टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर जिल्ह्यात काल काही ठिकाणी वादळी वारे व तुरळक पावसाने हजेरी लावली. मुंबई येथील प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राने बुधवारी दुपारी एक वाजता दिलेल्या सूचनेनुसार गुरुवारी जिल्ह्यात यलो अलर्ट होता. आज शुक्रवारी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
काल सायंकाळी जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील काही गावांत, दक्षिण सोलापूर व अक्कलकोट तालुक्यात तुरळक पाऊस पडला.
सोलापूर शहरातही सायंकाळी सातच्या सुमारास वादळी वारे व तुरळक पाऊस पडला. गुरुवारी कमाल तापमान ४०.२ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २५.१ इतके होते.
शुक्रवारी जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची तसेच गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर आले आहे.
नागरिकांनी खबरदारीच्या उपाययोजना अमलात आणाव्यात, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.
या गोष्टी करा….
■ विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा.. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा.
■ आकाशात वीज चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेर ओट्यावर थांबू नका.
■ आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर ती
त्वरित बंद करा. ■ तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर राहा.
■ पाण्यात उभे असाल तर तत्काळ पाण्यातून बाहेर पडा.
■ दामिनी अॅप वापरावे आणि वापराबाबत जनजागृती करावी.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज