mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

बापरे रे..! विठ्ठलाचे झटपट दर्शन घ्यायचंय? दोन हजार रूपये द्या; पंढरपुरात दोन एजंट रंगेहाथ पकडले

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
August 3, 2023
in क्राईम, सोलापूर
पंढरीतील महाआरोग्य शिबिरात ५००० वैद्यकीय कर्मचारी वारकऱ्यांच्या सेवेसाठी उपलब्ध असणार; आरोग्यमंत्री सावंत यांची संकल्पना

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।

सध्या अधिक महिना सुरु असल्याने रोज हजारोच्या संख्येने भाविक दर्शन रांगेत उभे राहून देवाचे दर्शन घेत असताना भाविकांकडून पैसे घेऊन देवाचे झटपट दर्शन घडविणारे दोन एजंट मंदिर व्यवस्थेत असणाऱ्या पोलिसांच्या हाती लागल्याने खळबळ उडाली आहे.

हैदराबाद येथून आलेल्या विनोद उपुतल्ला आणि त्यांची पत्नी श्रीशा याना गडबड असल्याने झटपट दर्शन घेऊन परत जायचे होते. या भाविकांनी ज्या हॉटेलमध्ये उतरले होते त्या हॉटेल व्यवस्थापकाला झटपट दर्शनाबाबत विचारल्यावर त्यांनी शंतनू उत्पात याचा नंबर दिला होता.

नंतर या उत्पात याने सागर बडवे यास जोडून दिल्यावर या दोन भाविकांना घेऊन सागर बडवे मंदिरात गेला आणि त्याने मंदिरातील संबंधिताला सांगून या दोघांना दर्शनाला पाठवले.

याचा संशय मंदिर सुरक्षा व्यवस्थेवर असणाऱ्या वामन येलमार या पोलीस कर्मचाऱ्याला आल्यावर त्याने या दोन भाविकांना थांबवून त्यांचेकडून माहिती घेतली असता दोन हजार रुपये देण्याचे मान्य करून दर्शनाला आल्याचे या भाविकांनी सांगितले.

येलमार यांनी या भाविकांना व्यवस्थापकांकडे आणून त्यांच्यासमोर त्यांचे जबाब घेतले. हा अहवाल मंदिराकडे देण्यात आला असून आता या एजंटमध्ये मंदिर समिती आणि प्रशासन यातील कोणकोण सामील आहे हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

याबाबत मात्र मंदिर व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी कोणतीही माहिती देण्यास नकार दिला. हा अहवाल आता वरिष्ठांच्या कानावर घालून त्यांनी आदेश दिल्यास या एजंटांवर गुन्हा दाखल करणार असल्याचे पुदलवाड यांनी सांगितले.

दरम्यान बडवे आणि उत्पात यांच्यासह अनेक एजंट विविध हॉटेलमधील भाविकांना अशा पद्धतीने पैसे घेऊन दर्शन घडवीत असल्याचे आरोप सातत्याने होत आले आहेत. या एजंटांचे मंदिर व्यवस्थापनाशी लागेबांधे असल्याने याचा तपास वरिष्ठ पातळीवरून करण्याची भाविकांची मागणी आहे.

काल सापडलेल्या एजंटच्या माणसाला दर्शनासाठी मंदिर व्यवस्थापनातील कोणाच्या आदेशाने सोडले हा प्रश्न असून व्हीआयपीच्या नावाखाली असे रोज कित्येक भाविकांना सोडण्यात येते.

मंदिराचे सीसीटीव्ही, कर्मचारी आणि एजंटांचे मोबाईल याची तपासणी केली तर विठ्ठल मंदिरातील दर्शनाचा काळाबाजार समोर येऊ शकणार आहे. मात्र प्रत्येक वेळी मंदिराच्या बाबतीत असे प्रकार घडले की ते लगेच मिटवून टाकण्यावर प्रशासनाचा भर असल्याने मंदिरातील हा दर्शनाचा बाजार बाहेर येत नाही.(स्रोत:ABP माझा)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: विठ्ठल प्रतिष्ठान

संबंधित बातम्या

धक्कादायक! घरगुती वादातून चाकूने हातावर, गळ्यावर सपासप वार; सुनेनं सासूला संपवलं अन्….; नेमकं काय घडलं?

May 14, 2026
महिलांनो! बसने प्रवास करताय तर सावधान, मंगळवेढा बसस्थानकावरून महिला प्रवाशाचे १० लाख किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात पळविले; स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल

मोठी बातमी! मंगळवेढा बसस्थानक की चोरांचा अड्डा? पोलिसांचा धाक संपला का? भरदिवसा वृद्ध महिलेची सोन्याची बोरमाळ लंपास

May 13, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

संतापजनक! शेतीच्या कारणावरून मुलाचा वडिलांवर चाकूने हल्ला; वडिलांची मुलाविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार

May 10, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

मंगळवेढ्यात गांजा विक्रीचे मोठे रॅकेट उध्वस्त; पाच जणांवर गुन्हे, झटपट श्रीमंत होण्याच्या नादात तरुण गजाआड; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

May 10, 2026
शेतकऱ्यांना मोठा आधार! सोलापुरात कांद्याला मिळाला प्रति क्विंटल ‘एवढया’ हजारांचा भाव

​कांदा रडवतोय! ५० पैसे किलो भाव; ७३ पिशव्या कांदा विकून खर्च वजा जाता शेतकऱ्याच्या पदरात उरली चहा-पाण्याइतकीच रक्कम; बळीराजा’चे डोळे पाणावले

May 9, 2026
मंगळवेढ्यात भीषण आग! ‘श्री जिजामाता कृषी केंद्र’ खाक, लाखोंची राखरांगोळी; आगीचे कारण…

मंगळवेढ्यात भीषण आग! ‘श्री जिजामाता कृषी केंद्र’ खाक, लाखोंची राखरांगोळी; आगीचे कारण…

May 8, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! बेपत्ता तरुणाचा जंगलात सापडला मृतदेह; रागाच्या भरात उचलले टोकाचे पाऊल; मंगळवेढ्यातील तरुणाची हृदयद्रावक आत्महत्या

May 7, 2026
मंगळवेढ्यात थरकाप! पहाटेच्या अंधारात ATM वर दरोडा; पोलिसांना पाहताच दरोडेखोरांचा ‘धूम’ स्टाईलने पोबारा

मंगळवेढ्यात थरकाप! पहाटेच्या अंधारात ATM वर दरोडा; पोलिसांना पाहताच दरोडेखोरांचा ‘धूम’ स्टाईलने पोबारा

May 7, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मराठा समाजाच्या भावनांशी खेळू नका, अन्यथा गाठ आमच्याशी आहे; मनोज जरांगे-पाटील यांचा सरकारला थेट इशारा; ‘त्या’ विजयावरही संशय व्यक्त करत थेट निशाणा

May 6, 2026
Next Post
सोलापूर ब्रेकिंग! चारधाम यात्रेचे अमिष दाखवून भाविकांना लाखोंचा गंडा; चौघाविरूध्द गुन्हा दाखल

कानाला पिस्तुल लावून उडविण्याची धमकी दिल्याप्रकरणातील चौघा आरोपींना तीन दिवसाची पोलीस कोठडी

ताज्या बातम्या

राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मंगळवेढा शहर अतिक्रमणमुक्त करा! संतप्त नागरिकांचे मुख्याधिकाऱ्यांना साकडे; प्रमुख ‘या’ ८ ठिकाणांचा उल्लेख

May 15, 2026
अभिनंदनास्पद! तहसीलदार मदन जाधव यांना महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावरील ‘उत्कृष्ट अधिकारी’ म्हणून पुरस्कार जाहीर

मंगळवेढेकरांच्या तक्रारींचे आता जागच्या जागी निवारण; ‘महसूल समाधान शिबिरा’चे आज आयोजन; प्रलंबित कामांचा निपटारा होणार

May 15, 2026

धक्कादायक! घरगुती वादातून चाकूने हातावर, गळ्यावर सपासप वार; सुनेनं सासूला संपवलं अन्….; नेमकं काय घडलं?

May 14, 2026
दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

इंधन बचतीसाठी सभापतींचा पुढाकार! दीपाली ताड आता ‘लालपरी’ने करणार प्रवास

May 14, 2026
बाबो..! अशोक खरातच्या मोबाइलमधील डेटा पाहून पोलीसही चक्रावले, धक्कादायक माहिती समोर; पुन्हा गूढ वाढले

खळबळ! भोंदू खरातशी संबंध नाही म्हणणाऱ्या रुपाली चाकणकर ३ दिवस सोबतच गुवाहाटीमध्ये; हॉटेलच्या डिटेल्स समोर

May 14, 2026
महिलांनो! बसने प्रवास करताय तर सावधान, मंगळवेढा बसस्थानकावरून महिला प्रवाशाचे १० लाख किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात पळविले; स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल

मोठी बातमी! मंगळवेढा बसस्थानक की चोरांचा अड्डा? पोलिसांचा धाक संपला का? भरदिवसा वृद्ध महिलेची सोन्याची बोरमाळ लंपास

May 13, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा