mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

तुम्ही तर बापाचे विचार विकले – शिंदेंचा हल्लाबोल; तर आई-वडिलांची शपथ घेऊन सांगतो, जे मी बोललो तसंच घडलं होतं; उद्धव ठाकरेंचा निशाणा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 5, 2022
in राजकारण, राज्य
ठाकरेंना मोठा धक्का! शिवसेनेने दाखल केलेला स्थगितीचा अर्ज सर्वोच्च न्यायलायने फेटाळला; सेनेची लढाई आता…

टीम मंगळवेढा टाईम्स। 

आम्ही गद्दार नाहीत तर आम्ही बाळासाहेबांचे शिलेदार आहोत. आम्हाला बाप चोरणारी टोळी म्हणता, तुम्ही तर बापाचे विचार विकले. बापालाच विकण्याचा प्रयत्न केला, असा घणाघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केल्या.

शिंदे गटाच्या वतीने बीकेसी मैदानावर मेळाव्याचे आयोजन केले आहे. त्यामध्ये शिंदे बोलत होते. यावेळी ते म्हणाले, सत्तेसाठी तुम्ही हिंदुत्वाला तिलांजली दिली. मग खरे गद्दार कोण आहेत? असा सवाल शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला.

शिंदे म्हणाले की, आम्ही गद्दार नाही तर तुम्हीच गद्दार आहात. तुम्ही वैचारिक व्याभिचार केला. विचारांशी पाप केले. आधी बाळासाहेबांच्या समाधीवर डोके ठेवा, मग आमच्यावर टीका करा, असेही शिंदे म्हणाले.

शिवसेना उभारण्यासाठी आम्ही 40 वर्षे काम केले आहे. आम्ही आंदोलने केली, लाठ्या-काठ्या खाल्ल्या. आम्हाला गद्दार म्हणता? बाळासाहेबांकडे बघून आम्ही गप्प बसलो.

अडीच वर्षांपूर्वी अनेक आमदारांनी सांगितले होते, आघाडी योग्य नाही. मात्र, आम्ही सहन केले. मात्र, बाळासाहेबांचे विचार खुंटीला टांगल्यानंतर आम्ही गप्प बसणे शक्य नाही.

मुंबई बॉम्बस्फोटातील याकूब मेमनला न्यायालयाने फाशी दिली. त्या मेमनची फाशी रद्द करा म्हणणाऱ्याला तुम्ही मंत्रीपद दिले.

आम्हाला बाप चोरणारी टोळी म्हणता, तुम्ही तर बापाचे विचार विकले. बापालाच विकण्याचा प्रयत्न केला. आम्ही जे केले ते राज्याच्या भल्यासाठी केले, असे शिंदे यांनी सांगितले.

आई-वडिलांची शपथ घेऊन सांगतो, जे मी बोललो तसंच घडलं होतं; उद्धव ठाकरेंचा भाजपवर पुन्हा एकदा निशाणा

शिवतीर्थावरुन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. आई-वडिलांची शपथ घेऊन सांगतो, जे मी बोललो तसंच घडलं होतं असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर देखील शरसंधान केले.

माझी बोटं हालत नव्हती. शरीर निश्चल पडलं होतं. ज्यांच्यावर जबाबदारी दिली ते कटाप्पा. कट करणारे अप्पा म्हणजे कटाप्पा. हे कट करत होते.

हा पुन्हा उभा राहूच शकणार नाही. आपल्यासमोर येऊच शकणार नाही. हा उद्धव ठाकरे नाही. उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे हे त्यांना माहीत नाही. आई जगंदंबेने मला जी शक्ती दिली असं उद्धव ठाकरे म्हणाले.

त्याच्याशी तुम्ही पंगा घेतला. देव तुमचं भलं करो. ही धमकी नाही. एक तेजाचा शाप असतो. हा सर्व तेजाचा शाप आहे. विचित्र गोष्ट अशी की ज्यांना आपण सर्व काही दिलं. मंत्रीपद, आमदार खासदारकी दिली. ज्यांना दिलं ते नाराज होऊन गेले. ज्यांना दिलं नाही. ते माझ्यासोबत आहेत. हे माझं नशीब आहे.

ही शिवसेना एकट्या दुकट्याची नाही. तुमच्या मर्द आणि एकनिष्ठ शिवसेनेची आहे. जोपर्यंत सोबत आहात. तोपर्यंत मी पक्षप्रमुख. एक जरी निष्ठावंत शिवसैनिक बोलेल गेट आऊट तर मी पदावरुन पाय उतार होईल. हे तुम्ही सांगावं गद्दारींनी नाही.

काय कमी केलं त्यांना. बाप मंत्री. कार्ट खासदार. कुणाचं आमदार. हे डोळे लावून बसलेत. नातू नगरसेवक. सर्व काही एकच. माझ्याचकडे पाहिजे. मी का मुख्यमंत्री झालो. का केली आघाडी. ही लपून ठेवण्याची गोष्ट नाही.

भाजपने पाठीत वार केला. म्हणून त्यांना धडा शिकवण्यासाठी मी महाविकास आघाडी केली असे उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात सांगीतले.

मी हिंदुत्व सोडलं असेल. तुम्ही सांगा मी हिंदुत्व सोडलं. सोडलं मी हिंदुत्व. जेव्हा मी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्या सात जणांत त्याचाही मान राखला.

तेव्हा काँग्रेस, राष्ट्रवादीवाले मांडीला मांडी लावून बसलेत दिसलं नव्हतं का. की स्वत:ची दाढी स्वत:च्या तोंडात गेली होती. का बोलला नाही तेव्हा? असा सवाल उपस्थित करत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेवर निशाणा साधला.

अमित शहांसोबत ठरलं होतं. पण त्यांनी नकार दिला. मी शिवरायांच्या साक्षीने माझ्या आईवडिलांची शपथ घेऊन सांगतो. जे मी बोललो तसंच घडलं होतं. भाजप-सेनेचा अडीच अडीच वर्षाचा मुख्यमंत्रीपदाचा काळ वाटून घ्यायचा हे ठरलं होतं.

हे आईवडिलांची शपथ घेऊन सांगतो. आज तुम्ही केलं. तेच मी सांगत होतो. अडीच वर्ष तुमची अडीच वर्ष आमची. तेव्हा म्हणत होता हे संभव नाही. तेव्हा का सन्मानाने केले नाही.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

संबंधित बातम्या

मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मोठी बातमी! दुष्काळाच्या झळा; दोन शेतकऱ्यांनी गमावला जीव, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

September 26, 2026

राज्यात दोन टप्प्यात दुष्काळ जाहीर होणार? पहिल्या 139 तालुक्यांची यादी आली समोर; सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यांचा समावेश

September 26, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी बातमी! तुकाराम मुंढे यांच्या प्रयत्नांना यश; रुग्णांना मिळणार ‘हा’ मोठा दिलासा; केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

September 22, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

​जमीन खरेदी-विक्रीत मोठा बदल! महाराष्ट्रात लवकरच ‘लँड टायटलिंग कायदा’; जमिनीच्या वादांवर सरकारचा कायमचा तोडगा

September 20, 2026

​पावसाचा खंड पडल्याने सरकार अलर्ट! विहिरी खोदण्यावर बंधने, पाणी चोरी रोखण्यासाठी संयुक्त पथके सज्ज; शासनाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय

September 20, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

एसटीचा प्रवास अधिक सोपा! आता धावत्या बसमध्येच होणार NCMC कार्ड रिचार्ज; महिला अन् ज्येष्ठ नागरिकांची पायपीट थांबली

September 19, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

मोठी बातमी! राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी व बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर

September 18, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

राजकीय भूकंप! आता थांबायचं नाय, अनिल सावंतांना विधानसभेत पाठवायचंच; विठ्ठल परिवारातून थेट बंडाचे निशाण, प्रस्थापितांना उघड आव्हान

September 16, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

गावच्या कारभाऱ्यांची गळचेपी? राज्य सरकारच्या निर्णयाने सरपंचपदावर कुऱ्हाड; ‘त्या’ अटीविरोधात सरपंच महासंघ सुप्रीम कोर्टात जाणार

September 15, 2026
Next Post
गौप्यस्फोट! सांगोल्याचे आमदार शहाजी बापूंचं धक्कादायक विधान; थेट गुवाहाटीवरून साधला संवाद

सांगोल्याचे आ.शहाजीबापू पाटलांची शरद पवारांवर जहरी टीका; म्हणाले, मैद्याचं....

ताज्या बातम्या

मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मोठी बातमी! दुष्काळाच्या झळा; दोन शेतकऱ्यांनी गमावला जीव, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

September 26, 2026

राज्यात दोन टप्प्यात दुष्काळ जाहीर होणार? पहिल्या 139 तालुक्यांची यादी आली समोर; सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यांचा समावेश

September 26, 2026
कै.आण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवेढयात विविध कार्यक्रम; सामाजिक कार्याबद्दल ‘यांना’ पुरस्कार जाहीर

कै.आण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त मंगळवेढ्यात आज पुरस्कार सोहळा; आमदार आवताडेंच्या हस्ते होणार सन्मान; पाहा कोणा-कोणाला मिळणार मानाचा ‘समाजभूषण पुरस्कार’?

September 25, 2026
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

घरात तहान, पाणी कर्नाटकच्या दारात! उजनी कालवाच्या गळतीमुळे मंगळवेढ्यातील शेतकरी संकटात; पाटबंधारे विभागाविरोधात संताप

September 24, 2026
अनाथ, वंचितांच्या आयुष्याला मायेची सावली: निंबोणीचे ‘सहारा बाल सेवा आश्रम’ ठरतेय निराधार चिमुकल्यांचे हक्काचे घर; ​शासकीय अनुदानाविना केवळ लोकवर्गणीतून उभा राहतोय मानवतेचा वसा

अनाथ, वंचितांच्या आयुष्याला मायेची सावली: निंबोणीचे ‘सहारा बाल सेवा आश्रम’ ठरतेय निराधार चिमुकल्यांचे हक्काचे घर; ​शासकीय अनुदानाविना केवळ लोकवर्गणीतून उभा राहतोय मानवतेचा वसा

September 24, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

आमदार समाधान आवताडेंचा मास्टरस्ट्रोक! प्रशासकीय कामांसाठी सोलापूरला जाण्याची कटकट संपली; पंढरपूरला अपर जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर; ‘या’ सात तालुक्यांना मोठा दिलासा

September 23, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा