mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

उमेदवारांनो! मंगळवेढा तालुक्यातील 27 ग्रामपंचायतींसाठी आजपासून उमेदवारी होणार दाखल; आजी-माजी आमदारांसह स्थानिक नेत्यांचा लागणार कस

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 16, 2023
in मंगळवेढा, राजकारण, सोलापूर
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गर्दी; दुसऱ्या दिवशी मंगळवेढ्यात सरपंचपदासाठी ‘इतके’, सदस्यांसाठी ५५ अर्ज दाखल

टीम मंगळवेढा टाईम्स।

मंगळवेढा तालुक्यातील 27 ग्रामपंचायती सह जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील १०९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि ५० ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम दहा दिवसांपूर्वी जाहीर झाला आहे. आज सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.

ऐन दसरा-दिवाळीच्या तोंडावर १५९ गावांमध्ये निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून आजी-माजी आमदारांसह – स्थानिक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. गावचे सत्ताकेंद्र आपल्या ताब्यात राहावे यासाठी नेतेमंडळींना जीवाचे रान करावे लागणार आहे.

जनता आता सत्ताधाऱ्यांना गेल्या पाच वर्षांत  केलेल्या कामांचा जाब विचारणार आहे. थेट लोकांशी संपर्कात राहण्यासाठी ग्रामपंचायत हे मोठे माध्यम आहे. गावची सत्ता मिळविण्यासाठी अनेकांची धडपड असते.

जिल्ह्यातील अनेक मोठ्या ग्रामपंचायतींच्या सत्तेवरून त्या तालुक्याच्या आमदारांचे राजकीय  भवितव्य ठरत असते. सत्ताकेंद्रे मिळवण्याची धडपड स्थानिक नेत्यांची असते तेवढीच तालुक्याच्या आमदारांचीही. त्यामुळे गेल्या पाच वर्षात सत्ताधारी म्हणून केलेली विकासकामे तसेच लोकांशी असलेला संपर्क याची परीक्षा आता स्थानिक नेत्यांना द्यावी लागणार आहे.

येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समितीसह पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने ग्रामपंचायतींवर आपले वर्चस्व मिळवण्यासाठी बड्या नेत्यांची दमछाक होणार आहे. या निवडणुकांच्या निमित्ताने आपल्या पुढच्या पिढीला राजकारणात सक्रिय करण्याची तयारी सुरू झाली आहे.

या गावच्या होतील निवडणुका

मंगळवेढा शिरसी, अकोले, जंगलगी, खडकी, खुपसंगी, जुनोनी, महमदाबाद, बठाण, आंधळगाव, शेलेवाडी, उचेठाण, ब्रम्हपुरी, निंबोणी, मुंढेवाडी, जालीहाळ, नंदूर, चिक्कलगी, भाळवणी, हिवरगाव, रेड्डे, लक्ष्मी दहिवडी, लोणार, मानेवाडी, डिकसळ, पडोळकरवाडी, रेवेवाडी, देगाव.

• अक्कलकोट : दहिटणे, हसापूर, जेऊरवाडी, करजगी, नन्हेगाव, तळेवाड, कुडल, केगाव बु. बिजगेर, केगाव खु. कलकर्जाळ, जकापूर, शावळ, कंटेहाळळी, धारसिंग, म्हैसलगे, रामपूर, इटगे, घुंगरेगाव.

• बार्शी उडेगाव, मुंगशी, अंबाबाईचीवाडी, : चिंचोळी ढेबरेवाडी, घारी. करमाळा . भगतवाडी, जेऊर, राजुरी, चिखलठाण, गौंडरे, उंदरगाव, कंदर, कोर्टी, निंभोरे, केतूर, वीट होईल. रामवाडी, घोटी, रायगाव, कावळवाडी, केम.

माढा पिंपळखुटे आढेगाव, अंजनगाव, अंबाड, वडशिंगे, मुंगशी, लोणी, नाडी, कन्हेरगाव, तुळशी, चांदज, वडोली, टेंभुर्णी, रोपळे, पिंपळनेर. माळशिरस माळीनगर, धर्मपुरी, : कारुडे, वाफेगाव, देशमुखवाडी, कन्हेर, लवंग,कोंढारपट्टा, सातगव्हाण, दहिगाव.  .

सांगोला : खवासपूर, सावे, चिकमहुद, वाढेगाव दक्षिण सोलापूर गावडेवाडी, शिरवळ, कासेगाव, वळसंग, कुसूर, दोड्डी, तिल्लेहाळ, औज, उळेवाडी, उळे. मोहोळ . : मलिकपेठ, जामगाव, गुरसाळ, ईश्वरवठार, पुळूजवाडी.

अशी निवडणूक प्रकिया…..

– १६ ते २० ऑक्टोबर दरम्यान नामनिर्देशनपत्र मागवण्याची व सादर करण्याची मुदत असेल. २३ ऑक्टोबर रोजी दाखल अर्जांची छाननी

२५ ऑक्टोबरला दुपारी तीन वाजेपर्यंत दाखल उमेदवारी माघारी घेण्याचा शेवट दिवस

-५ नोव्हेंबरला सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान होईल.

६ नोव्हेंबरला तहसीलदारांनी नियोजित केलेल्या ठिकाणी मतमोजणी असेल.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: ग्रामपंचायत निवडणूक 2023

संबंधित बातम्या

सदगुरू बागडे बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आज श्रीक्षेत्र मारोळी येथील मठावर विविध कार्यक्रमाचे आयोजन; ह.भ.प संदेश भोसले महाराज यांची माहिती

मारोळीत उसळणार भक्तीसागर! बागडे बाबांच्या पुण्यतिथीचा सोहळा आज उत्साहात संपन्न होणार ​भक्तांच्या उपस्थितीत होणार पुष्पवृष्टी; मठाधिपती संदेश भोसले महाराजांचे उपस्थितीचे आवाहन

September 16, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

राजकीय भूकंप! आता थांबायचं नाय, अनिल सावंतांना विधानसभेत पाठवायचंच; विठ्ठल परिवारातून थेट बंडाचे निशाण, प्रस्थापितांना उघड आव्हान

September 16, 2026
अडीच हजार कोटींच्या ठेवी ही जनतेच्या कष्टाची पावती; ठेवीदारांचा विश्वास जपणे हीच धनश्रीची खरी गणेशभक्ती : प्रा.शोभाताई काळुंगे

अडीच हजार कोटींच्या ठेवी ही जनतेच्या कष्टाची पावती; ठेवीदारांचा विश्वास जपणे हीच धनश्रीची खरी गणेशभक्ती : प्रा.शोभाताई काळुंगे

September 15, 2026
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

सावधान! गुगल मॅप्सवरून दुकानं शोधून फसवणारी नवी टोळी सक्रिय; ​खोटा स्क्रीनशॉट पडला महागात; सोलापुरात व्यापाऱ्याची पावणेचार लाखांची फसवणूक

September 16, 2026
माणगंगा परिवार बँकेचे अध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त आज रक्तदान शिबीर आणि पशु पालक शेतकरी मेळाव्याचे आयोजन

सेवेचा संकल्प, विकासाचा ध्यास! नितीन आबासाहेब इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त सांगोला ते मंगळवेढ्यापर्यंत विधायक कार्याचा झंझावात; माणगंगा परिवारातर्फे महाआरोग्य शिबीराचे आयोजन

September 15, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

सावधान! मंगळवेढ्यात तोतया पोलिसांची दहशत; खुनाचा बनाव रचून शेतकऱ्याचे दागिने लंपास; एकाच दिवशी दोन घटनांनी खळबळ

September 14, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

साखरेच्या गोडव्यानंतर आता दुग्धक्रांती! ‘भैरवनाथ समूहा’ची दुग्ध व्यवसायात भव्य एन्ट्री; ​अनिल सावंत यांच्या नेतृत्वात उद्योगविस्ताराची नवी झेप; ‘भैरवनाथ डेअरी फार्म व चिलिंग सेंटर’चे आज लोकार्पण

September 13, 2026
शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत! मंगळवेढा भूमी अभिलेख कार्यालयासमोर ‘या’ तारखेला भव्य ठिय्या; एकजुटीने उपस्थित राहण्याचे आवाहन

शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत! मंगळवेढा भूमी अभिलेख कार्यालयासमोर ‘या’ तारखेला भव्य ठिय्या; एकजुटीने उपस्थित राहण्याचे आवाहन

September 12, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

आंदोलक बांधवांच्या पाठीशी मंगळवेढ्याचे वकील खंबीर; कोणतीही कायदेशीर कारवाई झाल्यास लढणार विनामूल्य लढा; मोफत कायदेशीर मदतीची घोषणा

September 12, 2026
Next Post
मोठी बातमी! दहावीचा निकाल उद्या होणार जाहीर; कुठे आणि कसा पाहाल? जाणून घ्या

अर्थसाह्य! अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ, थेट कर्ज योजनेसाठी 'या' तारखेपर्यंत मुदत; योजनेचा लाभ घेण्यासाठी 'हे' आहेत निकष

ताज्या बातम्या

सदगुरू बागडे बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आज श्रीक्षेत्र मारोळी येथील मठावर विविध कार्यक्रमाचे आयोजन; ह.भ.प संदेश भोसले महाराज यांची माहिती

मारोळीत उसळणार भक्तीसागर! बागडे बाबांच्या पुण्यतिथीचा सोहळा आज उत्साहात संपन्न होणार ​भक्तांच्या उपस्थितीत होणार पुष्पवृष्टी; मठाधिपती संदेश भोसले महाराजांचे उपस्थितीचे आवाहन

September 16, 2026
​‘माणगंगा’चा माणुसकीचा झरा! उपनगराध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त हजारो रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी; मूकबधिर विद्यार्थ्यांना मदतीचा हात

​‘माणगंगा’चा माणुसकीचा झरा! उपनगराध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त हजारो रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी; मूकबधिर विद्यार्थ्यांना मदतीचा हात

September 16, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

राजकीय भूकंप! आता थांबायचं नाय, अनिल सावंतांना विधानसभेत पाठवायचंच; विठ्ठल परिवारातून थेट बंडाचे निशाण, प्रस्थापितांना उघड आव्हान

September 16, 2026
अडीच हजार कोटींच्या ठेवी ही जनतेच्या कष्टाची पावती; ठेवीदारांचा विश्वास जपणे हीच धनश्रीची खरी गणेशभक्ती : प्रा.शोभाताई काळुंगे

अडीच हजार कोटींच्या ठेवी ही जनतेच्या कष्टाची पावती; ठेवीदारांचा विश्वास जपणे हीच धनश्रीची खरी गणेशभक्ती : प्रा.शोभाताई काळुंगे

September 15, 2026
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

सावधान! गुगल मॅप्सवरून दुकानं शोधून फसवणारी नवी टोळी सक्रिय; ​खोटा स्क्रीनशॉट पडला महागात; सोलापुरात व्यापाऱ्याची पावणेचार लाखांची फसवणूक

September 16, 2026
माणगंगा परिवार बँकेचे अध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त आज रक्तदान शिबीर आणि पशु पालक शेतकरी मेळाव्याचे आयोजन

सेवेचा संकल्प, विकासाचा ध्यास! नितीन आबासाहेब इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त सांगोला ते मंगळवेढ्यापर्यंत विधायक कार्याचा झंझावात; माणगंगा परिवारातर्फे महाआरोग्य शिबीराचे आयोजन

September 15, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..