास्त असून यंदा अनेक महसूल मंडळांमध्ये पाऊस कमीच झाला. तरीसुद्धा मंगळवेढा व पंढरपूर तालुके दुष्काळाच्या यादीत नाहीत. तालुक्याचे विद्यमान आमदार- माजी आमदार मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकार दरबारी विशेष प्रयत्न करतील का, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

सोलापूर जिल्ह्यातील १९१ महसूल मंडळांपैकी जवळपास ९५ महसूल मंडळांमध्ये पावसाने मोठा खंड दिला होता. त्यावेळी खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले होते. आता रब्बीच्या पेरण्या सुरू आहेत, पण ओल कमी असल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. उजनी धरणातील पाणीसाठा ५६ टक्क्यांवर आला असून फेब्रुवारीत धरण मायनस होईल, अशी चिंताजनक स्थिती आहे.

दुष्काळ जाहीर झालेल्या ४० तालुक्यांत जमीन महसुलात सूट, पीक कर्जांचे पुनर्गठन, शेती कर्ज वसुलीला स्थगिती, कृषी पंपाच्या चालू वीजबिलात ३३.५ टक्के सूट, शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोजगार हमी कामात काही प्रमाणात शिथिलता, पिण्याचे पाणी टँकरने पुरवणे, शेती पंपाची जोडणी खंडित न करणे असे निर्णय राज्य सरकारने घेतले आहेत.

दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांची नावे पुढील प्रमाणे

बार्शी, माळशिरस, सांगोला, करमाळा, माढा (सोलापूर), नंदूरबार (जिल्हा नंदूरबार), सिंदखेड (धुळे), चाळीसगाव (जळगाव), बुलढाणा, लोणार (बुलढाणा), भोकरदन, जालना, बदनापूर, अंबड, मंठा (जालना), छत्रपती संभाजीनगर, सोयगाव (छत्रपती संभाजीनगर),

मालेगाव, सिन्नर, येवला (नाशिक), पुरंदर सासवड, बारामती, शिरुर, दौंड, इंदापूर (पुणे), वडवनी, धारुर, अंबेजोगाई (बीड), रेणापूर (लातूर), वाशी, धाराशिव, लोहारा (धाराशिव), वाई, खंडाळा (सातारा), हातकणंगले, गडहिंग्लज (कोल्हापूर), शिराळा, कडेगाव, खानापूर विटा, मिरज

शेतकऱ्यांना मदत मिळणार

या तालुक्यातील शेतकऱ्यांना कृषीविषयक मदतींसाठी अनुदान दिले जाणार आहे. कोरडवाहू पिकांच्या ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झाले असल्यास ही मदत मिळणार आहे. तसेच फळबागा आणि बागायती पिके यांचे ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झाले असल्यास शेतीनिहाय पंचनामे करून ही मदत दिली जाणार आहे. शिवाय या तालुक्यातील शाळांतून मध्यान भोजन योजना ही दीर्घ सुट्टीच्या कालावधितही सुरू राहणार आहे. हा आदेश पुढील सहा महिन्यांसाठी लागू असणार आहे.

सोलापूर जिल्ह्याची पाणीपातळी यंदा पाच वर्षानंतर पहिल्यांदाच ०.९७ मीटरने खोलवर गेली आहे. तरीपण, जिल्ह्यातील सांगोला, माळशिरस, करमाळा, माढा व बार्शी या पाच तालुक्यातच दुष्काळ जाहीर होणार आहे.

उर्वरित तालुक्यातील शेतकऱ्यांचे काय, त्यांना मायबाप सरकारकडून दुष्काळी मदत मिळणार का, आमदार- माजी आमदार त्यासाठी सरकारकडे यशस्वी पाठपुरावा करतील का, याकडे बळिराजाचे लक्ष लागले आहे.

प्रस्ताव पाठविला जाणार आहे.

सोलापूर जिल्ह्यातील पाच तालुक्यांत दुष्काळ जाहीर होईल. परंतु, उर्वरित उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, पंढरपूर, मंगळवेढा व मोहोळ या सहा दुष्काळजन्य तालुक्यांसाठीही विशेष बाब म्हणून सरकारकडून मदत मिळावी, असा प्रस्ताव पाठविला जाणार आहे. त्यादृष्टीने तहसीलदारांकडून वस्तुनिष्ठ अहवाल मागविले आहेत. – कुमार आशीर्वाद, जिल्हाधिकारी, सोलापूर

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मंगळवेढा दुष्काळी

संबंधित बातम्या

मर्चंट नेव्हीतील अधिकार्‍यावर हल्ला; माजी सरपंचासह 5 जणांना पोलिस कोठडी

भक्तांना मोठा धक्का! करणी-बाधा उतरवणारा मंगळवेढ्यातील ‘बिरा महाराज’ निघाला गांजा तस्कर; एनडीपीएस कायद्यान्वये पोलिसांची मोठी कारवाई

June 25, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

नागरिकांनो! बालविवाह रोखण्यासाठी लग्नपत्रिकेवर वधू-वराची ‘ही’ माहिती छापणे बंधनकारक होणार

June 25, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

मंगळवेढ्यात खळबळ! फोन नंबरच्या वादातून महिलेचा विनयभंग; एकाच कुटुंबातील ७ जणांवर गुन्हा दाखल

June 25, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

मम्मी माफ कर, पुढील जन्मी तुझ्या पोटी जन्म घेणार, व्हिडिओ काढून आत्महत्या; नीटचा पेपर कठीण गेल्याने विद्यार्थ्यांचे टोकाचे पाऊल

June 25, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

भीमा नदीकाठच्या वीज समस्येवर मुख्यमंत्र्यांची मोठी कारवाई! आमदार समाधान आवताडेंच्या पत्राची तात्काळ दखल; पंढरपूर-मंगळवेढ्यातील शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा

June 24, 2026
मंगळवेढ्यातील सर्वात बेस्ट लोकेशन! नर्मदा पार्क मधील फक्त 13 N/A प्लॉट शिल्लक; बस स्टँड, पासून फक्त 2 मिनिट अंतरावर; त्वरा करा ही संधी पून्हा नाही; संपर्क अमर डेवलपर्स 9132105105/9823533526

जमीन खरेदी-विक्री करणाऱ्यांना सर्वात मोठा दिलासा; NA परमिशनची कटकट संपली; तुकडे बंदी कायद्यातही मोठा बदल

June 25, 2026
Transfer! मंगळवेढा पोलिस ठाण्याकडील ‘या’ पोलिस कर्मचार्‍यांच्या अन्यत्र बदल्या; नवीन ‘हे’ आले

क्रॅकडाऊन! मंगळवेढ्यात रस्त्यावर आडवी वाहने लावताय? सावधान! थेट पोलिसांत होणार रवानगी; ‘या’ कारवाईने खळबळ

June 24, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

गुटखा मिळत नसल्याने संतापला; सोशल मीडियावर तुकाराम मुंढेंविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याला बेड्या

June 24, 2026
धनश्री अर्थकारणाच्या यशस्वी परंपरेचा तीन दिवस दिमाखदार सोहळा; शरद पवार व सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थीत संपन्न होणार प्रा.शिवाजीराव काळुंगे सर यांचा अमृतमहोत्सव

दुष्काळाचा बिमोड करण्यासाठी शेतकऱ्यांची वज्रमुठ; मंगळवेढ्यात गाजणार ३४ वी ‘पाणी संघर्ष परिषद; २६ जूनला दुष्काळग्रस्तांचा हुंकार

June 23, 2026
Next Post
पुन्हा नोटाबंदी! 2 हजारांची नोट चलनातून बाहेर; आरबीआयचा मोठा निर्णय

महागाईचा भडका! गॅस सिलेंडरच्या दरासह GST संदर्भातील नियमातही बदल; सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं; अच्छे दिन कधी येणार?

ताज्या बातम्या

मर्चंट नेव्हीतील अधिकार्‍यावर हल्ला; माजी सरपंचासह 5 जणांना पोलिस कोठडी

भक्तांना मोठा धक्का! करणी-बाधा उतरवणारा मंगळवेढ्यातील ‘बिरा महाराज’ निघाला गांजा तस्कर; एनडीपीएस कायद्यान्वये पोलिसांची मोठी कारवाई

June 25, 2026
मंगळवेढ्यात भव्य ओपन जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धेचा थरार; ग्रामीण भागातील गुणवंत खेळाडूंना मिळणार हक्काचे व्यासपीठ; साप्ताहिक रणयुग टाईम्सचा पुढाकार

मंगळवेढ्यात भव्य ओपन जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धेचा थरार; ग्रामीण भागातील गुणवंत खेळाडूंना मिळणार हक्काचे व्यासपीठ; साप्ताहिक रणयुग टाईम्सचा पुढाकार

June 25, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

नागरिकांनो! बालविवाह रोखण्यासाठी लग्नपत्रिकेवर वधू-वराची ‘ही’ माहिती छापणे बंधनकारक होणार

June 25, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

मंगळवेढ्यात खळबळ! फोन नंबरच्या वादातून महिलेचा विनयभंग; एकाच कुटुंबातील ७ जणांवर गुन्हा दाखल

June 25, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

मम्मी माफ कर, पुढील जन्मी तुझ्या पोटी जन्म घेणार, व्हिडिओ काढून आत्महत्या; नीटचा पेपर कठीण गेल्याने विद्यार्थ्यांचे टोकाचे पाऊल

June 25, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

भीमा नदीकाठच्या वीज समस्येवर मुख्यमंत्र्यांची मोठी कारवाई! आमदार समाधान आवताडेंच्या पत्राची तात्काळ दखल; पंढरपूर-मंगळवेढ्यातील शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा

June 24, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा