मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
मंगळवेढा तालुक्यातील प्रलंबित मागण्या, पाणी टंचाई, दूध दर, पीक विम्याची भरपाई,उपसा व भोसे प्रादेशिक योजना अशा प्रश्नांसह, महात्मा बसवेश्वर स्मारक, चोखामेळा स्मारक या अस्मितेच्या कामामध्ये होत असलेली चालढकल,
तालुक्यात वाढलेले अवैध धंदे, प्रशासकीय यंत्रणेचा कामात सुरू असलेला ढिसाळपणा आणि लोकांची होत असलेली हेळसांड थांबवण्यासाठी समविचारी आघाडीच्यावतीने
आज सोमवारी (दि. ५) सकाळी १० वाजता संत दामाजी चौकापासून प्रांत कार्यालयावर हलगीनाद मोर्चा काढण्यात येणार आहे.
याबाबत निवेदन प्रांताधिकारी आप्पासाहेब समींदर यांना देण्यात आले आहे. रतनचंद शहा बँकेचे चेअरमन राहुल शहा, ‘विठ्ठल’चे माजी चेअरमन भगीरथ भालके, संत दामाजी कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील,
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चंद्रशेखर कोंडुभैरी, गावकरे, संचालक भारत बेदरे, औदुंबर वाडदेकर, बसवराज पाटील, तानाजी कांबळे, रेवणसिद्ध लिगाडे, भारत पाटील, अजित जगताप,
नामदेव जानकर, पप्पू स्वामी, महादेव लुगडे, गौड्डाप्पा बिराजदार, दौलत माने, ईश्वर यजगार, हौसाप्पा शेंबडे यांच्यासह समविचारी आघाडीच्या नेत्यांनी हा मोर्चा आयोजित केला आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज