मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क।
पंढरपूर आषाढी यात्रेदरम्यान भाविकांना सर्व सुविधा पुरवा. यात हलगर्जीपणा झाल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपुरात दिला.
मुख्यमंत्री शिंदे आषाढीच्या चार दिवस आधी पंढरीत पाहणीसाठी आले होते. विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांना रांगेत थांबण्यासाठी बनवलेले पत्राशेड, शेगाव दुमाला (ता. पंढरपूर) येथील ६५ एकर परिसराची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली.
यावेळी त्यांच्यासमवेत राज्याचे मंत्री गिरीश महाजन, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे, शिवाजी शिंदे, आ.समाधान आवताडे, राजू खरे, भैरवनाथ शुगर कारखान्याचे अध्यक्ष अनिल सावंत, श्याम गोगाव,
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, प्रांताधिकारी गजानन गुरव उपस्थित होते.
दर्शन घेण्याचा सर्वांना अधिकार
पंढरपुरात प्रत्येक विठ्ठलभक्ताला दर्शन घेण्याचा अधिकार आहे. विठुराया सर्वांचा आहे, असे सांगत तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या संभाव्य पंढरपूर दौयाबाबत मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली.(स्रोत:लोकमत)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज