मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
सुरसंगम ग्रुप व मंगळवेढा म्युझिक क्लब यांच्या संयुक्त विदयमाने जागतिक मातृत्वदिनानिमित्त आज रविवार दि.१४ मे रोजी सायंकाळी ६.०० वा. शाहू मैदान, शिशूविहार समोर, मंगळवेढा येथे आदर्श माता पुरस्काराने मातांचा गौरव करण्यात येणार आहे.
ज्येष्ठ हिंदी व मराठी चित्रपट अभिनेत्री उषा नाडकर्णी या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत तर प्रभा हिरा प्रतिष्ठान, पंढरपूरच्या संस्थापक अध्यक्षा मंगलाताई शहा या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूद्यषविणार आहेत.
यावेळी धनश्री महिला पतसंस्थेच्या चेअरमन प्रा. शोभा काळुंगे, शिक्षण प्रसारक मंडळ, मंगळवेढाच्या अॅडमिनिस्ट्रेटर डॉ. मिनाक्षी कदम, स्व. रतनचंद शहा प्रतिष्ठानच्या संचालिका शुभदा शहा, यशोदा महिला पतसंस्थेच्या चेअरमन निला आटकळे, इनरव्हिल क्लबच्या अध्यक्षा सुनंदा आवताडे,
जवाहरलाल हायस्कूलच्या माजी मुख्याध्यापिका रेखा जडे, श्री स्वामी समर्थ पतसंस्थेच्या संचालिका मंगल भगरे, श्री सिध्दनाथ शिक्षण प्रसारक मंडळ, जुनोनीच्या संचालिका फुलाबाई ढगे, माजी नगरसेविका रेखा जाधव,
महिला काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षा सुवर्णा चेळेकर, साहित्यिका सुवर्णा काशिद, यशोदा महिला पतसंस्थेच्या संचालिका अलका गोवे आदि उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमात माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांचे आई या विषयावर व्याख्यान होणार असून सदरप्रसंगी स्व. लक्ष्मीबाई बाजीराव काळुंगे स्मृतीशेष पुरस्कार पार्वती आवताडे, स्व. गंगुबाई हनुमान चेळेकर स्मृतीशेष पुरस्कार शोभा लवटे,
स्व. पार्वती रामा काशिद स्मृतीशेष पुरस्कार रेणुका दासरी, स्व. लक्ष्मीबाई अंबादास जाधव स्मृतीशेष पुरस्कार सिताबाई चव्हाण, स्व. अनुराधा लक्ष्मण ढोबळे स्मृतीशेष पुरस्कार सुंदराबाई यादव,
स्व. लक्ष्मीबाई जोतीराम गोवे स्मृतीशेष पुरस्कार सावित्री यादव यांना आदर्श माता पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज