mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

खळबळ! गटारीनिमित्ताने मोफत कोंबडी वाटप; पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल; काय आहे सत्य जाणून घ्या…

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
July 15, 2023
in राज्य
कोंबड्यांचे भाव वधारले! मंगळवेढयात मिळतोय फक्त 300 रुपयांत पिवर गावरान कोंबडा

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क। 

सोमवारी गटारी अमावास्या असल्याने भाजपकडून गटारी निमित्त मोफत कोंबडी वाटप कार्यक्रमाचे आयोजन केल्याचा मेसेज व्हायरल होत आहे. भारतीय जनता पार्टीच्या कोकण विकास आघाडीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे पोस्टर सोशल मीडियावर फिरत आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात गटारी अमावास्या ही एका उत्सवाप्रमाणे साजरी केली जाते. गटारी अमावास्येनंतर लगेचच श्रावण महिना सुरू होत असल्याने अनेकजण या महिन्यात मांसाहार करत नाहीत. त्यामुळे गटारीच्या दिवशी अनेक जण मनसोक्तपणे मांसाहारावर ताव मारतात.

यावर्षी सोमवारी गटारी अमावास्या असल्याने बहुतांश लोक हे रविवारीच हा उत्सव साजरा करणार आहेत. अशातच सध्या सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत असून या मेसेजमध्ये मोफत कोंबडी वाटप करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. गटारीच्या निमित्ताने मोफत कोंबडी वाटप होत असल्याने हा मेसेज प्रचंड व्हायरल होत आहे.

काय आहे मेसेज :

भारतीय जनता पार्टीच्या कोकण विकास आघाडीच्या नावाने सध्या सोशल मीडियावर ‘गटारी’ निमित्त मोफत कोंबडी वाटप कार्यक्रमाचा मेसेज व्हायरल होत आहे. हा कार्यक्रम आज सायंकाळी सहा वाजता मुंबईतील प्रभादेवी नाका येथे आयोजित करण्यात आला आहे. या व्हायरल मेसेजमध्ये काही आयोजकांची नावे देखील देण्यात आली आहेत.

यात मुंबई सचिव सचिन शिंदे, भाजपचे पदाधिकारी बबन तोडणकर, चेतन देवळेकर यांची नावे आहेत. विशेष म्हणजे यात पंतप्रधान नरंद्र मोदी, आशिष शेलार यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांचे फोटो देखील वापरण्यात आले आहेत. मात्र, हा मेसेज आता मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर भाजपने यू-टर्न घेतला आहे.

आयोजक म्हणतात ‘तो’ मी नव्हेच :

या व्हायरल मेसेजची पुष्टी करण्यासंदर्भात आम्ही आयोजक सचिन शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, गेली कित्येक वर्ष दादर माहीम विभागात कार्यरत असून पक्षाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवित आहे. काही खोडसाळ प्रवृत्तींनी माझी प्रतिमा खराब करण्यासाठी कोंबडी वाटपासारख्या एका निंदनीय उपक्रमात माझ्या फोटोचा वापर करण्याचा प्रयत्न केला आहे. अशा स्वरूपाचा कोणताही कार्यक्रम घेण्यास मी सांगितले नव्हते.

माझा पाठिंबा नाही-शिंदे : याबाबत सचिन शिंदे म्हणाले की, या मोफत कोंबडी वाटपाच्या कार्यक्रमाला माझा कोणताही पाठिंबा किंवा कोणत्याही प्रकारचे सहकार्य नव्हते. मी स्वतःही या प्रकाराची चौकशी करत आहे. तसेच ज्यांनी कोणी जाणूनबुजून हा प्रकार केला आहे, त्यांना योग्य त्या कारवाईला सामोरे जावे लागेल.

तरी आपणास माझी नम्र विनंती आहे की, सदर माहिती ही खोटी असून त्या पद्धतीचे मेसेज फॉरवर्ड करणे थांबवावे. मी एक सामाजिक जाणीव जोपासणारा जबाबदार व्यक्ती असून सदरहू उपक्रमात माझे नाव, फोटो गोवण्यात आल्याने माझी प्रतिमा खराब होत आहे.

दादर माहीम विभागात मी आरोग्य, शिक्षण, क्रीडा, तसेच इतर क्षेत्रात युवा, महिलांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध उपक्रम आयोजित केले आहेत. आपण माझ्या या विनंतीचा सन्मान राखाल ही अपेक्षा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: कोंबड्या वाटप

संबंधित बातम्या

मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

मृतांच्या टाळूवरचं लोणी! कोरोनातील २२ मृतांवर कागदोपत्री ‘उपचार’ दाखवून लाटले २ कोटी; मृत्यूनंतर ६ वर्षांनी ‘उपचार’?

October 11, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

नागरिकांनो! ग्रामपंचायतीला किती निधी आला, कुठे खर्च झाला? आता मोबाईलवरच पाहता येणार सगळा हिशेब

October 6, 2026
दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी उपसरपंच बालाजी गरड यांची आक्रमक भूमिका; सर्व शेतकऱ्यांना विनाविलंब आर्थिक मदत व दुष्काळ निधी देण्याची मागणी

October 6, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

सावकारांनो सावधान! शेतकऱ्यांना अडचणीत आणाल तर थेट…. मंत्री बावनकुळेंचा इशारा, पोलिसांना सूचना, बँकांनांही दिली ताकीद

October 5, 2026
सबजेल हाऊसफुल्ल पंढरपूरचे कैदी मंगळवेढ्यात वर्ग; कोरोना संसर्गाची कैद्यांना भीती

मोठी बातमी! ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळीला अटक; एक वर्षासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध, नेमकं कारण काय?

October 5, 2026
वाळू माफियांची मुजोरी तहसिलदारांच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

मंगळवेढ्यात संतापाची लाट! आजपासून तालुका बेमुदत बंद; खोटे ॲट्रॉसिटी गुन्हे मागे घेण्यासह १२ आरोपींच्या तात्काळ अटकेची जोरदार मागणी; संपूर्ण जिल्ह्याचे लागले लक्ष

October 3, 2026

चेकपोस्टवर थरार! पोलिसांची नाकाबंदी तोडून कार पळाली, पण पाठलाग करत दारूने भरलेला टेम्पो पकडलाच; १० लाखांच्या मुद्देमालासह मंगळवेढ्याचे दोघे अटकेत

October 8, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मोठी बातमी! दुष्काळाच्या झळा; दोन शेतकऱ्यांनी गमावला जीव, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

September 27, 2026

राज्यात दोन टप्प्यात दुष्काळ जाहीर होणार? पहिल्या 139 तालुक्यांची यादी आली समोर; सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यांचा समावेश

September 26, 2026
Next Post
शेतकऱ्यांना अपुऱ्या व विस्कळीत वीज पुरवठ्यापासून दिलासा; नवीन डीपी व क्षमतावाढसाठी ६ कोटी ४९ लाखांचा निधी मंजूर; आ.समाधान आवताडे यांची माहिती

कै.महादेवराव बाबुराव आवताडे प्रतिष्ठानच्या वतीने आज गुणवंतांचा सत्कार सोहळा; तर आ.आवताडे यांच्या उपस्थितीमध्ये आज टिफिन बैठकीचे आयोजन

ताज्या बातम्या

गालबोट! मंगळवेढ्यात वर्ग वाटपावरून शिक्षक-मुख्याध्यापकात हमरीतुमरी, ‘या’ शाळेतील प्रकार; कारवाईसाठी ‘प्रहार’ संघटना आक्रमक

अद्भूत धाडस! विषारी ‘कोब्रा’ चावला, ब्लेडने रक्त काढले अन् सापाला सोबत घेऊन गाठला दवाखाना; मंगळवेढ्याच्या प्राचार्यांचा काळजाचा ठोका चुकवणारा थरार; अखेर मृत्यूवर मात

October 12, 2026
मंगळवेढेकरांनो सावधान! शहरातून दोन दुचाकी चोरीला; वाहन चोरांचे पोलिसांना आव्हान

दुष्काळात भान हरपलेल्या हुल्लडबाजांना पोलिसांचा दणका; मंगळवेढ्यात ९ बुलेटसह दुचाकी ताब्यात, कारवाई तीव्र होणार

October 12, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत द्या! आमदार समाधान आवताडेंचे केंद्रीय पथकाला १७ कलमी मागण्यांची सनद; कर्जमाफी, चारा छावण्या अन् मोफत पाणी

October 11, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

दुहेरी संकट! दुष्काळात ‘करंट’चा झटका; अंगाची लाही अन् विजेचा खोडसाळपणा; भीषण दुष्काळात सोलापूर जिल्ह्यात भारनियमनाचा घाव

October 11, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासा: पंचनामे पूर्ण; केंद्रीय पथक पाहणीसाठी दाखल; आज मंगळवेढ्यात; मदत कधी आणि किती मिळणार?

October 10, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

मृतांच्या टाळूवरचं लोणी! कोरोनातील २२ मृतांवर कागदोपत्री ‘उपचार’ दाखवून लाटले २ कोटी; मृत्यूनंतर ६ वर्षांनी ‘उपचार’?

October 11, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा