mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

नागरिकांनो! काम बुडवून अंतरवलीला या, आता हे शेवटचंच; मनोज जरांगे पाटील यांचं आवाहन काय?

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 12, 2023
in राज्य, सोलापूर
दमदार योद्धा! अध्यादेश आला नाही, तर आंदोलन थांबणार नाही, आजपासून ‘हे’ सुटलं म्हणून समजा; मनोज जरांगे यांचा सरकारला थेट इशारा

टीम मंगळवेढा टाईम्स।

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषण केल्यानंतर आता मराठा आरक्षणासाठी जनजागृती सुरू केली आहे. राज्य सरकारने जरांगे यांच्याकडे आरक्षणासाठी एक महिन्याचा वेळ मागितला.

तर जरांगे यांनी सरकारला 40 दिवसांचा वेळ दिला आहे. 24 तारखेला ही डेडलाईन संपणार आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी 14 ऑक्टोबरलाच मराठा समाजातील कार्यकर्त्यांना जालन्यातील अंतरवली सराटीत येण्याचं आवाहन केलं आहे.

जरांगे पाटील हे आरपारची लढाई करण्याच्या तयारीत आहेत. 14 ऑक्टोबर रोजी अंतरवलीत होणाऱ्या सभेतून ते आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. त्यामुळे जरांगे पाटील यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडल्यानंतर राज्यभर दौरा सुरू केला आहे. मराठा समाजामध्ये ते जनजागृती करत आहेत. आरक्षणाचं महत्त्व समजावून सांगत आहे. तसेच आंदोलन करताना संयम बाळगण्याचं आवाहनही करत आहेत.

जाळपोळ, हिंसा अशा गोष्टी करू नका, शिस्तबद्ध पद्धतीने आपल्याला ही लढाई लढायची आहे, असं जरांगे पाटील सांगत आहेत. काल ते बुलढाण्यात होते. त्यानंतर रात्री संभाजीनगरात आले होते. छत्रपती संभाजी नगर येथील विभागीय क्रीडा संकुल कार्यालयामध्ये त्यांचा संवाद मेळावा पार पडला. यावेळी त्यांनी संभाजीनगरच्या नागरिकांना अंतरवलीला येण्याचं आवाहन केलं.

तो कायदाच मान्य नाही

मी इतके निर्दयी सरकार आजपर्यंत पाहिले नाही. ज्यात मराठा समाजाचे हित नाही तो कायदा आम्हाला मान्य नाही. जीवंत आहे तोपर्यंत मराठा समाजाशी गद्दारी करणार नाही. समाजावरील अन्याय आता सहन होत नाही. आरक्षण मिळत नाही तोपर्यंत लढत राहील, असं जरांगे पाटील यांनी ठणकावून सांगितलं.

एक दिवस काम बुडवून…

सरकारने 30 दिवसांचा वेळ मागितला होता. 14 ऑक्टोबर रोजी ही डेडलाईन संपत आहे. पण आपण त्यांना आणखी 10 दिवस वाढवून दिले आहेत. त्यामुळे 24 तारखेला सरकार आपली भूमिका जाहीर करणार आहे. त्यामुळे येत्या 14 तारखेला अंतरवली येथे मोठी सभा ठेवण्यात आलेली आहे. त्या सभेला सर्व समाजातील नागरिकांनी यायचं आहे .घरी कोणी थांबायचं नाही. जास्तीत जास्त संख्येने या. एक दिवस काम बुडवल्याने मराठा समाजाचा जर भलं होत असेल तर सर्वांनी एक दिवसाचं काम बुडून अंतरवलीला या, असं आवाहन त्यांनी केलं.

आत्महत्या करू नका

यावेळी त्यांनी समाजातील तरुणांना आंदोलन करण्याचं आवाहन केलं. आंदोलन करा, पण उग्र आंदोलन करू नका. जाळपोळ करू नका. मराठा समाजातील तरुणांना शिकून पुढे जायचं आहे. त्यामुळे अंगावर गुन्हे येईल असे आंदोलन करू नका. तसेच आरक्षण मिळत नाही म्हणून निराश होऊ नका. आत्महत्या करू नका. मी त्या होऊ देणार नाही. तुमच्या बळावरच हा लढा लढायचं आहे. तुम्ही जर आत्महत्या केल्या तर आरक्षण द्यायचं कुणाला? असा सवाल त्यांनी केला.

दिलेल्या वेळेत निर्णय घ्या

जातिवंत मराठ्यांची एकजूट पाहून मी भारावून गेलो आहे. आता थांबायचे नाही. एक टक्यामुळे घरात बसलेल्या तरुणांच्या आई वडिलांना त्यांचं दुःख माहीत आहे. आता हे शेवटचं आंदोलन आहे. सरकारने एक महिन्याची वेळ मागितली हीच मराठ्यांना मोठी संधी आहे. सरकारने दिलेल्या वेळेत आरक्षणाचा निर्णय घ्यावा, असं आवाहनही त्यांनी केलं.(स्रोत:tv9मराठी)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मनोज जरांगे

संबंधित बातम्या

विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

दुहेरी संकट! दुष्काळात ‘करंट’चा झटका; अंगाची लाही अन् विजेचा खोडसाळपणा; भीषण दुष्काळात सोलापूर जिल्ह्यात भारनियमनाचा घाव

October 11, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासा: पंचनामे पूर्ण; केंद्रीय पथक पाहणीसाठी दाखल; आज मंगळवेढ्यात; मदत कधी आणि किती मिळणार?

October 10, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

मृतांच्या टाळूवरचं लोणी! कोरोनातील २२ मृतांवर कागदोपत्री ‘उपचार’ दाखवून लाटले २ कोटी; मृत्यूनंतर ६ वर्षांनी ‘उपचार’?

October 11, 2026
सोन्याच्या पावलांनी गौराई आली…; गौरी पूजनासाठी लागणारे साहित्य कोणते? ‘अशी’ करा पूजेची मांडणी

नवरात्र नऊ नाही, यंदा तब्बल १० दिवसांचे! सप्तमी तिथी वाढली; असा आहे घटस्थापनेचा मुहूर्त

October 10, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

मागणी करा, चारा डेपो लगेच सुरू होणार; सोलापूरच्या शेतकऱ्यांना पालकमंत्र्यांचा मोठा दिलासा; रब्बी पेरणीपूर्वी ‘हे’ तपासण्याचे आवाहन

October 8, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

नागरिकांनो! ग्रामपंचायतीला किती निधी आला, कुठे खर्च झाला? आता मोबाईलवरच पाहता येणार सगळा हिशेब

October 6, 2026
दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी उपसरपंच बालाजी गरड यांची आक्रमक भूमिका; सर्व शेतकऱ्यांना विनाविलंब आर्थिक मदत व दुष्काळ निधी देण्याची मागणी

October 6, 2026
मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

October 5, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

सावकारांनो सावधान! शेतकऱ्यांना अडचणीत आणाल तर थेट…. मंत्री बावनकुळेंचा इशारा, पोलिसांना सूचना, बँकांनांही दिली ताकीद

October 5, 2026
Next Post
मंगळवेढा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक: विविध प्रश्नावर प्रशासनाला धरले धारेवर; तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष यांच्या कामाचा सपाटा

मंगळवेढा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक: विविध प्रश्नावर प्रशासनाला धरले धारेवर; तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष यांच्या कामाचा सपाटा

ताज्या बातम्या

नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत द्या! आमदार समाधान आवताडेंचे केंद्रीय पथकाला १७ कलमी मागण्यांची सनद; कर्जमाफी, चारा छावण्या अन् मोफत पाणी

October 11, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

दुहेरी संकट! दुष्काळात ‘करंट’चा झटका; अंगाची लाही अन् विजेचा खोडसाळपणा; भीषण दुष्काळात सोलापूर जिल्ह्यात भारनियमनाचा घाव

October 11, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासा: पंचनामे पूर्ण; केंद्रीय पथक पाहणीसाठी दाखल; आज मंगळवेढ्यात; मदत कधी आणि किती मिळणार?

October 10, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

मृतांच्या टाळूवरचं लोणी! कोरोनातील २२ मृतांवर कागदोपत्री ‘उपचार’ दाखवून लाटले २ कोटी; मृत्यूनंतर ६ वर्षांनी ‘उपचार’?

October 11, 2026
सोन्याच्या पावलांनी गौराई आली…; गौरी पूजनासाठी लागणारे साहित्य कोणते? ‘अशी’ करा पूजेची मांडणी

नवरात्र नऊ नाही, यंदा तब्बल १० दिवसांचे! सप्तमी तिथी वाढली; असा आहे घटस्थापनेचा मुहूर्त

October 10, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

मागणी करा, चारा डेपो लगेच सुरू होणार; सोलापूरच्या शेतकऱ्यांना पालकमंत्र्यांचा मोठा दिलासा; रब्बी पेरणीपूर्वी ‘हे’ तपासण्याचे आवाहन

October 8, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..