टीम मंगळवेढा टाईम्स।
नवरा बायकोचे भांडण झाल्याने रागाच्या भरात पतीने स्वतः ब्लेडने गळा कापून घेतल्याने तो जखमी झाला आहे. ही घटना रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास सोलापुरात घडली आहे.
सोनू अरूण आठवले (वय २७ , रा . विजापूर रोड ) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.
राहत्या घरात नवरा बायकोचे भांडण झाल्याने बायको न सांगता निघून गेल्याने रागाच्या भरात सोनू याने ब्लेडने गळा कापून घेतला.
यात मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. यामुळे त्याला लगेच भावाने उपचारांसाठी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान, डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार सुरू केले आहे. या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज