टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा तालुक्यातील फटेवाडी येथे व्हॉटसअप ग्रुपचे नाव बदलण्याच्या कारणावरुन संदिपान मोहन वाडदेकर (वय 34) या
तरुणाच्या डोक्यात कुर्हाड मारुन तसेच त्याच्या आई-वडिलांना दगडाने व काठीने मारुन गंभीर जखमी केल्याप्रकरणी

चंद्रकांत इंगोले, देवाप्पा इंगोले, नागन्नाथ इंगोले, ज्ञानेश्वर इंगोले, दादा इंगोले, समाधान इंगोले, अजित इंगोले आदी सातजणांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास यातील जखमी संदिपान वाडदेकर हे आपल्या घराजवळ असताना

कुलस्वामिनी शिवजन्मोत्सव तरुण मंडळ व्हॉटसअप ग्रुपचे नाव बदलण्याच्या कारणावरुन वरील आरोपींनी हातात कुर्हाड व काठी घेवून फिर्यादीच्या डोक्यात मारुन गंभीर जखमी केले.
फिर्यादी व त्यांच्या कुटूंबास ठार मारण्याची धमकी दिल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











