mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मोठी बातमी! शरद पवारांचा आजचा सोलापूर, पंढरपूर, माढा दौरा अचानक रद्द; कारण अद्याप अस्पष्ट

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 23, 2023
in राजकारण, राज्य, सोलापूर
सर्वात मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी; राजकीय वर्तुळात खळबळ

टीम मंगळवेढा टाईम्स।

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचा आजचा नियोजित सोलापूर दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा निरीक्षक शेखर माने यांनी ही माहिती दिली आहे.

इंडिया आघाडीच्या कोअर कमिटीच्या बैठकीमुळे दौरा पुढे ढकलल्याची माहिती समोर येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आज सोलापूर जिल्ह्यातील माढाच्या दौऱ्यावर आहेत. मात्र अजित पवारांच्या माढा दौऱ्याला माढा तालुक्यातील सकल मराठा समाजाने विरोध केलाय.

मीही मराठ्याच्या पोटीच जन्माला आलोय. मराठा आरक्षणावर अजितदादा काय म्हणाले?

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. जरांगे यांनी पुन्हा एकदा 25 ऑक्टोबरपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

त्यामुळे 24 ऑक्टोबरच्या आत मराठा समाजाला आरक्षण नाही मिळालं तर आरक्षण आंदोलन अधिकच उग्र होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आरक्षण द्यायला आमचा विरोध नाही. तुमच्याकडे काही पर्याय असतील किंवा चर्चा करायची असेल तर आम्ही कधीही तयार आहोत.

मीही मराठ्याच्या पोटीच जन्माला आलोय. आमचा जो गरीब मराठा वर्ग आहे. ज्यांना आरक्षणाशिवाय पर्याय नाही अशा लोकांना आरक्षण द्यावं, या मताचा मी आहे. पण कुणाच्या तरी तोंडातला घास काढून तो दुसऱ्याच्या तोंडात देणं बरं नाही, असं अजित पवार म्हणाले.

अजित पवार बारामतीत एका कार्यक्रमात बोलत होते. मनोज जरांगे पाटलांनी एक भूमिका घेतलीय. त्यांना ऐकण्यासाठी अनेक तरुण जातायत. आरक्षणाची मागणी करणाऱ्यांबद्दल आम्हाला अजिबात आक्षेप नाही. आम्ही त्यांच्या मागण्या टाळतोय असं नाही.

आजपर्यंत ज्यांना आरक्षणाची मदत झाली त्या वर्गाला धक्का बसू न देता आरक्षण दिले पाहिजे ही सगळ्यांचीच भूमिका आहे. वेळ मारुन नेण्याचा माझा स्वभाव नाही. जे करायचंय ते शक्य असेल तर वाटेल ती किंमत मोजून मी करणारच, असं अजित पवार म्हणाले.

आम्हीही आरक्षण दिलं

आम्ही पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला 16 टक्के आणि मुस्लिम समाजाला 5 टक्के आरक्षण दिलं. पण ते टिकलं नाही. नंतर फडणवीस यांनीही प्रयत्न केला. पण तेही टिकलं नाही. आता धनगर समाजही मागणी करतोय. आम्ही मराठा समाजाच्या आरक्षणावर सर्वपक्षीय आणि सर्व संघटनांची बैठक घेतली. त्यात पूर्वीच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण द्यावं असं सगळ्यांनी सांगितलं. जरांगे पाटील म्हणतात छाताडावर बसून आरक्षण मिळवू. त्यांनी मुदत दिलीय. शिंदे समितीला यावर अभ्यास करायला सांगितलंय. धनगर समाजालाही आरक्षण हवंय. विविध ठिकाणी सभा होतायत. जालन्यात प्रचंड मोठी सभा झालीय, असं अजित पवार म्हणाले.

ध चा मा करू नका

52 टक्के आरक्षण आपण वेगवेगळ्या घटकांना दिलं आहे. आर्थिक निकषावर 10 टक्के आरक्षण दिलेलं आहे. मध्ये काहींनी वातावरण खराब केलं. कंत्राटी भरतीचा विषय आणला. पण फडणवीसानी पत्रकार परिषदेत पुरावा दिला आणि हा आदेश रद्द केला. प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मrडीयाला विनंती… मी माझी मते स्पष्ट सांगत असतो. उगाच ध चा मा करु नका. आम्ही घाई गडबडीत निर्णय घेतला आणि ते आरक्षण टिकलं नाही तर पुन्हा तुम्हीच बोलणार. त्यामुळं टिकणारं आरक्षण देण्याचा आमचा मानस आहे, असंही त्यांनी सांगितलं.

मी सरकारमध्ये नसतो तर…

मी आता सरकारमध्ये नसतो तर आपल्या पाण्याची वाटच लागली असती उपमुख्यमंत्री-पालकमंत्री म्हणून आपल्याला काही गोष्टी मिळतात. पूर्वी आपल्या वाट्याचं पाणी गेलंच होतं. पण उद्धव ठाकरेंचं सरकार आल्यानंतर आम्ही निर्णय घेवून पाण्याची सोय केली. अलिकडच्या काळात काही निर्णय घेतलेत. कुठल्याही स्थितीत आपल्या राज्याचा आणि तालुक्याचा विकास झाला पाहिजे. आम्ही सगळे विविध भागाचं आणि जातीधर्माचं प्रतिनिधीत्व करतो, असं त्यांनी सांगितलं.

फक्त विरोधी पक्षात बसून चालणार नाही

भाजपबरोबर जायचं ठरलं होतं. मी अनेक गोष्टींचा साक्षीदार आहे. विरोधी पक्षात बसून केवळ आंदोलनं करुन चालत नाही. राज्यातलं वातावरण सध्या वेगळं झालंय. भाजपसोबत असलो तरी पक्ष आपल्या विचारसरणीनंच काम करेल. राज्याचं हित डोळ्यासमोर ठेवून जनतेचे प्रश्न सोडवण्यावर भर असेल, असं त्यांनी स्पष्ट केलं.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: शरद पवारसोलापूर जिल्हा

संबंधित बातम्या

खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

संतापजनक! उपचाराच्या अन् प्रलोभनांच्या बहाण्याने अल्पवयीन मुलांना जाळ्यात ओढणारा डॉक्टर गजाआड

August 2, 2026
मोठी बातमी! सोलापूरचे नवे SP अतुल कुलकर्णी; शिरीष सरदेशपांडे यांची ‘या’ ठिकाणी झाली बदली

आषाढी एकादशीला ३३ लाखांची तुफान गर्दी, तरीही एकही चोरी नाही; सोलापूर पोलिसांची ऐतिहासिक कामगिरी; SP अतुल कुलकर्णी यांचे ‘स्मार्ट’ नियोजन

August 2, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ खपवून घेणार नाही! एफडीएचा शाळांना शेवटचा अल्टीमेटम; शाळांच्या ५० मीटर परिसरात जंक फूड विकल्यास थेट कारवाई; तुकाराम मुंढेंची शाळांवर थेट धाड

July 30, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

‘एकतर मी जाईन, नाहीतर सरकार…’; मराठा आरक्षणासाठी जरागेंचा निर्णायक एल्गार, ‘या’ तारखेला जरांगेंचं अखेरचं आंदोलन

August 1, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

ब्रेकींग! ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांच्या ‘कास्ट व्हॅलिडिटी’बद्दल सरकारने घेतला मोठा निर्णय

July 29, 2026
धक्कादायक! सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती व सासूविरुद्ध फिर्याद दाखल

मंगळवेढ्यासाठी दुःखद बातमी! कोकणात ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या

July 29, 2026
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

प्रशासनाचा मोठा निर्णय! सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे विभाजन; जाणून घ्या तुमच्या भागातील नवीन उपविभाग; नागरिक व भाविकांना कसा होणार फायदा?

July 28, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

आत्याच्या मुलाशी लग्न, पदरात 2 मुली, सुखाचा संसार सुरू असतानाच महिलेनं मुलीसह संपवलं जीवन, सोलापूर जिल्ह्यात हळहळ

July 29, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

मोठी बातमी! ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणार; ‘या’ तारखेची मतदार यादी स्थगित? पाहा नवीन वेळापत्रक

July 27, 2026
Next Post
जालन्याच्या घटनेचे राज्यभरात पडसाद; उद्या मंगळवेढ्यात सरकारचा निषेध नोंदवण्यात येणार

Breaking! मराठा आरक्षणासंदर्भात पुढील दिशा ठरविण्यासाठी आज मंगळवेढ्यात तातडीची बैठक

ताज्या बातम्या

खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

संतापजनक! उपचाराच्या अन् प्रलोभनांच्या बहाण्याने अल्पवयीन मुलांना जाळ्यात ओढणारा डॉक्टर गजाआड

August 2, 2026
महिलांनो! बसने प्रवास करताय तर सावधान, मंगळवेढा बसस्थानकावरून महिला प्रवाशाचे १० लाख किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात पळविले; स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल

बसस्थानकावर चोरट्यांचा सुळसुळाट! बसमध्ये चढणाऱ्या महिला प्रवाशाचे ४३ हजार लांबवले; मंगळवेढा बसस्थानकावरील CCTV कॅमेरे पडले बिनकामी

August 1, 2026
मोठी बातमी! सोलापूरचे नवे SP अतुल कुलकर्णी; शिरीष सरदेशपांडे यांची ‘या’ ठिकाणी झाली बदली

आषाढी एकादशीला ३३ लाखांची तुफान गर्दी, तरीही एकही चोरी नाही; सोलापूर पोलिसांची ऐतिहासिक कामगिरी; SP अतुल कुलकर्णी यांचे ‘स्मार्ट’ नियोजन

August 2, 2026
गोणेवाडीची सहकार क्रांती! श्री सिद्धनाथ महिला पतसंस्थेची बिनविरोध निवड; हजारे चेअरमन तर उपाध्यक्षपदी चव्हाण

गोणेवाडीची सहकार क्रांती! श्री सिद्धनाथ महिला पतसंस्थेची बिनविरोध निवड; हजारे चेअरमन तर उपाध्यक्षपदी चव्हाण

July 31, 2026
मंगळवेढ्यातील दोन महिलांनी अनेकांना घातला लाखोंचा गंडा; मोठे रॅकेट उघडकीस येणार

राजकीय पार्श्वभूमी आहे म्हणून सूट मिळणार नाही! मंगळवेढा न्यायालयात आरोपीला ३ वर्षांची ठोकली शिक्षा

July 31, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ खपवून घेणार नाही! एफडीएचा शाळांना शेवटचा अल्टीमेटम; शाळांच्या ५० मीटर परिसरात जंक फूड विकल्यास थेट कारवाई; तुकाराम मुंढेंची शाळांवर थेट धाड

July 30, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा