मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क।
सांगली येथील रिलाईन्स ज्वेलरी मध्ये 8 दरोडेखोरांनी आम्ही पोलीस असून चोरीचे सोने चेक करायचे आहे अशी बतावणी करुन कर्मचार्यांचे हात बांधून सोने लुटून मंगळवेढ्याच्या दिशेने पलायन केले होते.
दरम्यान खुद्द सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधिक्षक शिरीषकुमार सरदेशपांडे यांनी ग्रामीण यंत्रणेवरुन नागरिकांना याबाबत कॉल करुन त्या गाडीचे वर्णन देवून दरोडेखोरांना पकडण्याचे आवाहन केले होते.
स्वत: पोलीस अधिक्षक जातीने सांगोला नाक्यावर थांबून, बॅरीगेट लावून वाहनाची तपासणी करीत असताना दरोडेखोरांचे वाहन सापडण्याऐवजी गोव्यावरुन 28 हजार रुपये किंमतीची 30 बॉक्स दारु घेवून जाणारे वाहन या तपासणीत पोलीसांना मिळून आले.
या घटनेची हकीकत अशी की, सांगली येथील रिलाईन्स ज्वेलरी 8 आरोपीने लुटून मंगळवेढ्याच्या दिशेने एम.एच.07 क्यू 5599 सुमो गाडी येत असल्याची माहिती पोलीस अधिक्षक सरदेशपांडे यांनी कॉल करुन महामार्गावरील नागरिकांना गाडीचे वर्णन देवून गाडी पकडण्याचे आवाहन केले होते.
पोलीस अधिक्षक सरदेशपांडे,अतिरिक्त पोलीस अधिक्षक हिंमतराव जाधव, डी.वाय.एस.पी. विक्रांत गायकवाड,गुन्हे अन्वेशन विभागाचे सुहास जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक पोटे व त्यांची टीम मंगळवेढ्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बापूसो पिंगळे,
सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश भुजबळ, पोलीस उपनिरीक्षक सौरभ शेटे,पोलीस हवालदार श्रीमंत पवार, हजरत पठाण, युवराज वाघमारे, अस्लम काझी, सचिन वाघ, शिवाजी पवार आदींनी
शहराच्या महामार्गावर सांगोला नाका येथे बॅरीगेट लावून येणार्या प्रत्येक वाहनाची कसून तपासणी सुरु असताना गोव्यावरुन दारु घेवून येणारे वाहन पोलीसांच्या गराड्यात सापडले.
हे वाहन सांगोला येथे पोलीसांनी नाक्यावर पाहिल्यानंतर टोलवरील बॅरीगेट तोडून फरार झाले. पोलीस त्यांचा पाठलाग करत असल्याचे लक्षात आल्यावर आरोपींनी दारुच्या बाटल्या फेकून मारण्याचा प्रकार केल्याचे पोलीस सुत्रांनी सांगीतले.
मंगळवेढ्यात ही गाडी पकडल्यानंतर यातील आरोपी स्वप्निल कोसेकर,शहाजी गायकवाड, असिफ मुजावर (सर्व रा.मोहोळ) यांना ताब्यात घेण्यात आले. ही दारु चडचण येथे विक्रीस जाणार असल्याचे चौकशीत आरोपीकडून सांगण्यात आले.
पोलीसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे. पोलीस अधिक्षक सरदेशपांडे,अप्पर पोलीस अधिक्षक जाधव हे सध्या त्या दरोडेखोरांच्या तपासाच्या मागावर असून महामार्गावरील सी.सी.टी.व्ही फुटेज चेक करुन अन्यत्र कुठे गेलेत का? याचा कसून शोध घेत असून ते लवकर सापडतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज