टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा येथील प्रांताधिकारी आप्पासाहेब समिंदर यांच्या आदेशाने मुंबई पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ५६ ब नुसार
धुळदेव जग्गनाथ अनुसे (वय ४५, रा.धर्मगाव रोड, मंगळवेढा ) यास सोलापूर जिल्ह्यातून २ वर्षे चे कालावधीकरिता सोलापूर जिल्ह्याचे हद्दीतून हद्दपार करण्यात आले होते.
परंतु तो मंगळवेढा येथे आल्याने त्यास मंगळवेढा पोलिसांनी त्यास अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, धुळदेव जग्गनाथ अनुसे हा सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्याच्या सवयीचा आहे. यापूर्वी त्याचेवर मंगळवेढा पोलीस ठाणेस सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला केला म्हणून गुन्हे दाखल आहेत.
अनुसे हा प्रांत कार्यालय मंगळवेढा येथील कार्यालयात घुसुन तेथील कर्मचारी यांच्यावर हल्ला करणार असल्याची गोपनीय माहिती बातमीदारामार्फत मिळाल्याने
पो.हे.कॉ हजरत पठाण, पो.काँ सुरज देशमुख, कैलास खटकाळे, अजय शिंदे यांना सदर ठिकाणी रवाना केले असता १० वाजण्याचे सुमारास मंगळवेढा एस . टी. स्टॅन्ड समोर हा मिळून आला.
सदर आरोपीला पोलिसांनी अटक करुन त्याची वैद्यकीय तपासणी केली असता तो दारू पिल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर इसमाविरोधात मंगळवेढा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधिक्षक हिम्मत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली डी.वाय.एस.पी राजश्री पाटील, पोलीस निरीक्षक रणजित माने, पोहेकाँ हजरत पठाण, पोकाँ शिंदे, पोकाँ देशमुख, पोका कैलास खटकाळे यांनी सदरची कामगिरी केली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज